भारताचा स्वातंत्र्य दिवस-शुभेच्छा-4

Started by Atul Kaviraje, August 15, 2023, 11:52:28 AM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

                                 "भारताचा स्वातंत्र्य दिवस"
                                -----------------------

मित्र/मैत्रिणींनो,

     आज दिनांक-१५.०८.२०२३ आहे. आज "भारताचा स्वातंत्र्य दिवस" आहे. पंडित जवाहरलाल नेहरू यांनी दिल्लीतल्या लाल किल्ल्यावरून १५ ऑगस्ट १९४७ ला तिरंगा ध्वज फडकवला. त्यानंतर १५ ऑगस्ट १९४७ या दिवशी भारताचा स्वातंत्र्य दिन साजरा करण्याची प्रथा सुरू झाली. आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळून आता ७५ वर्षे पूर्ण झाली आहेत. १५ ऑगस्ट १९४७ रोजी भारताला स्वतंत्र राष्ट्र म्हणून मान्यता मिळाली. या मान्यतेसाठी देशाच्या सेनानींनी सर्वस्वाचा त्याग केला आहे. स्वातंत्र्याचा हा उत्सव प्रत्येक घरात आणि प्रत्येक संस्थेत दिसत असला, तरी राष्ट्रीय स्तरावर हा कार्यक्रम दिल्लीच्या लाल किल्ल्यावर आयोजित केला जातो. मराठी कवितेच्या माझ्या सर्व बंधू-भगिनी कवी-कवयित्रींना १५ ऑगस्टच्या अनेक हार्दिक शुभेच्छा. वाचूया 75 व्या स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा.

           75 व्या स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा--

=========================================
स्वातंत्र्य म्हणजे संयम..... स्वैराचार नव्हे. 😇

व्यक्तिगत चारित्र्यातूनच राष्ट्रीय चारित्र्य निर्माण होते.

देवभक्तीहून देशभक्ती श्रेष्ठ आहे.

तरुणांचा संहार म्हणजेच राष्टांचा संहार,
कारण तरुण हेच राष्ट्राचे पंचप्राण आहेत.

क्रांती तलवारीने घडत नाही..... तत्वाने घडते.  😇

😇 'डोळ्याच्या बदल्यात डोळा'
या तत्वज्ञानाने जग तेवढे आंधळे होईल. 😇

आम्ही या भारत देशाची संतान आहोत,
आम्हाला राष्ट्रीयत्वाची जाणीव आहेच,
राष्ट्रावर संकट आल्यास प्राण पणाला लावून देशाचे रक्षण केले व करु सुद्धा.😇

एखादा देश आणि त्याची नैतिक मुल्ये किती महान आहेत,
हे तिथल्या प्राण्यांना कशी वागणूक देतात त्यावरूनही कळून येते.😇🇮🇳

ज्यांनी लिहली आझादीची गाथा
त्यांच्या चरणी ठेवितो माथा
स्वातंत्र्यदिनाच्या हार्दिक शुभेच्छा...

माझी मायभूमी, तुला शतशत प्रणाम...
तू अखंड राहो हीच देवा चरणी प्रार्थना.
भारत मातI की जय.

एकीने जन्म दिला...एकीने ओळख दिली...
भारतमातेला नतमस्तक होतो हा भारतभूमीचा पुत्र...
वंदे मातरम्.

मनात ठेवू नका द्वेष, मनातून काढून टाका हा द्वेष,
ना तुमचा ना माझा, ना त्याचा ना कुणाचा हा देश आहे
आपल्या सर्वांचा. जय हिंद जय भारत.
=========================================

--by Marathi Varsa Team
----------------------------

                      (साभार आणि सौजन्य-संदर्भ-मराठीवारसI.कॉम)
                     -------------------------------------------

-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-15.08.2023-मंगळवार.
=========================================