बोलायचे आहे

Started by mkapale, August 11, 2023, 08:24:30 PM

Previous topic - Next topic

mkapale

बोलायचे आहे

स्वप्नात केला मी, सराव अनेक वेळा
आता मला खरा पत्ता टाकायचा आहे
डोळ्यात तुझ्या वाचता येई न मला जे
थेट आता ते उत्तर तुझे ऐकायचे आहे

पाहता पहिल्यांदा, नजर खिळून होती
सुंदर आता मनातले भाव पहायचे आहे
किती करावे विचार नुसते रात्रभर ते
स्वप्न ते पहाटेचे आता जगायचे आहे

होणार काय तुझे नि माझे माहित नाही
हिमतीने पाऊल आता टाकायचे आहे
होकार कि नकार केले तुझ्या हवाली मी
निर्णयाला सामोरे मला जायचे आहे

उत्तर तुझे जीवन माझे बदलेल, हे नक्की
नशीब आता माझे मला आजमायचे आहे
साथ दिलीस तर बांधूया रस्ता अपुला आपण
हात घेऊन हातात तुला हे सांगायचे आहे