भारताचा स्वातंत्र्य दिवस-शुभेच्छा-8

Started by Atul Kaviraje, August 15, 2023, 11:59:41 AM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

                                "भारताचा स्वातंत्र्य दिवस"
                               -----------------------

मित्र/मैत्रिणींनो,

     आज दिनांक-१५.०८.२०२३ आहे. आज "भारताचा स्वातंत्र्य दिवस" आहे. पंडित जवाहरलाल नेहरू यांनी दिल्लीतल्या लाल किल्ल्यावरून १५ ऑगस्ट १९४७ ला तिरंगा ध्वज फडकवला. त्यानंतर १५ ऑगस्ट १९४७ या दिवशी भारताचा स्वातंत्र्य दिन साजरा करण्याची प्रथा सुरू झाली. आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळून आता ७५ वर्षे पूर्ण झाली आहेत. १५ ऑगस्ट १९४७ रोजी भारताला स्वतंत्र राष्ट्र म्हणून मान्यता मिळाली. या मान्यतेसाठी देशाच्या सेनानींनी सर्वस्वाचा त्याग केला आहे. स्वातंत्र्याचा हा उत्सव प्रत्येक घरात आणि प्रत्येक संस्थेत दिसत असला, तरी राष्ट्रीय स्तरावर हा कार्यक्रम दिल्लीच्या लाल किल्ल्यावर आयोजित केला जातो. मराठी कवितेच्या माझ्या सर्व बंधू-भगिनी कवी-कवयित्रींना १५ ऑगस्टच्या अनेक हार्दिक शुभेच्छा. वाचूया 75 व्या स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा.

          15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा--

=========================================
"गळ्यामध्ये गरिबांच्या गाजे संतांची वाणी
ज्योतीसम समरात जळाली झाशीची राणी
त्या संतांचे, त्या वीरांचे प्रियतम तीर्थस्थान
माझा हिंदुस्थान, माझा हिंदुस्थान"

"वृक्षावर गंगा-यमुनांचे रुळती मौक्तिक हार
कटीस तळपे मराठमोळ्या गोदेची तलवार
महोदधीचे चरणाजवळी गर्जतसे आव्हान
माझा हिंदुस्थान, माझा हिंदुस्थान"

"ने मजसी ने परत मातृभूमीला
सागरा, प्राण तळमळला"

"तिरंगी आमचा भारतीय झेंडा
उंच उंच फडकवू
प्राणपणाने लढून आम्ही
शान याची वाढवू"

"स्वातंत्र्य, समता विश्वबंधुत्वासाठी
अनेकांनी भोगला कारावास आजन्म
देशभक्तीची होळी करून
कोण देतो भ्रष्टाचारास जन्म?"

"प्रत्येक गावात समाजाची
एक जुनी वेस आहे
शाळेत प्रतिज्ञेमध्ये मात्र
भारत माझा देश आहे"

हा देश माझा
याचे भान जरासे राहु द्या रे...
=========================================

                     (साभार आणि सौजन्य-संदर्भ-मराठी-सुविचार.कॉम)
                    ---------------------------------------------

-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-15.08.2023-मंगळवार.
=========================================