मी आणि माझा देश

Started by शिवाजी सांगळे, August 15, 2023, 03:33:03 PM

Previous topic - Next topic

शिवाजी सांगळे

मी आणि माझा देश

कधीकधी एक असतो मी आणि माझा देश
एरव्ही असतो प्रत्येकाचा वेगळावेगळा वेश

हेतुपुरस्सर वाटून दिले कधीकाळी आम्हास
न् आम्हीही कवटाळून बसलो तोच परिवेश

वाटते व्हावा बदल काहीसा आता तरी येथे
विसरून ते विविध रंग रंगावा तिरंग्यात देश

सुजलाम सुफलाम, सारे घडावे मनाजोगते
अन् म्हणू सगळे गर्वाने, महान आमचा देश

येवोच न मनात फिरून विचार अभद्र असा
कधीकधी एक असतो मी आणि माझा देश

©शिवाजी सांगळे 🦋papillon
 संपर्क: +९१ ९५४५९७६५८९
©शिवाजी सांगळे 🦋papillon
संपर्क: +९१ ९५४५९७६५८९