भारताचा स्वातंत्र्य दिवस-शुभेच्छा-5

Started by Atul Kaviraje, August 15, 2023, 11:54:13 AM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

                                "भारताचा स्वातंत्र्य दिवस"
                               -----------------------

मित्र/मैत्रिणींनो,

     आज दिनांक-१५.०८.२०२३ आहे. आज "भारताचा स्वातंत्र्य दिवस" आहे. पंडित जवाहरलाल नेहरू यांनी दिल्लीतल्या लाल किल्ल्यावरून १५ ऑगस्ट १९४७ ला तिरंगा ध्वज फडकवला. त्यानंतर १५ ऑगस्ट १९४७ या दिवशी भारताचा स्वातंत्र्य दिन साजरा करण्याची प्रथा सुरू झाली. आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळून आता ७५ वर्षे पूर्ण झाली आहेत. १५ ऑगस्ट १९४७ रोजी भारताला स्वतंत्र राष्ट्र म्हणून मान्यता मिळाली. या मान्यतेसाठी देशाच्या सेनानींनी सर्वस्वाचा त्याग केला आहे. स्वातंत्र्याचा हा उत्सव प्रत्येक घरात आणि प्रत्येक संस्थेत दिसत असला, तरी राष्ट्रीय स्तरावर हा कार्यक्रम दिल्लीच्या लाल किल्ल्यावर आयोजित केला जातो. मराठी कवितेच्या माझ्या सर्व बंधू-भगिनी कवी-कवयित्रींना १५ ऑगस्टच्या अनेक हार्दिक शुभेच्छा. वाचूया 75 व्या स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा.

           75 व्या स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा--

=========================================
जेव्हा डोळे उघडतील तेव्हा जमीन भारताची असो....
जेव्हा डोळे बंद होतील तेव्हा मनात आठवणी भारताच्या असतो...
मरण आलं तरी दुःख नाही...फक्त मरताना माती या मातृभूमीची असो.
भारत माता कि जय

बाकीचे विसरले असतील, पण मी मात्र कधीच विसरणार नाही,
माझ्या देशाचा तिरंगा ध्वज; सर्वात उंच फडकतो आहे....
स्वातंत्र्यदिनाच्या 2023 हार्दिक शुभेच्छा...

😇 विविधतेत एकता आहे आमची शान,
याचमुळे आहे माझा देश महान. 😇

उत्सव तीन रंगांचा,
आभाळी आज सजला,
नतमस्तक मी त्या सर्वांसाठी
ज्यांनी माझ भारत देश घडविला. 😇

देशभक्तीचा पडू लागला आहे पाऊस,
यातील काही थेंब नक्की जपून ठेवा
हीच आहे नम्र विनंती तुम्हाला.
स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा.

मी मुस्लीम आहे, तू आहेस हिंदू, दोघंही आहोत माणसंच,
आण इकडे मी तुझी गीता वाचतो तू वाच माझं कुराण...
माझ्या मनात तर एकच इच्छा आहे मित्रा...
एकाच ताटात जेवो सारा हिंदुस्थान.

जिथे वाहते शांततेची गंगा, तिथे करून नका दंगा...
भगवा आणि हिरव्यात करू नका भेदभाव तिरंगा लहरू दे शांतता राहू दे.
भारत माता कि जय स्वातंत्र्यदिनाच्या हार्दिक शुभेच्छा.

देश विविध रंगांचा देश विविध ढंगांचा
देश विविधता जपणाऱ्या एकात्मतेचा.

आयुष्य सुंदरच असतं
पण त्याची किमत स्वातंत्र्याशिवाय कळत नाही
माझ्या देशाच्या स्वातंत्र्यासाठी
ज्याने प्राण वेचले...
जीवाचे मोल देऊन हा देश स्वतंत्र केला...
त्या प्रत्येकाला माझा नतमस्तक
होऊन सलाम.🙏
स्वातंत्रदिनाच्या हार्दिक शुभेच्छा.
=========================================

--by Marathi Varsa Team
----------------------------

                       (साभार आणि सौजन्य-संदर्भ-मराठीवारसI.कॉम)
                       ------------------------------------------

-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-15.08.2023-मंगळवार.
=========================================