भारताचा स्वातंत्र्य दिवस-कविता-1

Started by Atul Kaviraje, August 15, 2023, 11:19:55 AM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje


                                "भारताचा स्वातंत्र्य दिवस"
                               -----------------------

मित्र/मैत्रिणींनो,

     आज दिनांक-१५.०८.२०२३ आहे. आज "भारताचा स्वातंत्र्य दिवस" आहे. पंडित जवाहरलाल नेहरू यांनी दिल्लीतल्या लाल किल्ल्यावरून १५ ऑगस्ट १९४७ ला तिरंगा ध्वज फडकवला. त्यानंतर १५ ऑगस्ट १९४७ या दिवशी भारताचा स्वातंत्र्य दिन साजरा करण्याची प्रथा सुरू झाली. आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळून आता ७५ वर्षे पूर्ण झाली आहेत. १५ ऑगस्ट १९४७ रोजी भारताला स्वतंत्र राष्ट्र म्हणून मान्यता मिळाली. या मान्यतेसाठी देशाच्या सेनानींनी सर्वस्वाचा त्याग केला आहे. स्वातंत्र्याचा हा उत्सव प्रत्येक घरात आणि प्रत्येक संस्थेत दिसत असला, तरी राष्ट्रीय स्तरावर हा कार्यक्रम दिल्लीच्या लाल किल्ल्यावर आयोजित केला जातो. मराठी कवितेच्या माझ्या सर्व बंधू-भगिनी कवी-कवयित्रींना १५ ऑगस्टच्या अनेक हार्दिक शुभेच्छा. वाचूया काही कविता.

     स्वातंत्र्य दिन कविता मराठी 2023 | 15 ऑगस्ट कविता मराठी 2023 | Independence Day Poem in Marathi – नमस्कार मित्रांनो, आज आपण या लेखात स्वातंत्र्य दिनानिमित्त कविता मराठी मध्ये बघणार आहोत. येत्या 15 ऑगस्ट 2023 ला आपण 76 वा स्वातंत्र्य दिन साजरा करणार आहोत. अशावेळी आपल्या शाळेत, कार्यालयात विविध कार्यक्रम आयोजित केले जातात. अशा कार्यक्रमात भाषण किंवा सूत्रसंचालन करताना आपल्याला कवितेची फार आवश्यकता असते.

     मित्रहो या लेखात दिलेल्या कविता या आमच्या नाहीत. या कविता ज्यांच्या आहेत त्याचे क्रेडिट आम्ही कवितेच्या शेवटी दिलेले आहे. या सर्व कविता आम्ही येथे फक्त शैक्षणिक मदत म्हणून देत आहोत. याचा आपल्याला नक्कीच उपयोग होईल अशी आशा करतो. चला तर मित्रांनो वेळ वाया न घालवता कवितेला सुरुवात करुया.

             स्वातंत्र्य दिन कविता मराठी 2023--

तीन रंगाचा आमुचा तिरंगा,
केशरी, पांढरा अन् हिरवा !
नभी फडकत गातो,
नित्य पराक्रमाची गाथा !!

भारतीय इतिहासात,
तो दिवस अमर झाला !
15 ऑगस्टला,
आमुचा भारत स्वतंत्र झाला !!

ना जातीसाठी लढले,
ना धर्मासाठी लढले,
शूर भारतीय वीर,
फक्त देशासाठी लढले!!

तिरंगा आमुचा मान आहे,
पराक्रमाचे गाण आहे !
भारताची शान आहे,
तिरंगा आमुचा प्राण आहे !!

अनेक जातीधर्म सोबती,
आनंदाने हा राहतो !
देश माझा भारत,
विविधतेत एकता साधतो !!

                         (साभार आणि सौजन्य-संदर्भ-ऑर्डर.इन)
                        ------------------------------------

-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-15.08.2023-मंगळवार.
=========================================