विरह कविता-पावसातील त्या हृदयी जपलेल्या आठवणी, मनास व्यथित करणारी विरहाची गाणी

Started by Atul Kaviraje, August 15, 2023, 10:44:58 AM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

मित्र/मैत्रिणींनो,

     आज मी तुम्हाला, पावसातली एक विरह प्रेम कविता-गीत ऐकवितो. "वो लम्हे, वो बातें कोई ना जाने, थी कैसी रातें हो... ओ बरसातें"- या हिंदी गाण्यावर ते आधारित आहे. आशा आहे ते तुम्हाला आवडेल. भरभरून लाईक करा, व मला प्रोत्साहित करा. आपणा सर्वांस ऑगस्ट महिन्याची ही मळभ असलेली व काळे ढग जमलेली, थोडासा प्रकाश असलेली मंगळवार-सकाळ आनंदाची जावो, ही सदिच्छा.

--मूळ हिंदी गाणे-( वो लम्हे, वो बातें कोई ना जाने, थी कैसी रातें हो... ओ बरसातें )           
-----------------------------------------------------------------------

  "पावसातील त्या हृदयी जपलेल्या आठवणी, मनास व्यथित करणारी विरहाची गाणी"
-----------------------------------------------------------------------

पावसातील त्या हृदयी जपलेल्या आठवणी
मनास व्यथित करणारी विरहाची गाणी
पावसाची ती घनघोर मुसळधार बरसणारी रात्र,
अन ओठंIवर आलेली थांबत घरंगळलेली तराणी

पावसातील त्या हृदयी जपलेल्या आठवणी
मनास व्यथित करणारी विरहाची गाणी
पावसातील तो लम्हा, ते बेचैन करणारे क्षण,
अवचित होत होते नाहीसे, आठवणींची शाल पांघरुनी

त्या पावसातच अIली होती आमच्या प्रेमाला नव्हाळी
अंकुर फुटून धरली होती पालवी तिला कोवळी
तो पाऊस साक्षी होता, जेव्हा मी तिला घेतले होते जवळी,
ती रात्र होती पावसाची, तो ओलI ऋतू होता पावसाळी

आमचं प्रेम बहरलं होत, मनात आमच्या बरसलं होतं
मोहर फुलून फुलांच्या रंग गंधाने ते डवरलं होतं 
ते आमचे प्रेम फक्त तोच जाणत होता, तोच साक्षीदार होता,
ही गोष्ट कुणालाच नव्हती माहीत, पाऊस वफादार होता

एकमेकांच्या प्रेमात आम्ही आकंठ होतो बुडालो
आम्ही तेव्हा स्वतःचेच नव्हतो राहिलो, एकमेकांचे होतो झालो
धारा अंगावर घेत पावसाच्या, एकमेकांच्या मिठीत धुंद होतो,
तृषित अधरIतले प्राषित मधू, नशेत, कैफात बंद होतो

अवचित काही घडून आले, तुला आणि मला नाही कळले
तुझ्या आणि माझ्या प्रेमात वितुष्ट आले, ते उधळले गेले
याचा काहीच नव्हता अंदाज, नव्हता काहीही हासभास,
ताटातूट होताना आपल्या दोघांच, मन होत होतं उदास

कुणाल दोष द्यावा, कुणाला नाही, काहीच नव्हतं उमगत
विरहाच्या अग्नीत होतो दोघंही तडफडत, जळत
आता पुन्हा एक होणं शक्य होत का, मिलन होणार होत का ?,
बहरलेला हा मोसम, अचानक पानगळीत रूपांतरित होत होता का ?

अचानक ही कृष्ण-छाया अवतरली होती, झाकोळून टाकत होती
चमकत्या उन्हावर पडछाया टाकून, त्याला काबीज करीत होती
हा ऋतू पूर्णपणे बदलला होता, जहरी, विखारी वाटत होता,
ओला शिडकावा त्याचा आता, तप्त अग्नीचI भडका देत होता

ही ताटातूट, हा विरह असह्य होता, मन दुखावणारI होता
ही फारकत, ही जुदIई जीवघेणी होती, मनाला जाचत होती
मन खफा होत होतं, उदास, व्यथित, कारुण्याने भरत होतं,
प्रेमाचा असंI झालेला विचका, दुःख डोळ्यांवाटे झरत होतं

पावसातील त्या हृदयी जपलेल्या आठवणी
मनास व्यथित करणारी विरहाची गाणी
मनास विदीर्ण करीत त्या आठवणी वहIत जात होत्या,
मानस पटलावरून त्या प्रेम-सयी पुसल्या जात होत्या

पावसातील त्या हृदयी जपलेल्या आठवणी
मनास व्यथित करणारी विरहाची गाणी
विरहात बुडालेल्या दुःखी मनाचा वाली नव्हतंI कुणी,
फक्त जगणेच होते हाती काढून एकमेकांच्या आठवणी

या आपल्या प्रेमाला कोणाची दृष्ट लागली होती, नाट लागली होती
उत्कट प्रेम होते, भरलेली प्रेम-घागर जणू उतू चालली होती
सागरापेक्षाही गहिरे होते, ठाव, थांग नव्हतंI आमच्या प्रेमाचंI,
बहरलेलं होत प्रेम, रसरशीत, चमकदार, रंगीबेरंगी गंधित कुसूमचI

कुठूनशी ही काली घटI अचानक अवतरली, दाटून राहिली
घनघोर, काळ्या शाईच्या रंगाने आमच्या प्रेमाला विघटून गेली
ती गाणी, ती मधुर तराणी आता दुःखाच्या विराणींनी विभागून राहिली,
दोघांनाही अलग करीत नियती, क्रूर हास्यात खदाखदा हसत राहिली

सारा बहर विसकटून गेला, प्रेमाची फुले कुस्करली गेली
सारी बहरलेली बाग विराण झाली, उजाड झाली, माळरान झाली
आता परत ती कधीही फुलणार नव्हती, कधीही बहरणार नव्हती,
आता त्या झाडांवर कधीही ती मोहक, सुंदर फुले फुलणार नव्हती

आता फक्त आठवणीच उरल्या होत्या, नयनावाटे झरत होत्या
आता हा ओला ऋतूही मनIस शांत करीत नव्हता, शीत करीत नव्हता
आता फक्त आठवणींवरच जगायचे होते, मनIस समजावयाचे होते,
पावसाचे पाणी, डोळ्यांतील पाण्याला बळेबळेच पुसत होते

पावसातील त्या हृदयी जपलेल्या आठवणी
मनास व्यथित करणारी विरहाची गाणी
आता आठवणीत उरलीय माझी ती करून कहाणी,
पण तरीही नाही विसरता येत मज त्या हृद्य आठवणी

पावसातील त्या हृदयी जपलेल्या आठवणी
मनास व्यथित करणारी विरहाची गाणी
माझ्या मनIस मी समजाविलेय, त्याला मी सांगितलेय,
दुःख विसरून जा, यापुढे तू फक्त गI पावसाची गाणी

-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-15.08.2023-मंगळवार.
=========================================