पारशी नूतन वर्ष-पतेती-शुभेच्छा-1

Started by Atul Kaviraje, August 16, 2023, 11:09:34 AM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje


                               "पारशी नूतन वर्ष-पतेती"
                              ----------------------

मित्र/मैत्रिणींनो,

     आज दिनांक-१६.०८.२०२३-बुधवार आहे. आज "पारशी नूतन वर्ष-पतेती" आहे. महाराष्ट्रात हा दिवस 'पतेती' म्हणून हा दिवस साजरा करण्यात येतो. नवरोज हा दिवस पारशी समुदायासाठी अत्यंत महत्वाचा असून आजचा दिवस मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात येतो. या दिवशी लोक नवीन कपडे घालतात, मंदिरात जातात, घरात मिठाई आणि पदार्थ बनवतात आणि लोक एकमेकांना भेटवस्तू देऊन आनंद साजरा करतात. पारशी समाजाचे लोक मंदिरातील अग्नीला साक्षी मानतात आणि स्वतःसाठी आणि आपल्या कुटुंबासाठी सुख, शांती आणि समृद्धीची प्रार्थना करतात आणि गरिबांना दान देखील करतात. मराठी कवितेच्या माझ्या सर्व पारशी बंधू-भगिनीस पतेतीच्या अनेक हार्दिक शुभेच्छा. वाचूया पतेतीच्या शुभेच्छा.

     नवरोझ हा दिवस पारशी समुदायासाठी अत्यंत महत्वाचा असून आजचा दिवस मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात येतो. या दिवशी पारशी समुदाय नवीन कपडे परिरधान करुन प्रार्थना करतात, समुदायातील इतर लोकांच्या भेटी घेतात, एकमेकांना मिठाईचे वाटप करतात. यादिवसाच्या शुभेच्छा सोशल माध्यमांद्वारे देण्यासाठी खास शुभेच्छा संदेश.

     आज पतेती म्हणजे पारसी नववर्षाचा प्रारंभ आहे. प्रत्येक वर्षी ऑगस्ट महिन्यात पारसी नववर्षारंभ साजरा करण्यात येतो, पारसी नववर्षाला 'नवरोज' असेही म्हणतात. पारसी समुदायासाठी ३६० दिवसांचे वर्ष असते, तर उर्वरीत ५ दिवस हे गाथा म्हणण्यासाठी असतात. पारसी समाजबांधव अग्निची पूजा करतात. हिंदू धर्मात अग्निला वाहक मानलं जातं. अग्निला पवित्र मानलं जातं. या वर्षी सोमवार १६ ऑगस्ट रोजी पतेती पारसी नववर्षारंभ साजरा केला जाईल. इस्रायल कँलेडरच्या नुसार पहिल्या दिवसाला पारसी नववर्षाला सुरुवात होते. महाराष्ट्रात हा दिवस 'पतेती' म्हणून हा दिवस साजरा करण्यात येतो. नातलग आप्तस्वकीयांसाठी खास शुभेच्छा संदेश.

       Parsi New Year 2023 : पतेती म्हणजे पारशी नववर्ष, या दिवसाच्या अशा द्या शुभेच्छा--

"पुन्हा एक नवीन वर्ष, पुन्हा एक नवी आशा,
तुमच्या कर्तॄत्वाला पुन्हा लाभो एक नवी दिशा,

नवी स्वप्ने, नवी क्षितीजे, सोबत माझ्या नव्या शुभेच्छा
पारसी नववर्षाच्या खूप खूप शुभेच्छा"

"राजाचा आशीर्वाद तुमच्यावर सदैव राहो,
तुमचे पुढचे वर्ष आनंदात आण सुखात जावो,
पतेती आणि नवरोझच्या खूप शुभेच्छा!"

"नवं पान, नवा दिवस,
नवी स्वप्नं, नवी ध्येयं,
नव्या आशा, नव्या दिशा,
नवी माणसं, नवी नाती,
नवं यश, नवा आनंद.
कधी अपूर्ण, कधी संपूर्ण,
नवा हर्ष, नवं वर्ष...!

या सुंदर वर्षासाठी
हॅपी नवरोझ"

"येवो समृद्धि अंगणी,
वाढो आनंद जीवनी,
तुम्हासाठी या शुभेच्छा,
नवरोझ आणि पतेतीच्या या शुभदिनी..!"

--By प्रियंका वाणी
-----------------

                      (साभार आणि सौजन्य-संदर्भ-महाराष्ट्र टाईम्स.कॉम)
                     --------------------------------------------

-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-16.08.2023-बुधवार.
=========================================