पारशी नूतन वर्ष-पतेती-शुभेच्छा संदेश

Started by Atul Kaviraje, August 16, 2023, 11:30:43 AM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

                                "पारशी नूतन वर्ष-पतेती"
                               -----------------------

मित्र/मैत्रिणींनो,

     आज दिनांक-१६.०८.२०२३-बुधवार आहे. आज "पारशी नूतन वर्ष-पतेती" आहे. महाराष्ट्रात हा दिवस 'पतेती' म्हणून हा दिवस साजरा करण्यात येतो. नवरोज हा दिवस पारशी समुदायासाठी अत्यंत महत्वाचा असून आजचा दिवस मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात येतो. या दिवशी लोक नवीन कपडे घालतात, मंदिरात जातात, घरात मिठाई आणि पदार्थ बनवतात आणि लोक एकमेकांना भेटवस्तू देऊन आनंद साजरा करतात. पारशी समाजाचे लोक मंदिरातील अग्नीला साक्षी मानतात आणि स्वतःसाठी आणि आपल्या कुटुंबासाठी सुख, शांती आणि समृद्धीची प्रार्थना करतात आणि गरिबांना दान देखील करतात. मराठी कवितेच्या माझ्या सर्व पारशी बंधू-भगिनीस पतेतीच्या अनेक हार्दिक शुभेच्छा. वाचूया पतेती आणि पारशी नववर्षाच्या मराठी शुभेच्छा संदेश.

     पारशी समाजाच्या पारंपरिक झोरोस्टर कॅलेंडरनुसार वर्षाचा शेवटचा दिवस हा 'पतेती' (Pateti Festival 2022) म्हणून ओळखला जातो. भारतामध्ये 15 ऑगस्ट रोजी 'पतेती' सण आहे, तर 16 ऑगस्ट दिवशी पारशी समाज नववर्ष (Parsi New Year) साजरं करणार आहे.

     Pateti, Parsi Nav Varshachya Marathi shubhechha Sandesh: पतेती हा पारशी लोकांचा सण असून पारशी समाजाच्या पारंपरिक झोरोस्टर कॅलेंडरनुसार (Zoroastrian Calendar) वर्षाचा शेवटचा दिवस हा 'पतेती' (Pateti Festival 2023) म्हणून ओळखला जातो. या दिवशी ते अहुरा माजदाचे प्रतीक म्हणून अग्नीची पूजा करतात. या उत्सवात पारशी समाजातील लोक चांगले विचार करण्याचा, चांगले शब्द बोलण्याचा आणि चांगली कामे करण्याचा प्रयत्न करतात. भारतामध्ये 15 ऑगस्ट रोजी 'पतेती' (Pateti 2022) सण आहे, तर 16 ऑगस्ट दिवशी पारशी समाज नववर्ष साजरं करणार आहे. पारशी नववर्षाचा (Parsi New Year) पहिला दिवस हा नवरोझ (Nowruz) म्हणून देखील ओळखला जातो. पारशी नूतन वर्षाचा आरंभ 'फरवर्दीन' माहिन्याने होतो.या नवीन वर्षानिमित्त तुम्ही तुमच्या मित्रांना मराठीतून शुभेच्छा देऊ शकता. यासाठी आम्ही येथे काही शुभेच्छा संदेश देत आहोत.

         पतेती आणि पारशी नववर्षाच्या मराठी शुभेच्छा संदेश--

=========================================
राजाचा आशीर्वाद तुमच्यावर सदैव राहो हे वर्ष तुमच्यासाठी भरभराटीचे जावो, पतेती, नवरोज मोठ्या उत्साहात आणि आनंदाने साजरा करूया, पारशी नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा

या वर्षी नवरोज साजरा अधिक आनंदाद साजरे करूया तुम्हाला पुढील वर्ष आनंदाचे आणि भरभराटीचे जावो. पारशी नववर्षाच्या खूप खूप शुभेच्छा

मी तुम्हाला प्रेम आणि काळजीने भरलेल्या पारसी नवीन वर्षाच्या शुभेच्छा पाठवत आहे. पतेती आमि नवरोझच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा!

आयुष्याचा नवा अध्याय उलगडत असताना तुमच्यासोबत माझ्या खूप खूप शुभेच्छा पारशी नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा

राजाचा आशीर्वाद तुमच्यावर सदैव राहो, तुमचे पुढचे वर्ष आनंदात आण सुखात जावो, पतेती आणि नवरोझच्या खूप शुभेच्छा!

राजा वर्षभर तुमच्यावर आनंत आणि सुखाचा भरभरून आशीर्वादाचा वर्षाव करो, पारशी नवीन वर्षाच्या शुभेच्छा!

नवीन सुरुवात खूप रोमांचक आहे नवीन संधी तुमची वाट पाहत आहेत, सर्वांना पारशी नववर्षाच्या शुभेच्छा!

नवीन वर्ष सुरू होत असताना, संपूर्ण नवरोझ देव तुम्हाला आशीर्वाद देवो, पारशी नवीन वर्षाच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा!

पक्ष्यांप्रमाणेच आपण सर्व नकारात्मकता मागे टाकू या, नवीन वर्षाचं स्वागत सकारात्मक विचारांनी करूया, पतेती आणि नवरोजच्या खूप खूप शुभेच्छा!

वाईट विचारांना निरोप द्या, नवीन आशांचा स्वीकार करा, या पारशी नववर्षाच्या तुम्हाला हार्दिक शुभेच्छा!

या पारशी नववर्षात तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होवोत, यश, सुख आणि आनंदाने तुमच्या दारावर ठोठवोत, तुमच्या मनापासूनच्या सर्व इच्छा पूर्ण होवोत, पारशी नवीन वर्षाच्या शुभेच्छा!

येणारे वर्षे तुमच्यासाठी खूप आनंदाची जावो, पारशी नववर्षाच्या खूप खूप शुभेच्छा!

मी तुमच्या अपार आनंद आणि समृद्धीसाठी प्रार्थना करतो, तुमचे पुढील वर्ष उल्लेखनीय आणि आनंदी जाओ, पतेती आणि नवरोझच्या खूप खूप शुभेच्छा.
=========================================

--By India.com News Desk
--Edited by Chandrakant Jagtap
------------------------------------

                           (साभार आणि सौजन्य-संदर्भ-इंडिया.कॉम)
                          -------------------------------------

-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-16.08.2023-बुधवार.
=========================================