प्रेमाचा एक प्रवास, असाही...

Started by Shrikant R. Deshmane, August 12, 2023, 09:05:49 AM

Previous topic - Next topic

Shrikant R. Deshmane

तशी लोकल त्याच्यासाठी नेहमीची होती,
म्हणून दोघे एकाच डब्यात चढले,
सकाळची चाकरमान्यांची गर्दी पाहून,
ती थोडी थबकलीच, नको राहूदे म्हणत,
तिचे पाय फलाटावरच अडले..

न राहवून त्याने म्हंटल, मी आहे ना..
त्याने तिला हात दिला आणि ती पुन्हा त्याच डब्यात चढली,
गर्दीच्या ठिकाणी दरवाजा जवळ एक आडोसा कसाबसा मिळवत वेळ काढली..

ती सीटच्या मागच्या बाजूला टेकून उभी राहिली,
कोणाचा धक्का लागू नये म्हणून,
त्याने तिच्या दोन्ही बाजूला हात ठेवला,
खूप वर्षांनी तिच्यासोबत प्रवास करायला मिळाला म्हणत त्याला देवच पावला..

जस जशी गर्दी वाढू लागली, तस-तसं त्याला स्वतःला कठीण झालं सावरणं,
पण चेहऱ्यावर काही हाव-भाव न दाखवता तिला ही जमतं बावरणं..

थोड्या अंतराने दोघांमधील अंतर गर्दीमुळे हळू हळू कमी होऊ लागलं,
त्याच्या मनात थोडी भीती होती,
आणि तिच्या मनात विश्वासाचं बी रुजू लागलं..

तिने सगळं जाणलं आणि तिने त्याचा हात सावरला,
दोघांमध्ये तशी मैत्रीचं पण विश्वासाने त्याने मनातला भाव मनातच आवरला..

त्याचा हात नकळत तिच्या कमरेभोवती गेला,
तो थोडा बाचकला,
नजरेत तिच्या पाहून थोडा अजूनच दचकला..

तिने नजरेनेच इशारा करत स्वतःला सावरून घेतले,
त्याने मात्र मनातच तिला आपल्या कवेत घेतले..

आता मात्र गर्दी त्याच्या आवरण्या पलीकडे जात होती,
ती ही समजून गेली, त्याची ही काही मजबुरी होती..

त्याने तिचा एक हात घट्ट पकडला,
अचानक तिने खांद्यावर डोकं ठेवलं अन,
गडी पुरता गोंधळातच सापडला..

दोघांनाही समजत होतं, उमगत होतं,
गर्दीमुळे का होईना कुठेतरी प्रेम खुलत होतं..

त्याने न राहवून तिच्या कामरेवती हात ठेवला,
नको नको म्हणत तिने थोडा नकार दर्शवला..

बघता बघता लोकल ठाणे पोहचली,
तशी चकरमान्यांची गर्दी कमी झाली..

तिने थोडा सुटकेचा निश्वास सोडला,
पण तिच्या प्रेमात मात्र तो गेला ओढला..

तिला गर्दीत त्रास नाही झालं याचं समाधान तिच्या चेहऱ्यावर होतं,
तो कथित का असेना, त्याने मात्र प्रेमाचं तळच गाठलं होतं..

काही क्षणांच्या प्रवासाने मैत्रीचं रूपांतर प्रेमात व्हायची सुरवात झाली,
अन जाता जाता तिने मात्र गालात हसंत तिने ही त्याची कबुली दिली..

प्रेमाचा एक प्रवास असाही..

श्रीकांत रा देशमाने..
दिनांक: १२/०८/२०२३
श्रीकांत रा. देशमाने.

[ कविता म्हणजे कागद,
लेखणी अन् तू... ]