भारताचा स्वातंत्र्य दिवस-शुभेच्छा-10

Started by Atul Kaviraje, August 15, 2023, 12:03:15 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

                                "भारताचा स्वातंत्र्य दिवस"
                               -----------------------

मित्र/मैत्रिणींनो,

     आज दिनांक-१५.०८.२०२३ आहे. आज "भारताचा स्वातंत्र्य दिवस" आहे. पंडित जवाहरलाल नेहरू यांनी दिल्लीतल्या लाल किल्ल्यावरून १५ ऑगस्ट १९४७ ला तिरंगा ध्वज फडकवला. त्यानंतर १५ ऑगस्ट १९४७ या दिवशी भारताचा स्वातंत्र्य दिन साजरा करण्याची प्रथा सुरू झाली. आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळून आता ७५ वर्षे पूर्ण झाली आहेत. १५ ऑगस्ट १९४७ रोजी भारताला स्वतंत्र राष्ट्र म्हणून मान्यता मिळाली. या मान्यतेसाठी देशाच्या सेनानींनी सर्वस्वाचा त्याग केला आहे. स्वातंत्र्याचा हा उत्सव प्रत्येक घरात आणि प्रत्येक संस्थेत दिसत असला, तरी राष्ट्रीय स्तरावर हा कार्यक्रम दिल्लीच्या लाल किल्ल्यावर आयोजित केला जातो. मराठी कवितेच्या माझ्या सर्व बंधू-भगिनी कवी-कवयित्रींना १५ ऑगस्टच्या अनेक हार्दिक शुभेच्छा. वाचूया 75 व्या स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा.

     प्रत्येक सणाप्रमाणेच भारतात स्वातंत्र्यदिन (Independence Day) साजरा केला जातो. या दिवशीही प्रत्येकजण एकमेकांना शुभेच्छा (Independence Day Wishes In Marathi) देतात. या दिवशी देशभक्ती गाणीही ऐकू येत असतात.  अशाच काही स्वातंत्र्यदिनी देण्यासाठी खास शुभेच्छा (swatantra dinachya hardik shubhechha in marathi).

=========================================
गंगा- यमुना आहे नर्मदा इथे, मंदिरांसोबतच मस्जिद आणि चर्च आहे इथे, शांतता आणि प्रेमाची शिकवण देतो आमचा भारत देश देता सदा सर्वदा... स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा.

चला पुन्हा एकदा आठवूया तो नजारा.... शहिदांच्या हृदयातील ज्वाला आठवा जिच्यामुळे आज देशाचं स्वातंत्र्य कायम आहे, देशभक्तांच्या रक्ताची ती धार आठवा...ज्यामुळे आज तिरंगा फडकतो आहे. स्वातंत्र्यदिनाच्या हार्दिक शुभेच्छा.

ही गोष्ट वाहत्या हवेला सांगा....प्रकाश असेल दिवे तेवत ठेवा... जीवाची आहुती देऊन या तिरंग्याचं रक्षण केलं आहे आम्ही...सदैव या तिरंग्याला फडकवत ठेवा...स्वातंत्र्यदिनाच्या हार्दिक शुभेच्छा.   

ना धर्माच्या नावावर जगा ना...ना धर्माच्या नावावर मरा... माणुसकी धर्म आहे या देशाचा...फक्त देशासाठी जगा...स्वातंत्र्यदिनाच्या खूप खूप शुभेच्छा.

सर्वांनी जपा एकमेकांचं सुख...तेव्हाच सुंदर होईल आपला देश.. हॅपी 15 ऑगस्ट.

देशाला मिळालं स्वातंत्र्य मार्गात आलेल्या प्रत्येक संकटाला टाळून, चला पुन्हा उधळूया रंग आणि जगूया देशाच्या स्वातंत्र्याचा हा सण...वंदे मातरम्.

देश आपला सोडो न कोणी..नातं आपलं तोडो न कोणी...हृदय आपलं एक आहे, देश आपली जान आहे...ज्याबद्दल आपल्याला अभिमान आहे. स्वातंत्र्यदिनाच्या हार्दिक शुभेच्छा.

आज सलाम आहे त्या वीरांना ज्यांच्यामुळे आज हा दिवस पाहिला...ती आई आहे भाग्यशाली जिच्यापोटी जन्मलेल्या वीरांमुळे हा देश अखंड राहिला...स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा.

वादळातून नौका काढून आम्ही आणली तीरावर...देशाला ठेवा एक मुलांनो हाच संदेश आहे स्वातंत्र्यदिवसाच्या मोक्यावर...
'वंदे मातरम्!
=========================================

--आदिती  दातार
---------------

                     (साभार आणि सौजन्य-संदर्भ-मराठी.popxo.कॉम)
                    ---------------------------------------------

-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-15.08.2023-मंगळवार.
=========================================