१५-ऑगस्ट-दिनविशेष-B

Started by Atul Kaviraje, August 15, 2023, 04:51:28 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

मित्र/मैत्रिणींनो,

     आज दिनांक-१५.०८.२०२३-मंगळवार.जाणून घेऊया,आजच्या दिवसाचे "दिनविशेष"

                                "१५-ऑगस्ट-दिनविशेष"
                               ----------------------

ब) जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:
  -----------------------------
१९५८
सिंपल कपाडिया – अभिनेत्री आणि वेशभूषाकार
(मृत्यू: १० नोव्हेंबर २००९)
१९४७
राखी – चित्रपट अभिनेत्री
१९४५
बेगम खालेदा झिया – बांगला देशच्या पंतप्रधान
१९२९
उमाकांत निमराज ठोमरे – साहित्यिक, अनेकांना लिहिते करणारे, वाचकप्रिय 'वीणा' या दर्जेदार मासिकाचे संपादक, बालसाहित्यकार
(मृत्यू: ७ आक्टोबर १९९९)
१९२४
श्यामलालबाबू हरलाल राय ऊर्फ 'इंदीवर' – गीतकार. आपल्या ४० वर्षांच्या कारकिर्दीत ३०० हून अधिक चित्रपटांसाठी सुमारे १००० गाणी लिहिली. १९४९ मध्ये 'मल्हार' चित्रपटातील 'बडे अरमान से रख्खा हैं बलम तेरी कसम' या गाण्याने ते प्रकाशझोतात आले. 'दिल ऐसा किसीने मेरा तोडा' (१९७६) या गाण्यासाठी त्यांना फिल्मफेअर पारितोषिक मिळाले. 'छोड़ दे सारी दुनिया किसी के लिए', 'कस्मे वादे प्यार वफा सब', 'मेरे देश की धरती सोना उगले उगले हीरे मोती', 'दुल्हन चली वो पहन चली', 'कोई जब तुम्हारा हृदय तोड़ दे', 'चन्दन सा बदन, चंचल चितवन', 'मैं तो भूल चली बाबुल का देस', 'नदियां चले चले रे धारा', 'फूल तुम्हें भेजा है ख़त में', 'जीवन से भरी तेरी आँखें', 'जिन्दगी का सफ़र, है ये कैसा सफ़र', 'कोई जब तुम्हारा हृदय तोड़ दे', 'हैं प्रीत जहाँ की रीत सदा', 'जो तुमको हो पसंद वही बात करेंगे', 'मेरी प्यारी बहनिया बनेगी दुल्हनियां', 'दिल ऐसा किसी ने मेरा तोड़ा', 'होंठों से छू लो तुम' अशी अनेक बहारदार गीते त्यांनी लिहिली आहेत.
(मृत्यू: २७ फेब्रुवारी १९९७)
१९२२
वामनदादा कर्डक – लोककवी
१९१७
अंबूताई गोरे तथा सरोजिनी मधुसूदन शारंगपाणी – ललित, वैचारिक, नाट्य, काव्य आदी विविध प्रकारांत मोठ्या प्रमाणावर लेखन करणार्‍या लेखिका. 'दुर्दैवाशी दोन हात' या त्यांच्या आत्मचरित्रपर पुस्तकाला १९७५ मधे राज्य सरकारचा पुरस्कार मिळाला होता.
(मृत्यू: १३ नोव्हेंबर २००१)
१९१५
इस्मत चुगताई – ऊर्दू कथा व पटकथा लेखिका
(मृत्यू: २४ आक्टोबर १९९१)
१९१३
भगवान रघुनाथ कुळकर्णी ऊर्फ 'फुलारी' ऊर्फ 'बी. रघुनाथ' – लेखक व कवी
(मृत्यू: ७ सप्टेंबर १९५३)
१९१२
'सूर रंग' उस्ताद अमीर खॉं – शास्त्रीय गायक व इंदौर घराण्याचे संस्थापक
(मृत्यू: १३ फेब्रुवारी १९७४)
१८७२
योगी अरविंद घोष – क्रांतिकारक, तत्त्वचिंतक, योगी व कवी
(मृत्यू: ५ डिसेंबर १९५० - पाँडिचेरी)
१८६७
गणपतराव जोशी – रंगभूमीवरील असामान्य अभिनेते, शेक्सपियरच्या नाटकांतील त्यांच्या भूमिका अतिशय गाजल्या होत्या
(मृत्यू: ७ मार्च १९२२)
१७६९
नेपोलिअन बोनापार्ट – फ्रान्सचा सम्राट, असामान्य सेनापती आणि कर्तबगार प्रशासक
(मृत्यू: ५ मे १८२१ - सेंट हेलेना)
=========================================

-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-15.08.2023-मंगळवार.
=========================================