भारताचा स्वातंत्र्य दिवस-माहिती

Started by Atul Kaviraje, August 15, 2023, 11:44:49 AM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

                               "भारताचा स्वातंत्र्य दिवस"
                              -----------------------

मित्र/मैत्रिणींनो,

     आज दिनांक-१५.०८.२०२३ आहे. आज "भारताचा स्वातंत्र्य दिवस" आहे. पंडित जवाहरलाल नेहरू यांनी दिल्लीतल्या लाल किल्ल्यावरून १५ ऑगस्ट १९४७ ला तिरंगा ध्वज फडकवला. त्यानंतर १५ ऑगस्ट १९४७ या दिवशी भारताचा स्वातंत्र्य दिन साजरा करण्याची प्रथा सुरू झाली. आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळून आता ७५ वर्षे पूर्ण झाली आहेत. १५ ऑगस्ट १९४७ रोजी भारताला स्वतंत्र राष्ट्र म्हणून मान्यता मिळाली. या मान्यतेसाठी देशाच्या सेनानींनी सर्वस्वाचा त्याग केला आहे. स्वातंत्र्याचा हा उत्सव प्रत्येक घरात आणि प्रत्येक संस्थेत दिसत असला, तरी राष्ट्रीय स्तरावर हा कार्यक्रम दिल्लीच्या लाल किल्ल्यावर आयोजित केला जातो. मराठी कवितेच्या माझ्या सर्व बंधू-भगिनी कवी-कवयित्रींना १५ ऑगस्टच्या अनेक हार्दिक शुभेच्छा. वाचूया महत्त्वाची माहिती.

            ➡️ स्वातंत्र्य दिन घोषवाक्य मराठी

=========================================
शहीद जाहले अनेक शूरवीर रक्षण करण्या भारत भूमीचे, मुळीच नाही विसरू आपण 'बलिदान या क्रांतिवीरांचे ॥

चंदन करूच्या त्या लढवय्यांना जे लढले स्वातंत्र्यासाठी, भाऊया राष्ट्रगान आपल्या भारत मातेसाठी !!

विविधतेने नटलेला माझा भारत देश महान, विविधतेतही एकता हीच खरी भारताची शान ॥

भूमीवर या वाहे पवित्र यमुना आणि गंगा,
उंच आकाशी फडकत राहे आमचा प्रिय तिरंगा ॥

स्वतंत्रता दिवस आहे भारताच्या विजयाचा,
गर्व आहे मला मी भारतीय असल्याचा !!
=========================================

                  FAQ--

Q.1) स्वातंत्र्य दिन कधी आहे ?
Ans. स्वातंत्र्य दिन 15 ऑगस्टला आहे.

Q.2) भारताला स्वातंत्र्य कोणत्या साली मिळाले ?
Ans. भारताला स्वातंत्र्य १५ ऑगस्ट १९४७ या साली मिळाले.

Q.3) भारताचा १५ ऑगस्ट २०२२ हा कितवा स्वातंत्र्य दिन आहे ?
Ans. भारताचा १५ ऑगस्ट २०२२ हा ७६ वा स्वातंत्र्य दिन आहे.

--DRx Chakradhar.S.More
-----------------------------

-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-15.08.2023-मंगळवार.
=========================================