पाऊस नर्तकी कविता-पाऊस छेडतोय जलधारांतून सरगम, आनंदविभोर मी नाचतेय छम छम छम छम

Started by Atul Kaviraje, August 16, 2023, 11:03:36 AM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

मित्र/मैत्रिणींनो,

     आज मी तुम्हाला, पावसाच्या तालावर नाचणाऱ्या तरुणीची एक कविता-गीत ऐकवितो. "छम छम छम हे, छम छम छम हे, छम छम छम, मैं नाचू आज"- या हिंदी गाण्यावर ते आधारित आहे. आशा आहे ते तुम्हाला आवडेल. भरभरून लाईक करा, व मला प्रोत्साहित करा. आपणा सर्वांस ऑगस्ट महिन्याची पावसाचा हलकासा शिडकावा होत असलेली ही बुधवार-सकाळ आनंदाची जावो, ही सदिच्छा.

--मूळ हिंदी गाणे-( छम छम छम हे, छम छम छम हे, छम छम छम, मैं नाचू आज )           
------------------------------------------------------------------------

   "पाऊस छेडतोय जलधारांतून सरगम, आनंदविभोर मी नाचतेय छम छम छम छम"
  ----------------------------------------------------------------------

पाऊस छेडतोय जलधारांतून सरगम
आनंदविभोर मी नाचतेय छम छम छम छम
पाऊसच माझा आहे मित्र, तोच आहे माझा हमदम,
मला कवेत घेऊन नाचवणारा तोच माझा एकुलता प्रियतम

पाऊस छेडतोय जलधारांतून सरगम
आनंदविभोर मी नाचतेय छम छम छम छम
लय, ताल सांभाळीत जणू वाजतोय पावसाचा पडघम,
या त्याच्या प्रेम-तुषारIत मी न्हाऊन निघतेय हरदम

आपल्या वर्षावाने तो मला चिंब भिजवत आहे
सतत अभिषेकाने माझ्या मनी शिरकाव करू पाहत आहे
सवे खट्याळ पवनही माझा पदर उडवीत आहे,
सप्तसुरांच्या तालावर तो मला बळेच नाचवित आहे

हा पाऊस जणू माझ्या प्रेमातच पडलाय
माझ्या नशील्या डोळ्यांत पाहून तो मदहोश झालाय
वेडेपणाची सारी सीमा पार करून, बेलगाम होऊन,
तो फक्त माझ्यासाठी बरसत आहे, अखंड वर्षत आहे

आणि आज मीही बेफिकीर झालेय, बेपर्वा झालेय
त्याचे माझ्यावरील प्रेम पाहून, मी हरवून गेलेय
आपल्या संततधारेत तो मला नाचवतोय छम छम छम छम,
पाहत पाहता मी त्याच्या पूर्णपणे आधीन झालेय

पाऊस छेडतोय जलधारांतून सरगम
आनंदविभोर मी नाचतेय छम छम छम छम
मी त्याची प्रेयसी, तो आहे माझा प्रियकर,
मी आहे वर्षानुवर्षे प्यासी, तो पIजतोय मला जलामृताचा जाम

पाऊस छेडतोय जलधारांतून सरगम
आनंदविभोर मी नाचतेय छम छम छम छम
आज तोच गायक, आज तोच शायर, आज तोच बांधतोय समाही,   
मी त्याची नृत्यांगना, तालावर नुपूर निनादताहेत छम छम छम छम

आज तो माझा मनमीत झालाय, मला तो आवडलाय
मी त्याची राणी, तो माझ्या दिलाचI राजा झालाय
घेऊन जा रे मला पावसा तुझ्यासमवेत दूर दूर अंबरी,
जा घेऊन जा तिथे, जिथून पुन्हा परतायचं नाही मला घरी

तू मला आवडलास, मी तुझ्यावर प्रेम करू लागलेय
तुझ्या प्रत्येक थेम्ब स्पर्शाने माझं तन मन मोहरू लागलेय
ऐक माझ्या हृदयातील धडधड, तुझेच गीत गाऊ लागलीय,
तुझ्या प्रेम वर्षावाने चिंब होऊन, तुझ्यात ती सामावू लागलीय 

