हळवी कविता-तुझ्या डोळ्यांत झालीय आसवांची दाटी, झरतील ते कधीही माझ्या प्रेमा पोटी

Started by Atul Kaviraje, August 12, 2023, 10:44:37 AM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

मित्र/मैत्रिणींनो,

     आज मी तुम्हाला, पावसातली एक हळवी प्रेम कविता-गीत ऐकवितो. "आँखों से तूने यह क्या कह दिया "- या हिंदी गाण्यावर ते आधारित आहे. आशा आहे ते तुम्हाला आवडेल. भरभरून लाईक करा, व मला प्रोत्साहित करा. आपणा सर्वांस ऑगस्ट महिन्याची ही तुरळक पावसाची शनिवार-सकाळ आनंदाची जावो, ही सदिच्छा.

--मूळ हिंदी गाणे-( आँखों से तूने यह क्या कह दिया )           
----------------------------------------------

       "तुझ्या डोळ्यांत झालीय आसवांची दाटी, झरतील ते कधीही माझ्या प्रेमा पोटी"
      ------------------------------------------------------------------

तुझ्या डोळ्यांत झालीय आसवांची दाटी
झरतील ते कधीही माझ्या प्रेमा पोटी
तिथे पाऊस जल-बिंदू, इथे तुझ्या नयनांतील अश्रू-बिंदू,
दोन्हीही भरून आलेत ढगांच्या अन कडांच्या काठी 

तुझ्या डोळ्यांत झालीय आसवांची दाटी
झरतील ते कधीही माझ्या प्रेमा पोटी 
पाऊस तुझ्या आसवांचा जणू प्रतीकच आहे,
तो जणू पडतोयच मुळी तुझ्यासाठी

हे मन कधीपासून बेचैन होत, दिवानं होत
तुझ्या मनातील प्रेमासाठी ते उत्सुक होत
आज हे प्रेम झरझर वाहू लागलाय डोळ्यांतून,
प्रेमाचा झरI प्रवाहू लागलाय तुझ्या नजरेतून

केव्हातरी फार एकटा पडलो होतो मी, प्रिये
तुझ्या प्रेमाला अगदी पारखI झालो होतो मी, सखये
अश्यातच तू मला हात दिलास, सांभाळून घेतलेस,
माझ्या अस्वस्थतेला, तळमळीला तू कवटाळून घेतलेस

तेव्हा हा पाऊस मला जणू शोलाच भासायचा 
त्याची शीत धारा जणू दहकत्या ज्वालानी बरसायची 
माझी तडप, माझी उदासीनता तू समजून घेतलीस,
तेव्हा या पावसारखीच तू मजवर बरसून गेली होतीस

आज पावसाच्या शीत धारा मी अंगावर घेतोय
आज पावसाच्या थंड गारा मी तनूवर झेलतोय
तुझ्यासोबत असता माझं मन तो शांत करतोय,
तुझामध्ये काही आहे प्रिये, देहात अजबसा नशI झिरपतोय 

तुझ्या डोळ्यांत झालीय आसवांची दाटी
झरतील ते कधीही माझ्या प्रेमा पोटी 
इतकं प्रेम करतेस तू माझ्यावर, लाडके ?,
जन्मोजन्मीच्या आहेत जणू या ऋणानुबंधाच्या गाठी

तुझ्या डोळ्यांत झालीय आसवांची दाटी
झरतील ते कधीही माझ्या प्रेमा पोटी 
तुझ्या अश्रुंचे मोल मला कळून आलेय,
स्वर्गात बांधल्या गेल्यात आपल्या प्रेम-गाठी

केव्हातरी मन उदास होतं, बेबस होतं 
तुझ्या दर्शनास, प्रेमास ते तरसत होतं
आज पावसाची आणि तुझी दोघांचीहि मर्जी आहे मजवर,
दोघांच्याही प्रेमात जणू मी वाहून चाललोय निरंतर

आता तुझ्याच हाती माझे सारे भविष्य आहे
तूच माझी जिंदगी, तूच माझे आयुष्य आहे
मी तुझा गुलाम आहे, मी तुझाच दास आहे, राणी,
हे स्वप्नंच वाटतंय जणू, की खरंच घडतं आहे ?

माझ्या प्रेमाला तू पारखलस, त्याला स्वीकारलस
अत्यंत ऋणी आहे मी तुझा, तू मला हो म्हटलंस
अशी जाऊ नकोस तू इतकी भIवनाच्या आहारी,
जाणतोय मी तुझं कोमल मन बाळगून आहेस तू उरी

तुझ्या डोळ्यांत झालीय आसवांची दाटी
झरतील ते कधीही माझ्या प्रेमा पोटी
न्याय दिलास, आपलंस केलस तू माझ्या प्रेमाला,
बघ उमलून आलीय, बहरून आलीय या पावसात आपली प्रीती

तुझ्या डोळ्यांत झालीय आसवांची दाटी
झरतील ते कधीही माझ्या प्रेमा पोटी
आपल्या प्रेमाला जणू पंख फुटलेत आज,
माझं मन तुझ्या मनाशी करू लागलय गुज-गोष्टी

तुझ्या झरत्या आसवांना वाट मोकळी करून दे, प्रिये
मनातील सर्व सर्व भावनांना पूर येऊ दे, सखये
आता तुझे अश्रूच बोलतील, शब्दांची काय गरज ?,
आपल्या प्रेमाला ते वाचा फोडतील, सांगण्याची काय गरज ?

या अIसवांत  तू मला अधिक सुंदर दिसतेस
तुझ्या प्रेमाची हीच पावती मला मनोमन मिळते
हा पाऊस आपणI दोघांना पहा मनसोक्त भिजवत आहे,
त्याच्या खुशीची ग्वाही बघ त्याच्या पडण्यातून मिळत आहे

पहा, आपले प्रेम बहरून येऊ लागलय या पावसात
तुला मला नख-शिखांत भिजवू लागलीय ही बरसात
आपले हे प्रेम असंच राहू दे, ते इथंच स्थिरावू दे,
तुझी मला आणि माझी तुला आयुष्यभर राहू दे साथ

तुझ्या डोळ्यांत झालीय आसवांची दाटी
झरतील ते कधीही माझ्या प्रेमा पोटी
डोळे तुझे हसताहेत, ओठही काही गुणगुणताहेत,
आता प्रीतीचे गीत येऊ दे प्रिये, तुझ्या ओठी

तुझ्या डोळ्यांत झालीय आसवांची दाटी
झरतील ते कधीही माझ्या प्रेमा पोटी
आपले प्रेम पाहील ही दुनिया, एक मिसाल ठरेल,
आता यापुढे आपलं जगणं फक्त एकमेकांसाठी

-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-12.08.2023-शनिवार.
=========================================