१२-ऑगस्ट-दिनविशेष

Started by Atul Kaviraje, August 12, 2023, 04:45:02 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

मित्र/मैत्रिणींनो,

     आज दिनांक-१२.०८.२०२३-शनिवार.जाणून घेऊया,आजच्या दिवसाचे "दिन-विशेष"

                                "१२-ऑगस्ट-दिनविशेष"
                               ----------------------

-: दिनविशेष :-
१२ ऑगस्ट
भारतीय ग्रंथपाल दिवस
=========================================
अ) महत्त्वाच्या घटना:
   ----------------
२००५
श्रीलंकेचे परराष्ट्रमंत्री लक्ष्मण कादिरमगार यांची तामिळ अतिरेक्यांनी हत्या केली.
२००२
१२ वर्षे ७ महिने वयाचा सर्गेई कार्जाकिन हा युक्रेनचा खेळाडू जगातील सर्वात लहान वयाचा बुद्धीबळातील ग्रँडमास्टर बनला.
२०००
प्रसिद्ध पर्यावरणवादी कार्यकर्त्या मेधा पाटकर यांची गांधी सेवा पुरस्कारासाठी निवड
१९९८
सचिन तेंडुलकर याला 'राजीव गांधी खेल रत्‍न' पुरस्कार जाहीर
१९९५
जागतिक मैदानी स्पर्धेत अमेरिकेच्या मायकेल जॉन्सनने २०० मी आणि ४०० मी अशा दोन्ही धावण्यांच्या शर्यतीत सुवर्णपदक मिळवले. अशी कामगिरी करणारा तो पहिलाच पुरुष धावपटू आहे.
१९८९
कुसूमाग्रज यांच्या अध्यक्षतेखाली पहिली 'जागतिक मराठी परिषद' मुंबई येथे सुरू झाली.
१९८२
परकीय कर्जाचे हप्ते चुकवता येत नसल्यामुळे मेक्सिकोने दिवाळे काढले. त्यामुळे दक्षिण अमेरिका व तिसर्‍या जगातील देशांमधे आर्थिक आणीबाणीची परिस्थिती निर्माण झाली.
१९८१
IBM PC
आय. बी. एम. कंपनीचा पहिला पर्सनल कॉम्प्युटर (PC) बाजारात आला.
१९७७
श्रीलंकेत झालेल्या वांशिक दंगलीत ३०० हुन अधिक तामिळ ठार झाले.
१९६४
वंशभेद केल्याबद्दल दक्षिण अफ्रिकेची ऑलिम्पिक स्पर्धांमधुन हकालपट्टी झाली.
१९५२
मॉस्कोमधे १३ ज्यू विद्वानांची हत्या
१९५०
अमेरिकन युद्धकैद्यांना उत्तर कोरियन सैन्याने ठार मारले.
१९४८
लंडनमधे झालेल्या ऑलिम्पिक स्पर्धेत भारताने हॉकीमधे सुवर्णपदक मिळवले.
१९४२
चले जाव चळवळ – पुण्यातील अप्पा बळवंत चौकात रणगाडे आणून गोळीबार, २ ठार १६ जखमी
१९२२
राम गणेश गडकरी यांच्या निधनानंतर जवळजवळ ४ वर्षांनी त्यांनी लिहीलेल्या 'राजसंन्यास' नाटकाचा पहिला प्रयोग झाला.
१९२०
शिवराम महादेव परांजपे यांनी 'स्वराज्य' नावाचे साप्ताहिक सुरू केले.
१८५१
आयझॅक सिंगरला शिवणाच्या मशीनचे पेटंट मिळाले.
=========================================
ब) जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:
  -----------------------------
१९५९
प्रवीण ठिपसे
प्रवीण ठिपसे – बुद्धीबळपटू, ग्रँडमास्टर नॉर्म मिळवणारा पहिला भारतीय, भारताचा तिसरा ग्रँडमास्टर (१. विश्वनाथन आनंद २. दिव्येंदू बारुआ), अर्जुन अवॉर्ड विजेता (१९८४), ७ वेळा राष्ट्रीय विजेतेपद (१९८२, १९८४, १९८५, १९८९, १९९२ १९९३ आणि १९९४), चेस ऑलीम्पियाडस मध्ये ७ वेळा भारताचे प्रतिनिधित्व (१९८२, १९८४, १९८८, १९९२, १९९४, १९९८ आणि २००२), सर्वोच्च फिडे रेटिंग २५१५ (१९९५)
