कविता-रुणुझुणु वाजतात हे थेम्ब पावसाचे, ऐक प्रिये संगीत या झिमझिमणाऱ्या धारांचे

Started by Atul Kaviraje, August 11, 2023, 11:09:24 AM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

मित्र/मैत्रिणींनो,

     आज मी तुम्हाला, पावसाने फुललेल्या निसर्गाची कविता-गीत ऐकवितो. "रिमझिम रिमझिम रुमझुम रुमझुम, भीगी भीगी रुत में तुम हम हम तुम"- या हिंदी गाण्यावर ते आधारित आहे. आशा आहे ते तुम्हाला आवडेल. भरभरून लाईक करा, व मला प्रोत्साहित करा. आपणा सर्वांस ऑगस्ट महिन्याची ही ऊन सावलीच्या खेळाची          शुक्रवार-सकाळ आनंदाची जावो, ही सदिच्छा.

--मूळ हिंदी गाणे-( रिमझिम रिमझिम रुमझुम रुमझुम, भीगी भीगी रुत में तुम हम हम तुम )           
--------------------------------------------------------------------------

     "रुणुझुणु वाजतात हे थेम्ब पावसाचे, ऐक प्रिये संगीत या झिमझिमणाऱ्या धारांचे"
    --------------------------------------------------------------------

रुणुझुणु वाजतात हे थेम्ब पावसाचे
ऐक प्रिये संगीत या झिमझिमणाऱ्या धारांचे
प्रत्येक बुंद स्फटिक जणू स्वरच छेडतोय,
जन्माला येई गाणे त्यातून पर्जन्य सप्तसुरांचे

रुणुझुणु वाजतात हे थेम्ब पावसाचे
ऐक प्रिये संगीत या झिमझिमणाऱ्या धारांचे
ताल पदन्यासाचा, सवे कर्णमधुर गीत झरणारे,
अवीट, मधुर, गुंजारव या बरसत्या शीतल गारांचे

अन अश्या या ओल्या ऋतूत सये मी अन तू
मदमस्त भिजवी, भिनवी दोघांस हा मदोन्मत्त ऋतू
हात हातात घालून मस्त चालत राहू,
भान विसरून जगाचे दोघे, हा निसर्ग पाहू

जलतरंग आपली धून छेडतोय, असा पाऊस बरसतोय
या सुरांच्या कर्णमधुर तानेस जीव कधीचI तरसतोय
ही सुरावट साऱ्या शरीरभर बघ भिनत चाललीय,
हे संगीत, ही गीतमाला मनात खोल कुठेतरी रुजत चाललीय

टपटपणारे जल बिंदू मोत्याचे रूप घेऊन जन्मलेत
पडत धरेवर साज, सूर, लयींनी ते मृत्तिकेवर वाजलेत
धून तयांची नेई स्वर्गी, जणू स्वर्गीय तान छेडली,
इंद्र दरबारी कुणा अप्सरेची छुनुक पैंजणे वाजली

संगीत वाजले, गाणे सजले, या बरसणाऱ्या वर्षाराणीचे
ज्यासाठी होते आतुर मन, तरसत कितीतरी वर्षांचे
आकंठ, तृप्त होतो जीव, रमतो या ओल्या ऋतूत,
तुझी माझी प्रीत नहIते, सखये या बरसत्या पावसात

रुणुझुणु वाजतात हे थेम्ब पावसाचे
ऐक प्रिये संगीत या झिमझिमणाऱ्या धारांचे
जीवनाचे गाणेच जणू वाहतेय नितळ ओढ्यापरी,
या प्रवाहात मुक्त वाहूया, नाहूया सखे याही प्रहरी

रुणुझुणु वाजतात हे थेम्ब पावसाचे
ऐक प्रिये संगीत या झिमझिमणाऱ्या धारांचे
गIर तुषार उडवीत अंगी, निर्सगाचे गाणे गात बहुरंगी,
आनंदIच झरा तनूवर झेलीत, पावसाचे गाऊ गुणगान बहुढंगी 

प्रिये, पहा निसर्गाने पाहता पाहता अवचित काय पालटलीय
ही वादी काळ्या ढगांच्या चादरीने जणू लपेटलीय
पावसाच्या रजIमंदीने साऱ्या दिशा जणू बहरल्यात, उमलल्यात,
दूर क्षितिजावर कृष्ण-मेघांच्या चंदेरी किनाऱ्याने फुलल्यात

झरझर वाहत पावसाच्या अमृतधारा धरेच्या कोंदणात स्थिरावल्यात
एक लयीत, एक तानेत पडत मातीच्या गर्भात शिरल्यात 
हा जीवन दातI पाऊस, मातीमोल होता नवं जीवन देतोय,
मातीत मुरतI मुरतI बी-बियांना इवलुश्या रोपात घडवतोय

जणू सIर स्वप्नात घडतंय असा आभास होतोय, भास होतोय
समोर पावसाचा पातळ पडदा हळू हळू गडद होत जातोय
हा अIविष्कार, हा चमत्कार तो निसर्गच करू जाणे,
ही किमया, ही जादू तो किमयागार पाऊसच करू जाणे

रुणुझुणु वाजतात हे थेम्ब पावसाचे
ऐक प्रिये संगीत या झिमझिमणाऱ्या धारांचे
अनोख्या दुनियेत घेऊन जाणारे हे पावसाचे संगीत,
अशातच माझ्यासवे आहे माझा जिवलग मनमीत

रुणुझुणु वाजतात हे थेम्ब पावसाचे
ऐक प्रिये संगीत या झिमझिमणाऱ्या धारांचे
या संगीताने जणू आपले प्रेम बहरत आहे, फुलत आहे,
प्रेमाला पालवी फुटून नवीन कोंब त्याला धरत आहे

प्रिये पहा, पावसाने आता थोडा काळ विश्रांती घेतलीय
सूर्याची तिरपी सौम्य किरणे हळूच ढगांआडून डोकावलीय
ही झील, या दऱ्या कशा लख्ख दर्पणात चमकताहेत,
नयनांना शमविणारी शांत किरणे त्यातून परावर्तित होताहेत

ऊन पावसाचा हा खेळ निसर्गाची कलाटणी आहे
नजरबंदी करीत, नजर खिळवीत ठेवण्याची जणू त्याची धाटणी आहे
पुन्हा घटI उमडतील, पुन्हा पावसाला सुरुवात होईल,
पुन्हा ते मनभावन, मनात पडसाद उमटविणारे गीत संगीत सूर होईल

प्रिये, माझं मन इथेच रुळतंय, या ऋतून ते बंधित होतंय
वाटत नुसतं पहIत राहावं, एकटक, नजर खिळवून
निसर्गाचा हा नजIरI डोळे भरून पहावा, त्याला न्याय द्यावा,
तुझ्या माझ्या प्रेमाला पुहा नव्याने एक आकार यावा

रुणुझुणु वाजतात हे थेम्ब पावसाचे
ऐक प्रिये संगीत या झिमझिमणाऱ्या धारांचे
नुसतं ऐकत रहावं हे संगीत, पूर्णपणे बुडून जावं,
तुझ्या मिठीत बेभान होऊन ते फक्त उमजत रहावं

रुणुझुणु वाजतात हे थेम्ब पावसाचे
ऐक प्रिये संगीत या झिमझिमणाऱ्या धारांचे
हा पाऊस जिवलग आहे, हा पाऊस आपला जीव आहे,
हा पाऊस जीवन आहे, आयुष्यास आकार देणारा आकाश-देव आहे

-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-11.08.2023-शुक्रवार.
=========================================