भारताचा स्वातंत्र्य दिवस-निबंध-3

Started by Atul Kaviraje, August 15, 2023, 10:57:09 AM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje


                                "भारताचा स्वातंत्र्य दिवस"
                               -----------------------

मित्र/मैत्रिणींनो,

     आज दिनांक-१५.०८.२०२३ आहे. आज "भारताचा स्वातंत्र्य दिवस" आहे. पंडित जवाहरलाल नेहरू यांनी दिल्लीतल्या लाल किल्ल्यावरून १५ ऑगस्ट १९४७ ला तिरंगा ध्वज फडकवला. त्यानंतर १५ ऑगस्ट १९४७ या दिवशी भारताचा स्वातंत्र्य दिन साजरा करण्याची प्रथा सुरू झाली. आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळून आता ७५ वर्षे पूर्ण झाली आहेत. १५ ऑगस्ट १९४७ रोजी भारताला स्वतंत्र राष्ट्र म्हणून मान्यता मिळाली. या मान्यतेसाठी देशाच्या सेनानींनी सर्वस्वाचा त्याग केला आहे. स्वातंत्र्याचा हा उत्सव प्रत्येक घरात आणि प्रत्येक संस्थेत दिसत असला, तरी राष्ट्रीय स्तरावर हा कार्यक्रम दिल्लीच्या लाल किल्ल्यावर आयोजित केला जातो. मराठी कवितेच्या माझ्या सर्व बंधू-भगिनी कवी-कवयित्रींना १५ ऑगस्टच्या अनेक हार्दिक शुभेच्छा. वाचूया वाचूया एक निबंध.

             15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिन मराठी निबंध--

     इंग्रजांचा हा धुर्तपणा काहींनी ओळखला होता त्यामुळे त्यांनी इंग्रजांविरुद्ध शास्त्र उभारले त्यामध्ये तात्या टोपे, झाशीची राणी लक्ष्मी बाई, नाना साहेब पेशवे, वासुदेव बळवंत फडके, क्रांतिवीर भगतसिंग, राजगुरू, सुखदेव, चंद्रशेखर आझाद, चाफेकर बंधू इ. क्रांतिकारक होते. त्यांनी आपला निषेध शास्त्रांद्वारे नोंदविला. काहींनी इंग्रजांची हत्या केली तर काही लोकजागृती करत लोकांच्या मनात स्वातंत्र्यविषयी तीव्र भावना जागी केली. रानडे, गोखले, टिळक, आगरकर यांनी लेखणी हातात घेतली. त्यांनी वाणीचा आणि लेखणीचा वापर करून इंग्रजांकडून होणारा अन्याय आणि जुलूम याची जनतेला जाणीव करून दिली. महात्मा फुले यांनी अस्पृश्यता मिटवण्यासाठी प्रयत्न केले. भारतीय जनतेला त्यांची स्थिती सुधारण्यासाठी या लोकांनी प्रेरणा , जाणीव करून दिली. ' स्वातंत्र्य हि काही भीक मागून मिळणारी गोष्ट नाही, त्यासाठी इंग्रज सरकारला जाब विचारला पाहिजे' अशा प्रकारे क्रांतिकारकांनी तरुणांना प्रेरणा दिली. "बंदिवानही भारतमाता आज फोडीते टाहो, मातेच्या स्वातंत्र्याला घरदार सोडूनि याहो" अशा प्रकारे आव्हान करून सर्वांना या लढ्यात क्रांतिकारक सामावून घेत होते.

     टिळक आणि सावरकरांनी आपली उमेदीची वर्षेच तुरुंगात घालवली. त्यानंतर महात्मा गांधीजींच्याकडे देशाचे नेतृत्व आले. महात्मा गांधीजींनी जनतेला सत्याग्रह आणि अहिंसा या मार्गाने जाण्याचा सल्ला दिला. त्याचबरोबर स्वदेशी, स्वावलंबन, असहकार या मार्गानेही इंग्रजांच्या विरुद्ध लढण्याचे आवाहन केले. सरकारी जुलमीकायदे, अन्याय, नोकऱ्या, दडपशाही या विरुद्ध सत्याग्रहाची मोहीम गांधीजींनी सुरु केली. गांधीजींना या कमी जवाहरलाल नेहरू, सरदार वल्लभभाई पटेल, मौलाना आझाद इ. अनेक नेत्यांनी सहकार्य केले. सुभाषचंद्र भोस यांनी इंग्रजांच्या विरोधात 'आझाद हिंद सेना' उभारली.

