भारताचा स्वातंत्र्य दिवस-शुभेच्छा-9

Started by Atul Kaviraje, August 15, 2023, 12:01:29 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje


                               "भारताचा स्वातंत्र्य दिवस"
                              -----------------------

मित्र/मैत्रिणींनो,

     आज दिनांक-१५.०८.२०२३ आहे. आज "भारताचा स्वातंत्र्य दिवस" आहे. पंडित जवाहरलाल नेहरू यांनी दिल्लीतल्या लाल किल्ल्यावरून १५ ऑगस्ट १९४७ ला तिरंगा ध्वज फडकवला. त्यानंतर १५ ऑगस्ट १९४७ या दिवशी भारताचा स्वातंत्र्य दिन साजरा करण्याची प्रथा सुरू झाली. आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळून आता ७५ वर्षे पूर्ण झाली आहेत. १५ ऑगस्ट १९४७ रोजी भारताला स्वतंत्र राष्ट्र म्हणून मान्यता मिळाली. या मान्यतेसाठी देशाच्या सेनानींनी सर्वस्वाचा त्याग केला आहे. स्वातंत्र्याचा हा उत्सव प्रत्येक घरात आणि प्रत्येक संस्थेत दिसत असला, तरी राष्ट्रीय स्तरावर हा कार्यक्रम दिल्लीच्या लाल किल्ल्यावर आयोजित केला जातो. मराठी कवितेच्या माझ्या सर्व बंधू-भगिनी कवी-कवयित्रींना १५ ऑगस्टच्या अनेक हार्दिक शुभेच्छा. वाचूया 75 व्या स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा.

     भारत माझा देश आहे, असं आपण गर्वाने म्हणत असतो. आपला देशाचा स्वातंत्र्यदिन हा आपल्यासाठी गर्वाचा दिवस आहे. तसंच हा दिवस म्हणजे एकता आणि उत्साहाचा दिवस आहे. 15 ऑगस्ट 1947 या भारताच्या स्वातंत्र्यदिनी भारताचे पहिले पंतप्रधान जवाहर लाल नेहरू यांनी दिल्लीच्या लाल किल्ल्याच्या लाहोरी गेटवर तिरंगा फडकवला. हा दिवस प्रत्येक भारतीयाला एका नव्या सुरूवातीची आठवण करून देतो. याच दिवशी 200 वर्षांपासून अधिक काळ सुरू असलेल्या इंग्रजांच्या जाचातून सुटका करून आपण एका नव्या युगाची सुरूवात केली. भारताला हा सुवर्ण दिवस पाहण्यासाठी वीर सावरकरांसारखे विचार असलेल्या अनेक स्वातंत्रसैनिकांनी आपल्या प्राणांची आहुती दिली आहे. स्वातंत्र्याचा हा संघर्ष बराच काळ सुरू होता. आजही आपल्या देशाचं डोळ्यात तेल घालून रक्षण करणाऱ्या सैनिकांची आजही देशासाठी बलिदान देण्याची तयार आहे. भारतातील सर्व नागरिकही देशाप्रती वेळोवेळी असलेलं प्रेम जाहीर करत असतात. त्यात स्वातंत्र्यदिन असेल तर आपण आवर्जून आपल्या मित्रपरिवार आणि कुटुंबियांना या दिवसाबाबतचे कोटस, मेसेजेस आणि संदेश आवर्जून पाठवतो. मग ते फेसबुक असो इन्स्टाग्राम असो वा वॉट्सअप आपण प्रत्येक सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा (Happy Independence Day Quotes In Marathi) शेअर करत असतो. हेच लक्षात घेऊन आम्ही घेऊन आलो आहोत खास स्वातंत्र्यदिनी शेअर करता येतील. असे कोटस आणि संदेश खास तुमच्यासाठी.

     स्वातंत्र्य दिनाचं महत्त्व हे आपल्यासाठी कधीच कमी होणार नाही. त्यामुळे या दिवसासंबंधीचे कोटस (Independence Day Quotes In Marathi) शेअर करणं म्हणजे आपल्या मायभूमी आणि तिच्याप्रती असलेले प्रेम पुन्हा व्यक्त करणे होय.

           स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा--

=========================================
दे सलामी... या तिरंग्याला ज्यामुळे तुझी शान आहे, हा तिरंगा नेहमी राहू दे उंच जोपर्यंत तुझा जीव आहे.

दिल दिया है, जान भी देंगे, ऐ वतन तेरे लिए ... स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा.

देशभक्ती मूळ रूपात एक धारणा आहे, ती म्हणजे हा देश सर्वात चांगला आहे, कारण इथेच आपला जन्म झाला आहे.

देशभक्ती ही झेंडा फडकवण्यात नाही तर या प्रयत्नात आहे की, देश पुढे जाईल आणि मजबूतही राहील.

कोणत्याही देशाची संस्कृतीही त्या देशातील लोकांच्या हृदय आणि आत्म्यात वसते.

ज्या देशातील लोक एकमेकांना पाठी पिछाडण्याच्या शर्यतीत असतील तो देश पुढे कसा जाईल ?

जी लोक दुसऱ्यांना जगण्याचं स्वातंत्र्य देत नाहीत त्यांनासुद्धा स्वातंत्र्याचा हक्क नाही.

जर चुकीला माफी नसेल तर स्वातंत्र्याला अर्थच काय
=========================================

--आदिती  दातार
---------------

                    (साभार आणि सौजन्य-संदर्भ-मराठी.popxo.कॉम)
                   ---------------------------------------------

-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-15.08.2023-मंगळवार.
=========================================