१३-ऑगस्ट-दिनविशेष-B

Started by Atul Kaviraje, August 13, 2023, 06:01:50 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

मित्र/मैत्रिणींनो,

     आज दिनांक-१३.०८.२०२३-रविवार. जाणून घेऊया,आजच्या दिवसाचे "दिन-विशेष"

                               "१३-ऑगस्ट-दिनविशेष"
                              ----------------------

-: दिनविशेष :-
१३ ऑगस्ट
आंतरराष्ट्रीय डावखुरे दिन
=========================================
क) मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:
    -------------------------
२०१८
सोमनाथ चटर्जी – १४ व्या लोकसभेचे सभापती (४ जून २००४ ते ३१ मे २००९), लोकसभा खासदार (१० वेळा), मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे नेते
(जन्म: २५ जुलै १९२९)
२०१६
बी. आर. तथा अप्पासाहेब खेडकर – गणेशमुर्तीकार ते शिल्पकार असा प्रवास करणारे कलाकार, राष्ट्रीय नेत्यांच्या शिल्पकृतींपासून अगदी 'मुगल-ए-आझम' चित्रपटाच्या सेटवरील शिल्पांपर्यंत त्यांनी कारकीर्द गाजवली, कलाकारांचे हुबेहूब मुखवटे तयार करुन ते डमी म्हणून वापरण्याचा प्रयोग त्यांनीच सुरू केला.
(जन्म: १२ ऑगस्ट १९२६)
२०१६
प्रमुख स्वामी महाराज – स्वामीनारायण पंथातील अध्यात्मिक गुरू
(जन्म: ७ डिसेंबर १९२१)
२०००
नाझिया हसन – पाकिस्तानी पॉप गायिका
(जन्म: ३ एप्रिल १९६५)
१९८८
गजानन जागीरदार – चित्रपट निर्माते, दिग्दर्शक व अभिनेते, 'फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्युट ऑफ इंडिया'चे
(FTII) पहिले संचालक
(जन्म: २ एप्रिल १९०७)
१९८५
जे. विलार्ड मेरिऑट – मेरिऑट कॉर्पोरेशनचे संस्थापक
(जन्म: १७ सप्टेंबर १९००)
१९८०
पुरुषोत्तम भास्कर तथा पु. भा. भावे – अष्टपैलू आणि प्रतिभासंपन्न साहित्यिक
(जन्म: १२ एप्रिल १९१०)
१९१०
फ्लॉरेन्स नायटिंगेल
फ्लॉरेन्स नायटिंगेल – आधुनिक शुश्रूषा शास्त्राचा (नर्सिंग) पाया घालणार्‍या ब्रिटिश परिचारिका आणि संख्याशास्त्रज्ञ. १९०७ मधे त्यांना 'ऑर्डर ऑफ मेरिट' हा किताब बहाल करण्यात आला. 'नोटस ऑफ नर्सिंग' हा त्यांचा ग्रंथ नावाजलेला आहे.
(जन्म: १२ मे १८२०)
एच. जी. वेल्स
२० सप्टेंबर १९२६
हर्बर्ट जॉर्ज तथा एच. जी. वेल्स – विज्ञानकथांसाठी प्रसिद्ध असलेले इंग्लिश लेखक
(जन्म: २१ सप्टेंबर १८६६)
१९३६
मॅडम भिकाजी रुस्तुम कामा – या भारतीय क्रांतिकारक महिला व परदेशातील भारतीय क्रांतिकारकांच्या आधारस्तंभ होत्या. १९०७ मधे जर्मनीत भरलेल्या आंतरराष्ट्रीय समाजवादी परिषदेत ब्रिटिशांच्या विरोधाला न जुमानता त्यांनी भारतीय स्वातंत्र्यासंबंधी प्रस्ताव मांडला. त्याच वेळी भारतीय स्वातंत्र्याचे प्रतीक म्हणून 'वंदे मातरम' हा मंत्र असलेला तिरंगी ध्वज त्यांनी फडकावला.
(जन्म: २४ सप्टेंबर १८६१)
१९१७
एडवर्ड बकनर – आंबवण्याच्या प्रक्रियेसंबंधी केलेल्या संशोधनाबद्दल नोबेल पारितोषिक (१९०७) मिळवणारे जर्मन रसायनशास्त्रज्ञ
(जन्म: २० मे १८६०)
१७९५
अहिल्याबाई होळकर
१९९६ मध्ये जारी केलेले टपाल तिकीट
पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर – माळवा साम्राज्याच्या महाराणी, आपल्या साम्राज्यात त्यांनी औद्योगिकरणाला चालना दिली तसेच देशातील अनेक महत्त्वाच्या तीर्थक्षेत्रातील देवळांचा जीर्णोद्धार केला.
(जन्म: ३१ मे १७२५ - चोंडी, जामखेड, अहमदनगर)
=========================================

-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-13.08.2023-रविवार.
=========================================