अन अवचित पुन्हा माझे पाय त्या तालावर थिरकू लागलेत
एखाद्या कुशल नर्तकींसमान ते तुझ्याभोवती गिरकी घेऊ लागलेत
मी बेभान होतेय, मी बेधुंद होतेय, मी माझ्या होशमध्ये नाही,
मदहोश करणारा तुझ्या पडण्याचा फक्त आवाजच येत राही

पाऊस छेडतोय जलधारांतून सरगम
आनंदविभोर मी नाचतेय छम छम छम छम
इतकी आनंदी मी कधीच नव्हते माझ्या जीवनात,
या पावसाच्या स्वाधीन केलेत मी माझे सारे गम 

पाऊस छेडतोय जलधारांतून सरगम
आनंदविभोर मी नाचतेय छम छम छम छम
इथे फक्त आपण दोघे आहोत, गात नाचत आहोत,
जगाची पर्वा आहे कुणाला, सिर्फ तुम हो और है हम

भावविभोर मी नाचतेय, पाऊस मला तालावर नाचवतोय
अवखळ वारा, खेळवीत धारा माझ्या अंगाशी खेटतोय
अगणित बूंद, करीत धुंद, तनास माझ्या चुंबित आहेत,
लाजेचा पदर दूर सारून, माझी कायI मोहरत आहे   

रोम रोम पुलकित झालाय माझ्या साऱ्या देहावरला
पावसाचा गIर स्पर्श वेडावून गेलाय माझ्या गात्रागात्राला
हा अनुभव अनुभवत होते मी गेली कित्येक वर्षे,
पण काही वेगळीच जादू आहे रे पावसा आज तुझ्या पडण्याला

हा क्षण इथेच थांबIवा, पुढेच न सरकIवा
पावसा, तुझ्यासमवेत तो अविरत, अखंड मी जगावा
वेड लावलय मला तू, आपलंस केलंस मला तू,
तुझ्यात मला घे सामावून, जीव तुझ्यात कायम गुंतIवा

पाऊस छेडतोय जलधारांतून सरगम
आनंदविभोर मी नाचतेय छम छम छम छम
काय घडतंय ते समजण्याच्या पलीकडे गेलेय मी,
अजूनही माझी पावले अथक नाचताहेत, बेधुंद बेफाम

पाऊस छेडतोय जलधारांतून सरगम
आनंदविभोर मी नाचतेय छम छम छम छम
आज नवजीवन मला मिळालेय, मी धन्य झालेय,
आभारी आहे मी तुझी पावसा, मुखी आहे तुझेच नाम

पावसा तुझा ताल, माझी धडकन एक होत आहे
त्यातून एक नवीन गाणे, नव-गीत जन्मI येत आहे
तुझा साज, माझा आवाज गाण्याला आकार देत आहे,
माझ्या आयुष्याला, माझ्या जगण्याला एक अर्थ येत आहे

आज मला नाचू दे, मनमुराद नाचू दे, मनसोक्त नाचू दे
पावसा मला तुझ्यात रममाण होऊ दे, तुझ्यात सामावू दे
मला तू भिजवं, चिंब कर, तुला सतत पडताना पाहू दे,
मला तू धारांनी सजव, तुझ्या तुषारात नाचव, मला मुक्त न्हाऊ दे

आज मी माझीच नाही राहिले, पावसा मला तू जिंकले
तुझे पडणे माझ्यावर जादू करून गेले, किमया करून गेले
तू खराच आहेस जादूगार, तूच आहेस किमयागार,
तुझ्या प्रवाहात माझे आसक्त मन केव्हाच वाहून गेले

पाऊस छेडतोय जलधारांतून सरगम
आनंदविभोर मी नाचतेय छम छम छम छम
हा पाऊस इतका आनंदी करतोय, खुश करतोय मज,
तो आहे माझा बलम आणि मी आहे त्याची बेगम

पाऊस छेडतोय जलधारांतून सरगम
आनंदविभोर मी नाचतेय छम छम छम छम
फक्त त्याच्या पडण्याचा अन गाण्याचाच आवाज ऐकू येतोय,
अन त्याच तालावर माझी पैंजण खनकतेय छम छम छम छम

-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-16.08.2023-बुधवार.
=========================================