भारताचा स्वातंत्र्य दिवस-स्वातंत्र्यदिनाचे एसएमएस

Started by Atul Kaviraje, August 15, 2023, 12:14:40 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

                               "भारताचा स्वातंत्र्य दिवस"
                              -----------------------

मित्र/मैत्रिणींनो,

     आज दिनांक-१५.०८.२०२३ आहे. आज "भारताचा स्वातंत्र्य दिवस" आहे. पंडित जवाहरलाल नेहरू यांनी दिल्लीतल्या लाल किल्ल्यावरून १५ ऑगस्ट १९४७ ला तिरंगा ध्वज फडकवला. त्यानंतर १५ ऑगस्ट १९४७ या दिवशी भारताचा स्वातंत्र्य दिन साजरा करण्याची प्रथा सुरू झाली. आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळून आता ७५ वर्षे पूर्ण झाली आहेत. १५ ऑगस्ट १९४७ रोजी भारताला स्वतंत्र राष्ट्र म्हणून मान्यता मिळाली. या मान्यतेसाठी देशाच्या सेनानींनी सर्वस्वाचा त्याग केला आहे. स्वातंत्र्याचा हा उत्सव प्रत्येक घरात आणि प्रत्येक संस्थेत दिसत असला, तरी राष्ट्रीय स्तरावर हा कार्यक्रम दिल्लीच्या लाल किल्ल्यावर आयोजित केला जातो. मराठी कवितेच्या माझ्या सर्व बंधू-भगिनी कवी-कवयित्रींना १५ ऑगस्टच्या अनेक हार्दिक शुभेच्छा. वाचूया 75 व्या स्वातंत्र्यदिनाचे एसएमएस.

     15 ऑगस्टच्या निमित्ताने आपल्या मित्रमैत्रिणी आणि जवळच्या लोकांना पाठवा खास स्वातंत्र्यदिनाचे एसएमएस (Independence Day Message In Marathi) .

=========================================
ज्यांनी लिहीली स्वातंत्र्याची गाथा, त्यांच्या चरणी ठेवू माथा. स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा
वंदे मातरम्.

विविधतेत एकता आहे आमची शान, याचमुळे आहे माझा देश महान.

उत्सव तीन रंगांचा, आभाळी आज सजला, नतमस्तक मी त्या सर्वांसाठी ज्यांनी माझ भारत देश घडविला.

देश विविध रंगांचा देश विविध ढंगांचा देश विविधता जपणाऱ्या एकात्मतेचा.

देशभक्तांच्या बलिदानामुळे स्वतंत्र झालो आपण, कोणी विचारल्यावर गर्वाने सांगतो आम्ही भारतीय आहोत, जय हिंद.

बलसागर भारत होवो, विश्वात शोभूनी राहो. स्वातंत्र्यदिनाच्या हार्दिक शुभेच्छा.

माझी मायभूमी, तुला शतशत प्रणाम...तू अखंड राहो हीच देवा चरणी प्रार्थना. भारत मात की जय.

एकीने जन्म दिला...एकीने ओळख दिली...भारतमातेला नतमस्तक होतो हा भारतभूमीचा पुत्र...वंदे मातरम्.

नावात काय घेऊन बसलात आम्ही तर आमच्या वागणुकीतूनच जगाला ओळख पटवून देतो भारतमातेच्या लेकी.

ना कोणासाठी ना श्रीमंतीसाठी आयुष्य खूप छोटं आहे आपण जगणार फक्त देशासाठी.

जे देशासाठी फासावर चढले आणि छातीवर गोळ्या झेलल्या
त्या शहीदांना आम्ही वंदन करतो
ज्यांनी देशापुढे आपल्या जीवनाला दुय्यम ठरवले
त्यांना आमचा सलाम....स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा

जे आज आपल्यात नाहीत, परंतु आजही नावरूपाने आपल्यात आहेत, अशा साहसी सैनिकवीरांना सलाम
जे आपल्या भारताची खरी शान आहेत, वंदे मातरम्

सलामी द्या आपल्या तिरंग्याला, जो आपली शान आहे
सदैव उंच रहावा तो, जोपर्यंत आपल्यात जान आहे
जय हिंद जय भारत....स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा

देशभक्तांमुळे देशाची आहे शान
देशभक्तांमुळे देशाचा आहे मान
आम्ही त्या देशाची फुलं आहेत मित्रांनो
ज्या देशाच नाव आहे हिंदुस्तान
=========================================

--आदिती दातार
--------------

                    (साभार आणि सौजन्य-संदर्भ-मराठी.popxo.कॉम)
                   ---------------------------------------------

-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-15.08.2023-मंगळवार.
=========================================