भारताचा स्वातंत्र्य दिवस-निबंध-5

Started by Atul Kaviraje, August 15, 2023, 11:17:37 AM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

                                "भारताचा स्वातंत्र्य दिवस"
                               -----------------------

मित्र/मैत्रिणींनो,

     आज दिनांक-१५.०८.२०२३ आहे. आज "भारताचा स्वातंत्र्य दिवस" आहे. पंडित जवाहरलाल नेहरू यांनी दिल्लीतल्या लाल किल्ल्यावरून १५ ऑगस्ट १९४७ ला तिरंगा ध्वज फडकवला. त्यानंतर १५ ऑगस्ट १९४७ या दिवशी भारताचा स्वातंत्र्य दिन साजरा करण्याची प्रथा सुरू झाली. आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळून आता ७५ वर्षे पूर्ण झाली आहेत. १५ ऑगस्ट १९४७ रोजी भारताला स्वतंत्र राष्ट्र म्हणून मान्यता मिळाली. या मान्यतेसाठी देशाच्या सेनानींनी सर्वस्वाचा त्याग केला आहे. स्वातंत्र्याचा हा उत्सव प्रत्येक घरात आणि प्रत्येक संस्थेत दिसत असला, तरी राष्ट्रीय स्तरावर हा कार्यक्रम दिल्लीच्या लाल किल्ल्यावर आयोजित केला जातो. मराठी कवितेच्या माझ्या सर्व बंधू-भगिनी कवी-कवयित्रींना १५ ऑगस्टच्या अनेक हार्दिक शुभेच्छा. वाचूया वाचूया एक निबंध.

            स्वातंत्र्य दिवस मराठी निबंध--

     15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिन या दिवशी दिल्लीमध्ये म्हणजेच आपल्या राष्ट्रीय राजधानीत तसेच सर्व देशांच्या शाळा, महाविद्यालये, कार्यालये या ठिकाणे नाच गाणी व मनोरंजनाचे कार्यक्रम होतात. आसमंत देशभक्तीपर गीतांनी आणि भाषणांनी भरून जातो. लहान मुलांची सकाळी प्रभात फेरी निघते. छोटी छोटी मुले पूर्ण गणवेशात शाळेत हजर असतात. लहान मुलांना हातात झेंडे घेऊन नाचत फिरताना पाहून खूप मजा वाटते. सगळीकडे झेंडावंदनाचे कार्यक्रम होतात. सैनिकांच्या संचालनाचे कार्यक्रमही पाहण्यासारखा असतो. तिन्ही दलाचे सैनिक त्यांच्या कवायती सादर करतात. ते पाहताना उर अभिमानाने भरून जातो. आणि त्यातून जे प्रोत्साहन मिळते ते काही वेगळेच असते. लहान मुलांनाही याचे खूप अप्रूप वाटते आणि तेही देशासाठी काहीतरी करायची स्वप्न पाहायला लागतात.

     आपला तिरंगा आसमंतात फडकताना आपल्याला काही संदेश देतो असेच वाटते. वर केशरी, मध्ये पंधरा आणि खाली हिरवा तसेच मध्ये पांढरा रंग आपल्यात नवी ऊर्जा निर्माण करतो. केशरी रंग बलिदानाचे प्रतीक असतो. पांढरा रंग पवित्रतेचे संदेश देतो. हिरवा रंग समृद्धी दाखवतो. मध्ये असणारे अशोक चक्र विकासाचे प्रतिक दर्शवतो.

     स्वतंत्र देशाचे स्वतंत्र नागरिक म्हणून मिरवताना खूपच अभिमान वाटतो. त्या दिवशी भारत सरकार अनेक मान्यवर व्यक्तींना राष्ट्रीय पुरस्कार प्रदान करतात.देशातील कर्तृत्ववान व्यक्तींचा गौरव करून त्यांचे कौतुक करण्याचा हा दिवस असतो. सारा देश हे कौतुक आपल्या दूरदर्शन वर पाहत असतो. बऱ्याच लोकांना दिल्ली ला जाऊन हा कार्यक्रम साजरा करणे प्रत्यक्षात शक्य होत नसल्याने दूरदर्शनच्या माध्यमातून हा कार्यक्रम दाखवण्याची उत्तम सोय केलेली असते. हे पाहताना त्या व्यक्तींविषयी आदर अजून वाढतो आणि अभिमानही वाढतो. कितीही कठीण परिस्थिती असूदेत सगळीकडे अंधकार असला तरी अशाही परिस्थितीत अनेक सामन्यातून असामान्य असलेल्या व्यक्ती पुढे येतात हे आमचे वैशिष्ट्य आहे. हि माणसेच आपल्या राष्ट्राची संपत्ती आहेत. आणि त्यांचा आदर करणे हे आपले कर्तव्य आहे.

     सर्व नागरिकांमध्ये राष्टाविषयी प्रेम आणि अभिमान जागृत करण्यासाठी तसेच सर्वांमध्ये एकीची भावना प्रज्वलित करण्यासाठी आपण सर्वानी एकत्र येऊन हा दिवस साजरा करायलाच हवा. एकी आणि देशाभिमान यांच्या जोरावर आपण आपल्या देशापुढील अनेक प्रश्न समाधानकारकरित्या सोडवू शकतो. स्वातंत्र्य दिन हा असा दिवस आहे कि जो सर्व धर्म-पंथ-भाषेच्या नागरिकांना जोडतो. या सगळ्यामुळे झालेला भेद मिटविण्याचे सामर्थ्य या दिवसात आहे. त्यामुळे जो देश " विविधतेमध्ये एकटा" चा अभिमान धरतो त्या भारतासारख्या देशाला हा दिवस फार महत्वाचा आहे व त्यामुळेच तो दरवर्षी आनंदाने आणि अभिमानाने साजरा होणे गरजेचे आहे. आपल्याला आपल्या पूर्वजांनी देशासाठी केलेल्या त्याग, बलिदानाची जण आहे व ती लक्षात ठेवून आपण आपल्या पूर्वपिढ्यानी आयुष्य वेचत मिळविलेले हे स्वातंत्र्य अबाधित ठेवण्यास सक्षम आहोत व आमच्याकडे आता कुणी तिरकस नजरेने बघू नये हे जगास दाखवायला तरी आपण हा विजय दिवस मोठ्या उत्साहात साजरा केला पाहिजे.

घे तिरंगा हाती
नभी लहरू दे उंचच उंच
जय हिंद जय भारत या जयघोषाने
गर्जु दे सारा आसमंत !

--चेतन जासूड 
-------------

                        (साभार आणि सौजन्य-संदर्भ-मराठीप्रो.कॉम)
                       ---------------------------------------

-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-15.08.2023-मंगळवार.
=========================================