कसं म्हणू सगळं ठीक आहे

Started by mkapale, August 10, 2023, 05:51:47 PM

Previous topic - Next topic

mkapale

कसं म्हणू सगळं ठीक आहे

कसं म्हणू सगळं ठीक आहे
एक एक ठोका एक एक क्षण मोजतांना
तुला जवळ येता येता दूर जात बघतांना
नुकतंच उमललेलं फुल कोमेजतांना
कसं म्हणू सगळं ठीक आहे, हे होतांना

शब्दांचे खोल घाव मला होत असतांना
न दिसणाऱ्या , त्रास देणाऱ्या जखमा होतांना
स्वरांमध्ये एखादा विसंगत ऐकतांना
कसं म्हणू सगळं ठीक आहे, हे होतांना

नकोका जपायला मन पहिल्यांदा भिजतांना
मृगजळ नव्हतं ना, जे दिसत होतं डोळ्यांना
मग का थांबत नाहीस पाण्यात रंग शोधतांना
कसं म्हणू सगळं ठीक आहे, हे होतांना

विचारांचे किरण रंग लावतात भावनांना
का त्या मनाला छेडावे नितळ असतांना
सांग कसा दिसतो मी डोळे बंद असतांना
कसं म्हणू सगळं ठीक आहे, हे होतांना

संपवावे का संगीत जे सुखावते ऐकतांना
एक ठेच , एक धक्का लागला चालतांना
तर का चालणे थांबते आपण जगतांना
कसं म्हणू सगळं ठीक आहे, हे होतांना