भारताचा स्वातंत्र्य दिवस-शुभेच्छा-3

Started by Atul Kaviraje, August 15, 2023, 11:50:38 AM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

                               "भारताचा स्वातंत्र्य दिवस"
                              -----------------------

मित्र/मैत्रिणींनो,

     आज दिनांक-१५.०८.२०२३ आहे. आज "भारताचा स्वातंत्र्य दिवस" आहे. पंडित जवाहरलाल नेहरू यांनी दिल्लीतल्या लाल किल्ल्यावरून १५ ऑगस्ट १९४७ ला तिरंगा ध्वज फडकवला. त्यानंतर १५ ऑगस्ट १९४७ या दिवशी भारताचा स्वातंत्र्य दिन साजरा करण्याची प्रथा सुरू झाली. आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळून आता ७५ वर्षे पूर्ण झाली आहेत. १५ ऑगस्ट १९४७ रोजी भारताला स्वतंत्र राष्ट्र म्हणून मान्यता मिळाली. या मान्यतेसाठी देशाच्या सेनानींनी सर्वस्वाचा त्याग केला आहे. स्वातंत्र्याचा हा उत्सव प्रत्येक घरात आणि प्रत्येक संस्थेत दिसत असला, तरी राष्ट्रीय स्तरावर हा कार्यक्रम दिल्लीच्या लाल किल्ल्यावर आयोजित केला जातो. मराठी कवितेच्या माझ्या सर्व बंधू-भगिनी कवी-कवयित्रींना १५ ऑगस्टच्या अनेक हार्दिक शुभेच्छा. वाचूया 75 व्या स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा.

           75 व्या स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा--

=========================================
भारत देश विविध रंगांचा, विविध ढंगांचा
विविधता जपणा-या एकात्मतेचा...
स्वातंत्र्यदिनाच्या हार्दिक शुभेच्छा.

देशभक्ताचं रक्त म्हणजे स्वातंत्र्य-वृक्षाचे बीजच होय.

दोनच ओळी कायम लक्षात ठेवा.....
शिवाजी महाराजांनी तुमचे भविष्य जाणले होते,
निदान तुम्ही त्यांचा इतिहास विसरु नका..!!😇

भारतामध्ये केवळ एक नैसर्गिक आक्रमक नेता,
राष्ट्राच्या स्वातंत्रासाठी झगडणारा होता आणि ते म्हणजे लोकमान्य टिळक होते.

राष्ट्र जगायचे असेल तर व्यक्तीने मरण पत्करले पाहिजे,
आत्म्याचेही तंत्र याप्रमाणेच असते.😇

लाख मेले तरी चालतील
पण लाखाचा पोशिंदा जगलाच पाहिजे!

सच्चा देशभक्त इतर कोणताही अन्याय सहन करेल
पण आपल्या मातृभूमी वरचा अन्याय सहन करणार नाही.😇

😇 सुर्य नारायण जर उगवले नसते तर..
आकाशाचा रंगचं समजला नसता..
जर छञपती शिवाजी राजे जन्मले नसते तर..
खरचं हिंदु धर्माचा अर्थच समजला नसता.. 😇

स्वराज्य तोरण चढे,
गर्जती तोफांचे चौघडे,
मराठी पाउल पडते पुढे!

स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे
आणि तो मी मिळवणारच.

हीच ती हिंदुत्वाची आवश्यक लक्षणे:
समान राष्ट्र, समान जाती नि समान संस्कृती.
ही सर्व लक्षणे थोडक्यांत अशी सांगतां येतील की,
हिंदू तो की जो या भूमीला नुसती पितृभूच नव्हे तर पुण्यभूहि मानतो.

भेकड म्हणुन जगण्यापेक्षा शुराचे मरण कधीही चांगले

😇 स्वातंत्र्य हा आपला जन्मसिध्द हक्क आहे
पण त्याचा स्वैराचार होऊ न देणं हे आपलं आद्यकर्तव्य आहे.😇
=========================================

--by Marathi Varsa Team
----------------------------

                       (साभार आणि सौजन्य-संदर्भ-मराठीवारसI.कॉम)
                      -------------------------------------------

-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-15.08.2023-मंगळवार.
=========================================