भारताचा स्वातंत्र्य दिवस-कविता-3

Started by Atul Kaviraje, August 15, 2023, 11:24:42 AM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

                                "भारताचा स्वातंत्र्य दिवस"
                               -----------------------

मित्र/मैत्रिणींनो,

     आज दिनांक-१५.०८.२०२३ आहे. आज "भारताचा स्वातंत्र्य दिवस" आहे. पंडित जवाहरलाल नेहरू यांनी दिल्लीतल्या लाल किल्ल्यावरून १५ ऑगस्ट १९४७ ला तिरंगा ध्वज फडकवला. त्यानंतर १५ ऑगस्ट १९४७ या दिवशी भारताचा स्वातंत्र्य दिन साजरा करण्याची प्रथा सुरू झाली. आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळून आता ७५ वर्षे पूर्ण झाली आहेत. १५ ऑगस्ट १९४७ रोजी भारताला स्वतंत्र राष्ट्र म्हणून मान्यता मिळाली. या मान्यतेसाठी देशाच्या सेनानींनी सर्वस्वाचा त्याग केला आहे. स्वातंत्र्याचा हा उत्सव प्रत्येक घरात आणि प्रत्येक संस्थेत दिसत असला, तरी राष्ट्रीय स्तरावर हा कार्यक्रम दिल्लीच्या लाल किल्ल्यावर आयोजित केला जातो. मराठी कवितेच्या माझ्या सर्व बंधू-भगिनी कवी-कवयित्रींना १५ ऑगस्टच्या अनेक हार्दिक शुभेच्छा. वाचूया काही कविता.

                    स्वातंत्र्य दिन कविता मराठी 2023--

          स्वातंत्र्याच्या अफाट समरी--

स्वातंत्र्याच्या अफाट समरी
लढल्या कोटी विभूती
देहाच्या केल्या समिधा त्यांनी
अन् प्राणांची आहुती

चाफेकर फडके भगत बोस अन्
राणी ती झाशीची
कितीक द्यावी यादी येथे
अजरामर नावांची

पल्याड यांच्या अनेक अनामिक
जे झिजले या ध्येयाने
असावेत आज लाख दंडवत
त्यांच्याही नावाने

कृतज्ञता ही मनात राहो
मानून त्यांनी मी पथदर्शी
ते होते म्हणून आपण आहो
स्वतंत्र भारतवर्षी

--कवी – डॉ. मानसी देशपांडे
--------------------------

                          (साभार आणि सौजन्य-संदर्भ-ऑर्डर.इन)
                         ------------------------------------

-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-15.08.2023-मंगळवार.
=========================================