१५-ऑगस्ट-दिनविशेष-A

Started by Atul Kaviraje, August 15, 2023, 04:49:19 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

मित्र/मैत्रिणींनो,

     आज दिनांक-१५.०८.२०२३-मंगळवार.जाणून घेऊया,आजच्या दिवसाचे "दिनविशेष"

                                 "१५-ऑगस्ट-दिनविशेष"
                                ----------------------

-: दिनविशेष :-
१५ ऑगस्ट
भारताला १५ ऑगस्टलाच स्वातंत्र्य का मिळाले?
दुसर्‍या महायुद्धातील प्रचंड खर्च व इतर अनेक कारणांमुळे भारतावर सत्ता गाजवणे ब्रिटिश सरकारला अवघड होऊ लागले होते. त्यामुळे भारताला जून १९४८ पर्यंत पूर्ण स्वातंत्र्य देण्याची घोषणा इंग्लंडचे पंतप्रधान क्लेमंट अ‍ॅटली यांनी इग्लंडच्या संसदेत फेब्रुवारी १९४७ मधेच केली होती. दुसर्‍या महायुद्धादरम्यान ब्रम्हदेशात लढणारे जपानी सैनिक १५ ऑगस्ट १९४५ ला इंग्रजांपुढे शरण आले. या विजयी इंग्रज सैन्याचे प्रमुख असणारे लॉर्ड माऊंटबॅटन पुढे भारताचे गव्हर्नर जनरल झाले. भारताला स्वातंत्र्य केव्हा द्यायचे असा प्रश्न निर्माण झाल्यावर त्यांनी मुहूर्त शोधला तो १५ ऑगस्टचाच!
=========================================
अ) महत्त्वाच्या घटना:
   ----------------
१९८८
पंतप्रधान राजीव गांधी यांनी लाल किल्ल्यावरून केलेल्या भाषणानंतर 'मिले सुर मेरा तुम्हारा' हे गाणे दूरदर्शनवरुन पहिल्यांदाच प्रसारित करण्यात आले.
१९८२
भारतात रंगीत दूरचित्रवाणीच्या प्रसारणास सुरूवात झाली.
१९७५
बांगला देशात लष्करी उठाव होऊन बांगला देशाचे संस्थापक शेख मुजीबूर रहमान व त्यांच्या कुटुंबीयांची हत्या करण्यात आली.
१९७१
अमेरिकन डॉलरचे सोन्याशी असलेले संधान खंडित झाले.
१९४८
स्वातंत्र्याच्या पहिल्या वर्धापनदिनी, साने गुरुजींनी साधना हे साप्ताहिक सुरु केले.
१९४७
ब्रिटिश राजवट संपून भारत स्वतंत्र झाला. देशाची फाळणी झाली. पश्चिम पंजाब, सिंध, बलुचिस्तान, वायव्य सरहद्द प्रांत व पूर्व बंगाल हे पाकिस्तानात समाविष्ट झालेले प्रदेश सोडून संस्थाने वगळता राहिलेला प्रदेश स्वतंत्र भारत म्हणून अस्तित्त्वात आला.
१९४७
भारताचे पहिले पंतप्रधान म्हणून पं. जवाहरलाल नेहरू यांनी सूत्रे हाती घेतली.
१९४७
पाकिस्तानचे निर्माते मुहम्मद अली जिना यांचा पाकिस्तानचे पहिले गव्हर्नर जनरल म्हणून कराची येथे शपथविधी झाला.
१९४५
दुसरे महायुद्ध – जपानने दोस्त राष्ट्रांसमोर (Allied Nations) शरणागती पत्करली.
१९२९
ग्राफ झेपेलिन हा संशोधक 'झेपेलिन' बलूनमधून जगप्रवासासाठी रवाना
१९१४
प्रशांत महासागर आणि अटलांटिक महासागर यांना जोडणाऱ्या पनामा कालव्याचे बांधकाम पूर्ण झाले. ४ मे १९०४ रोजी ८२ किमी लांबी असलेला हा कालवा बांधण्यास अमेरिकेने सुरुवात केली होती.
१९१४
एस. एस. अ‍ॅनकॉन हे पहिले व्यापारी जहाज पनामा कालव्यातुन पार झाले.
१८६२
मद्रास उच्‍च न्यायालयाची स्थापना
१६६४
कुडाळ प्रांतात शिवाजी महाराजांनी खवासखानाला (दुसर्‍यांदा) पराभूत केले.
१५१९
पनामा सिटी शहराची स्थापना झाली.
=========================================
क) मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:
    -------------------------
२०१८
अजित वाडेकर – भारताचे क्रिकेट कप्तान, डावखुरे फलंदाज
(जन्म: १ एप्रिल १९४१)
२००४
अमरसिंग चौधरी – गुजरातचे मुख्यमंत्री
(जन्म: ३१ जुलै १९४१)
१९७५
शेख मुजीबुर रहमान – बांगलादेशचे संस्थापक व पहिले राष्ट्राध्यक्ष यांची लष्करातील सैनिकांनी त्यांच्या प्रासादावर हत्या केली.
(जन्म: १७ मार्च १९२०)
१९७४
स्वामी स्वरुपानंद यांनी समाधी घेतली
(जन्म: १५ डिसेंबर १९०३)
१९४२
महादेव देसाई – स्वातंत्र्य लढ्यातील नेते आणि महात्मा गांधींचे स्वीय सहाय्यक
(जन्म: १ जानेवारी १८९२)
=========================================

-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-15.08.2023-मंगळवार.
=========================================