१९४८
फकिरा मुंजाजी तथा 'फ. मुं.' शिंदे – कवी, समीक्षक व अनुवादक
१९२६
बी. आर. तथा अप्पासाहेब खेडकर – गणेशमुर्तीकार ते शिल्पकार असा प्रवास करणारे कलाकार, राष्ट्रीय नेत्यांच्या शिल्पकृतींपासून अगदी 'मुगल-ए-आझम' चित्रपटाच्या सेटवरील शिल्पांपर्यंत त्यांनी कारकीर्द गाजवली, कलाकारांचे हुबेहूब मुखवटे तयार करुन ते डमी म्हणून वापरण्याचा प्रयोग त्यांनीच सुरू केला.
(मृत्यू: १३ ऑगस्ट २०१६)
१९२४
मुहम्मद झिया उल हक – पाकिस्तानचे ६ वे राष्ट्राध्यक्ष
(मृत्यू: १७ ऑगस्ट १९८८)
१९१९
डॉ. विक्रम साराभाई – भारतीय अवकाश संशोधन कार्यक्रमाचे शिल्पकार
(मृत्यू: ३१ डिसेंबर १९७१)
१९०६
लेफ्टनंट जनरल शंकरराव पांडुरंगराव (पाटील) तथा एस. पी. पी. थोरात यांचे निधन. संयुक्त राष्ट्रसंघाने शांतता प्रस्थापनेसाठी कोरियात पाठवलेल्या शांतिसेनेचे ते सेनापती होते. कीर्तिचक्र, पद्मश्री, सावरकर पुरस्कार असे अनेक मानसन्मान त्यांना मिळाले होते.
(मृत्यू: १० ऑगस्ट १९९२)
१८९२
एस. आर. रंगनाथन – भारतीय गणितज्ञ व ग्रंथालयशास्त्रतज्ञ
(मृत्यू: २७ सप्टेंबर १९७२)
१८८७
आयर्विन श्रॉडिंगर – नोबेल पारितोषिक विजेता ऑस्ट्रियन भौतिकशास्त्रज्ञ
(मृत्यू: ४ जानेवारी १९६१)
१८८१
सेसिल डी मिल – अमेरिकन चित्रपट अभिनेता, निर्माता व दिग्दर्शक
(मृत्यू: २१ जानेवारी १९५९)
१८८०
बाळकृष्ण गणेश खापर्डे – चरित्रकार,वाड्मयविवेचक
(मृत्यू: ? ? ????)
१८०१
जॉन कॅडबरी – ब्रिटिश उद्योगपती व 'कॅडबरी' चे संस्थापक
(मृत्यू: ११ मे १८८९)
=========================================
क) मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:
    -------------------------
२००५
लक्ष्मण कादिरमगार – श्रीलंकेचे परराष्ट्रमंत्री, मुत्सद्दी, वकील व तामिळ नेते
(जन्म: १२ एप्रिल १९३२)
१९८४
आनंदीबाई जयवंत – कवी, समीक्षक व अनुवादक
(जन्म: ? ? ????)
१९८२
हेन्‍री फोंडा – अमेरिकन अभिनेते
(जन्म: १६ मे १९०५)
१९७३
दयानंद बाळकृष्ण ऊर्फ 'भाऊसाहेब' बांदोडकर – गोव्याचे पहिले मुख्यमंत्री, महाराष्ट्रवादी गोमांतक पक्षाचे संस्थापक, उद्योगपती आणि दानशूर
(जन्म: १२ मार्च १९११)
१९६८
बाळशास्त्री व्यंकटेश हरदास – नामवंत वक्ते आणि विद्वान साहित्याचार्य
(जन्म: ? ? ????)
१९६४
इयान फ्लेमिंग – दुसर्‍या महायुध्दातील गुप्तहेर, लेखक, पत्रकार आणि 'जेम्स बाँड'चा जनक
(जन्म: २८ मे १९०८)
=========================================

-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-12.08.2023-शनिवार.
=========================================