भारताचा स्वातंत्र्य दिवस-शुभेच्छा-1

Started by Atul Kaviraje, August 15, 2023, 11:47:12 AM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje


                                "भारताचा स्वातंत्र्य दिवस"
                               -----------------------

मित्र/मैत्रिणींनो,

     आज दिनांक-१५.०८.२०२३ आहे. आज "भारताचा स्वातंत्र्य दिवस" आहे. पंडित जवाहरलाल नेहरू यांनी दिल्लीतल्या लाल किल्ल्यावरून १५ ऑगस्ट १९४७ ला तिरंगा ध्वज फडकवला. त्यानंतर १५ ऑगस्ट १९४७ या दिवशी भारताचा स्वातंत्र्य दिन साजरा करण्याची प्रथा सुरू झाली. आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळून आता ७५ वर्षे पूर्ण झाली आहेत. १५ ऑगस्ट १९४७ रोजी भारताला स्वतंत्र राष्ट्र म्हणून मान्यता मिळाली. या मान्यतेसाठी देशाच्या सेनानींनी सर्वस्वाचा त्याग केला आहे. स्वातंत्र्याचा हा उत्सव प्रत्येक घरात आणि प्रत्येक संस्थेत दिसत असला, तरी राष्ट्रीय स्तरावर हा कार्यक्रम दिल्लीच्या लाल किल्ल्यावर आयोजित केला जातो. मराठी कवितेच्या माझ्या सर्व बंधू-भगिनी कवी-कवयित्रींना १५ ऑगस्टच्या अनेक हार्दिक शुभेच्छा. वाचूया 75 व्या स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा.

     या वर्षी 15 ऑगस्ट 2023 रोजी भारत देशाच्या स्वातंत्र्य दिनाचा 75 वा वर्धापन दिन साजरा करत आहे. 15 ऑगस्ट 1947 या दिवशी इंग्रजांनी भारत सोडला आणि भारताने स्वातंत्र्याचा श्वास घेतला. 15 ऑगस्ट 2023 रोजी, स्वातंत्र्याची 75 वर्षे पूर्ण झाली आहेत आणि या निमित्ताने देशभर अमृत महोत्सव आनंदाने साजरा केला जात आहे. या दिवशी, भारताचे पंतप्रधान लाल किल्ल्यावर राष्ट्रीय ध्वज फडकावून भाषण देतात. यासह सर्व शाळा व कार्यालयांमध्ये तिरंगा देखील फडकविला जातो. भारताच्या स्वातंत्र्याच्या 75 वर्षांच्या स्मरणार्थ भारत सरकारने 'आझादी का अमृत महोत्सव' 😇 आणि 'हर घर तिरंगा' अभियान' सुरू केले आहेत.

     लोक 15 ऑगस्टला एकमेकांना अभिवादन करतात आणि अनेक ठिकाणी मिठाई, चॉकलेट्सचा वाटप देखील केले जातात. तसेच लोक एकमेकांना (Independence Day messages in Marathi) स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा Whatsapp किव्हा facebook वर देत देत आहेत. आपण देखील आपल्या मित्रांना स्वातंत्र्यदिनानिमित्त शुभेच्छा देऊ इच्छित असाल तर आपण खालील 15 August Wishes in Marathi मधील शुभेच्छा संदेशांचा वापर करू शकता.

            75 व्या स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा--

=========================================
आज सलाम आहे त्या वीरांना
ज्यांच्यामुळे आज हा दिवस पाहिला...
ती आई आहे भाग्यशाली जिच्यापोटी
जन्मलेल्या वीरांमुळे हा देश अखंड राहिला...
स्वातंत्र्यदिनाच्या हार्दिक शुभेच्छा.

ना धर्माच्या नावावर जगा ना...
ना धर्माच्या नावावर मरा...
माणुसकी धर्म आहे या देशाचा...
फक्त देशासाठी जगा...
स्वातंत्र्यदिनाच्या हार्दिक शुभेच्छा.

रंग, रूप, वेश, भाषा जरी अनेक आहेत,
तरी सारे भारतीय एक आहेत...
75 व्या स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा !

स्वातंत्र्य वीरांना करूया शत शत प्रणाम,
त्यांच्या निस्वार्थ त्यागानेच भारत बनला महान...
स्वातंत्र्यदिनाच्या हार्दिक शुभेच्छा.

चला पुन्हा एकदा आठवूया तो नजारा....
शहिदांच्या हृदयातील ज्वाला आठवा
जिच्यामुळे आज देशाचं स्वातंत्र्य कायम आहे,
देशभक्तांच्या रक्ताची ती धार आठवा...
ज्यामुळे आज तिरंगा फडकतो आहे.
स्वातंत्र्यदिनाच्या हार्दिक शुभेच्छा.

अभिमान आणि नशीब आहे कि,
भारत देशात जन्म मिळाला
जसे इंग्रजांपासून मुक्त झालो
तसे आता भ्रष्टाचारमुक्त
भारत करूया
Happy Independence Day

देशभक्तांच्या बलिदानामुळे
स्वतंत्र झालो आपण
कोणी विचारल्यावर गर्वाने सांगतो
भारतीय आहोत जय हिंद
स्वातंत्र्यदिनाच्या हार्दिक शुभेच्छा.

दिल दिया है, जान भी देंगे,
ऐ वतन तेरे लिए ...
स्वातंत्र्यदिनाच्या हार्दिक शुभेच्छा.
=========================================

--by Marathi Varsa Team
----------------------------

                     (साभार आणि सौजन्य-संदर्भ-मराठीवारसI.कॉम)
                    ------------------------------------------

-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-15.08.2023-मंगळवार.
=========================================