     १५ ऑगस्ट या दिवशी स्वातंत्र्य मिळाले खरे पण या स्वातंत्र्याला गालबोट लागले ते फाळणीचे. भारताचे दोन तुकडे झाले. एक हिंदुस्थान आणि एक पाकिस्तान. मुस्लिम लीग च्या मागणीमुळे भारताची फाळणी झाली. त्यावेळी खूप ठिकाणी हिंसाचार झाला. त्यातूनही आपला भारत देश सावरला आणि पुढे जात राहिला. आणि जगाला शांतीचा संदेश देतच राहिला. देशाला सावरण्यासाठी नेतेमंडळी झटत राहिली.

     तुलसीदासजी म्हणतात, 'पराधीन सपनेहू सुखानाही' म्हणजे गुलामगिरीमध्ये तर स्वप्नातदेखील सुख नसते. ज्यावेळी आपला देश गुलाम होता, तेव्हा जगात आपला झेंडा नव्हता आणि आपले कोणतेही संविधान नव्हते. आज आपण पूर्णपणे स्वतंत्र आहोत आणि पूर्ण जगभरात भारताची एक स्वतंत्र ओळख आहे आणि आमचे संविधान हे आज संपूर्ण जगासाठी एक उदाहरण आहे. यामध्ये सर्व देशवासियांना समानतेचा अधिकार आहे. आमचा राष्ट्रीय झेंडा प्रेम, बंधुत्व आणि ऐक्याचे प्रतीक आहे.

     आपले हे सौभाग्याचं आहे की आपण या भारताच्या पवित्र भूमीवर जन्म घेतला आणि स्वातंत्र्याच्या या सुंदर वातावरणात श्वास घेतला. देशप्रेम एक पवित्र भावना आहे जी प्रत्येक नागरिकांमध्ये असणं आवश्यक आहे. आपल्याला आपल्या भारताला सुवर्ण पक्ष्यासारखे बनवायचे आहे. आणि आपल्याला खरा स्वातंत्र्याचा अर्थ जगभर पसरवायचा आहे. शांतीचा संदेश द्यायचा आहे. त्यासाठी प्रत्येक भारतीयाने आपले स्वातंत्र्य असेच अबाधित ठेवण्यासाठी असेल प्रयत्न केले पाहिजेत. प्रत्येक भारतीयाने आपल्या अधिकारांसोबतच किंबहुना त्याहीपेक्षा जास्ती आपल्या कर्तव्यासाठी जागरूक असणे गरजेचे आहे आणि त्याचे पालन करणेही गरजेचे आहे, तरच आपला देश संपूर्ण जगात एक महासत्ता म्हणून समोर येईल. अनेक आव्हाने पेलायची आहेत आज स्वतंत्र लढ्यातील हुतात्म्यांना स्मरण करताना आणि आपल्या देशावरील प्रेम व्यक्त करताना हि आव्हाने पेलण्याच्या जिद्दीला,एक समाज म्हणून आपल्या एकसंध प्रयत्नांना व लोकशाही मूल्यांना अधिक बळकट करण्याचा, त्यांना बळ देण्याचा निर्धार करूया.

उत्सव तीन रंगाचा,
आभाळी आज सजला,
नतमस्तक मी त्या सर्वासाठी,
ज्यांनी भारत देश घडविला...
भारत देशाला मनाचा मुजरा...

--चेतन  जासूड 
--------------

                         (साभार आणि सौजन्य-संदर्भ-मराठीप्रो.कॉम)
                        ---------------------------------------

-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-15.08.2023-मंगळवार.
=========================================