पारशी नूतन वर्ष-पतेती-लेख-1

Started by Atul Kaviraje, August 16, 2023, 11:07:39 AM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

                                 "पारशी नूतन वर्ष-पतेती"
                                ----------------------

मित्र/मैत्रिणींनो,

     आज दिनांक-१६.०८.२०२३-बुधवार आहे. आज "पारशी नूतन वर्ष-पतेती" आहे. महाराष्ट्रात हा दिवस 'पतेती' म्हणून हा दिवस साजरा करण्यात येतो. नवरोज हा दिवस पारशी समुदायासाठी अत्यंत महत्वाचा असून आजचा दिवस मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात येतो. या दिवशी लोक नवीन कपडे घालतात, मंदिरात जातात, घरात मिठाई आणि पदार्थ बनवतात आणि लोक एकमेकांना भेटवस्तू देऊन आनंद साजरा करतात. पारशी समाजाचे लोक मंदिरातील अग्नीला साक्षी मानतात आणि स्वतःसाठी आणि आपल्या कुटुंबासाठी सुख, शांती आणि समृद्धीची प्रार्थना करतात आणि गरिबांना दान देखील करतात. मराठी कवितेच्या माझ्या सर्व पारशी बंधू-भगिनीस पतेतीच्या अनेक हार्दिक शुभेच्छा. वाचूया पतेतीचे काही महत्त्वपूर्ण लेख.

     Pateti 2023 – पारशी वार्षिक कॅलेंडर नुसार वर्षाचा शेवटचा दिवस म्हणजे पतेती. नवीन वर्ष सुरु होण्याच्या आदल्या दिवशी पतेती सण (pateti festival) साजरा केला जातो .त्याचा बरोबर नवरोज हा देखील साजरा केला जातो . आता आपण सविस्तर जाणून घेऊयात की ( pateti festival information in marathi ) पतेती सण माहिती आपल्या मायबोली मराठी भाषे मध्ये.

या वर्षात पतेती 2023 हा सण 16 ऑगस्ट,  वार बुधवार रोजी आहे. स्वातंत्र्यदिन नंतर दुसऱ्या दिवशी आहे. आणि पारशी नूतन वर्ष सण 1393 सुरुवात (प्रारंभ) आहे .

              पतेती म्हणजे काय ?--

     नवीन वर्षाच्या आदल्या दिवशी म्हणजे  पतेतिच्या दिवशी पारशी धर्मीय हे सरत्या वर्षात झालेल्या चुका , कडू-गोड आठवणी ,  झालेल्या गुन्ह्यांची कबुली  देऊन  पश्चाताप करण्याचा हा दिवस असतो आणि या दिवसाला ( pateti ) पतेती असे म्हणतात .

              नवरोज म्हणजे काय ?--

     इस्रायल कॅलेंडरनुसार वर्षाच्या पहिल्या दिवसाला नवरोज असे म्हणतात . नवरोज या शब्दाचा अर्थ ( नवी सृष्टी )  असा होतो .

              पारशी नूतन वर्ष कसे साजरे करतात ?--

     पारशी लोकांसाठी नवरोज हा खूप मोठा उत्साहाचा आणि आनंदाचा दिवस असतो .ह्या दिवशी पारशी लोक त्यांच्या अग्यारीत म्हणजेच  ( प्रार्थना स्थळी ) जातात व प्रार्थना म्हणतात .

     एकमेकांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा देतात, गळाभेट घेतात, मित्र-मैत्रिणींना भेटतात ,. एकत्र जमून जेवणाचा आनंद घेतात आणि याच बरोबर दान करण्याची ही देखील रीत असते.

     पारसी  जेवणात महत्त्वाचा भात आणि दालच्या ( घट्ट वरण )  याचा समावेश असतो .पारशी लोक मोठ्या प्रमाणावर  मांसाहारी (non-veg)  असतात.

     त्यात  मुख्यतः  मच्छी,  धनसाक,  फर्चा , सली कोंबडी,  चिकन असे बरेच पारशी मांसाहारी पदार्थ यांचा समावेश असतो. त्याच बरोबर अंड्यांचे ही बरेच प्रकारचे नाश्ते आढळतात. जसे  अंडी,  स्क्राबल  एग,  पोरो, आणि पारसी अकूरी यांचा समावेश असतो.

     पारशी लोक त्यांच्या अग्यारीत प्रार्थना करून झाल्यावर एकत्र येऊन  जेवणाचा आनंद घेत नवीन वर्ष म्हणजेच  नवरोज साजरी करतात.

--By poonam m.
-------------------

                    (साभार आणि सौजन्य-संदर्भ-मराठीफेस्टिवल.कॉम)
                   ---------------------------------------------

-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-16.08.2023-बुधवार.
=========================================