भारताचा स्वातंत्र्य दिवस-शुभेच्छा-7

Started by Atul Kaviraje, August 15, 2023, 11:57:20 AM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

                                "भारताचा स्वातंत्र्य दिवस"
                               -----------------------

मित्र/मैत्रिणींनो,

     आज दिनांक-१५.०८.२०२३ आहे. आज "भारताचा स्वातंत्र्य दिवस" आहे. पंडित जवाहरलाल नेहरू यांनी दिल्लीतल्या लाल किल्ल्यावरून १५ ऑगस्ट १९४७ ला तिरंगा ध्वज फडकवला. त्यानंतर १५ ऑगस्ट १९४७ या दिवशी भारताचा स्वातंत्र्य दिन साजरा करण्याची प्रथा सुरू झाली. आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळून आता ७५ वर्षे पूर्ण झाली आहेत. १५ ऑगस्ट १९४७ रोजी भारताला स्वतंत्र राष्ट्र म्हणून मान्यता मिळाली. या मान्यतेसाठी देशाच्या सेनानींनी सर्वस्वाचा त्याग केला आहे. स्वातंत्र्याचा हा उत्सव प्रत्येक घरात आणि प्रत्येक संस्थेत दिसत असला, तरी राष्ट्रीय स्तरावर हा कार्यक्रम दिल्लीच्या लाल किल्ल्यावर आयोजित केला जातो. मराठी कवितेच्या माझ्या सर्व बंधू-भगिनी कवी-कवयित्रींना १५ ऑगस्टच्या अनेक हार्दिक शुभेच्छा. वाचूया 75 व्या स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा.

     स्वातंत्र्य दिवस हा भारताचा विशेष महत्वाचा दिवस आहे. ब्रिटिश साम्राज्यापासून दिनांक १५ ऑगस्ट इ.स. १९४७ रोजी भारताला स्वातंत्र्य मिळाले. त्यामुळे भारताचा स्वातंत्र्य दिन दरवर्षी १५ ऑगस्ट रोजी साजरा केला जातो. हा भारतातील एक राष्ट्रीय सण आहे. या दिवशी दिल्लीतील लाल किल्ल्यावर भारताचा राष्ट्रध्वज फडकवला जातो. देशभरातही बहुतांश ठिकाणी ध्वजारोहण, मिरवणुका व सांस्कृतिक कार्यक्रमांद्वारे हा दिवस साजरा केला जातो.

          15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा--

=========================================
वाऱ्यामुळे नाही
भारतीय सैनिकांच्या श्वासामुळे
फडकतोय आपला तिरंगा...!
स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा

"आमुचा स्वदेश हिंदुस्थान
आम्हां हिंदूंचा तो केवळ,
होय जीव कीं प्राण"

"शूर आम्ही सरदार आम्हाला
काय कुणाची भीती?
देव, देश अन्‌ धर्मापायी प्राण घेतलं हाती !"

"जिंकावे वा कटुन मरावं हेच आम्हाला ठावं
लढुन मरावं, मरुन जगावं हेच आम्हाला ठावं
देशापायी सारी इसरू माया-ममता-नाती !"

"देश हा देव असे माझा
अशी घडावी माझ्या हातून तेजोमय पूजा"

"रणमर्दांनो तुमच्या पाठी
मारीत मारीत मरण्यासाठी
उभा भारतीय चाळीस कोटी
हटवा मागे पिशाच्‍च पिवळे, उडू द्या तोफा धडाधडा"

"लढा वीर हो लढा लढा
पराक्रमाने अधिक उंचवा
हिमालयाचा कडा कडा"
=========================================

                      (साभार आणि सौजन्य-संदर्भ-मराठी-सुविचार.कॉम)
                     ---------------------------------------------

-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-15.08.2023-मंगळवार.
=========================================