भारताचा स्वातंत्र्य दिवस-चारोळ्या

Started by Atul Kaviraje, August 15, 2023, 12:18:44 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

                                "भारताचा स्वातंत्र्य दिवस"
                               -----------------------

मित्र/मैत्रिणींनो,

     आज दिनांक-१५.०८.२०२३ आहे. आज "भारताचा स्वातंत्र्य दिवस" आहे. पंडित जवाहरलाल नेहरू यांनी दिल्लीतल्या लाल किल्ल्यावरून १५ ऑगस्ट १९४७ ला तिरंगा ध्वज फडकवला. त्यानंतर १५ ऑगस्ट १९४७ या दिवशी भारताचा स्वातंत्र्य दिन साजरा करण्याची प्रथा सुरू झाली. आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळून आता ७५ वर्षे पूर्ण झाली आहेत. १५ ऑगस्ट १९४७ रोजी भारताला स्वतंत्र राष्ट्र म्हणून मान्यता मिळाली. या मान्यतेसाठी देशाच्या सेनानींनी सर्वस्वाचा त्याग केला आहे. स्वातंत्र्याचा हा उत्सव प्रत्येक घरात आणि प्रत्येक संस्थेत दिसत असला, तरी राष्ट्रीय स्तरावर हा कार्यक्रम दिल्लीच्या लाल किल्ल्यावर आयोजित केला जातो. मराठी कवितेच्या माझ्या सर्व बंधू-भगिनी कवी-कवयित्रींना १५ ऑगस्टच्या अनेक हार्दिक शुभेच्छा. वाचूया 75 व्या स्वातंत्र्य दिनाच्या चारोळ्या.

     देशाप्रती भावना व्यक्त करताना आपण त्या चारोळ्यातूनही व्यक्त करू शकतो. स्वातंत्र्यदिनासाठी काही खास चारोळ्या (Independence Day Shayari).

=========================================
विचारांचं स्वातंत्र्य
विश्वास शब्दांमध्ये
अभिमान आत्म्याचा
चला या स्वातंत्र्यदिनी सलाम करू या भारतदेशाला

बाकीचे विसरले असतील
पण मी मात्र कधीच विसरणार नाही
माझ्या देशाचा तिरंगा ध्वज
सर्वात उंच फडकतो आहे

अभिमान आणि नशीब आहे की,
भारत देशात जन्म मिळाला ,
इंग्रजांपासून मुक्त झालो तसे
आता भष्ट्राचारमुक्त भारत करूया.

स्वातंत्र्यांसाठी फडकतो ध्वज,
सूर्य तळपतो प्रगतीचा,
भारतभूच्या पराक्रमाला मुजरा महाराष्ट्राचा

जयोस्तुते जयोस्तुते श्री महन्मंगले शिवास्पदे शुभदे,
स्वतंत्रते भगवती त्वामहम्, यशोयुतां वंदे

मुक्त आमचे आकाश सारे,
झुलती हिरवी रानेवने,
स्वैर उडती पक्षी नभी,
आनंद आज उरी नांदे.

तू माझी भारतभूमी मी तुझाच मावळा,
मी भारतमातेचा माजी भारतमाता. जय हिंद

कधीच न संपणार आणि शेवटच्या श्वासापर्यंत टिकणार प्रेम म्हणजे देशप्रेम.

प्रेम तर सगळेच करतात आपल्या प्रियकरावर सगळेच मरतात,
कधी देशाला प्रियकर बनवून पाहा,
सगळेच प्रेम करतील तुमच्यावर, भारत माता की जय.

ने मजसी ने परत मातृभूमीला...
असा विरह ज्यांनी सहन केला,
त्या सावकरांना शतशः प्रणाम,
आपण भाग्यवान जो जन्म घेतला या स्वातंत्र्य मिळालेल्या देशात. चला एकजूट राहूया आणि देशाला जपूया.
=========================================

--आदिती दातार
--------------

                    (साभार आणि सौजन्य-संदर्भ-मराठी.popxo.कॉम)
                   ---------------------------------------------

-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-15.08.2023-मंगळवार.
=========================================