मैत्रीतले प्रेम

Started by mkapale, August 14, 2023, 10:04:46 AM

Previous topic - Next topic

mkapale

मैत्रीतले प्रेम

काय बोलावे अन काय नको, कसे ते ठरवावे
आरश्याला भाव अपुले वेगळे कसे दिसावे
मित्र आम्ही, जाणतो मनातले सगळे तर
त्याला प्रेम माझे प्रेमागत, कसे ते दिसावे

पाण्यात कशी मी मारू सांग एक रेघ ती
तू मैत्री आणि मी प्रेम वेगळे कसे घ्यावे
भास वाटे,आहेस तू दिन रात सोबतीला
रोज भेटता नव्याने मी प्रेमात का पडावे

दावू कसा तुला, मैत्रीला लागला रंग गुलाबी
तुझ्या स्पर्शात आता अंतर मी कसे शोधावे
पाहतो तू मला क्षणभर नजर टाकुनी जेव्हा
तू पळभर अन मी क्षण तो युगासारखे जगावे

मैत्रीच्या चौकटीतून आता मुक्त होऊ पाहे
मी तुझी तू माझा हे तुला स्पष्ट आता सांगावे
पारदर्शी आहे जर, तळ माझे तुला दिसावे
प्रेम-सावली लांबत आहे , तुलाहि ते उमगावे

सखा सांगाती होतास , सर्वस्व मानते आता
घालमेल माझ्या जीवाची का, असे तू विचारावे
फुल आहे आज हाती, परी रंग त्याचा वेगळा
पाहून ते,  घेऊन हाती,  तू मला स्वीकारावे