बऱ्याच वर्षांनी भेटली कॉलेज ची मैत्रीण

Started by Lekhani, August 16, 2023, 05:09:57 PM

Previous topic - Next topic

Lekhani

सकाळच्या बस मध्ये खिडकी जवळ ती मला दिसली
माझ्याकडे पाहून तिने खिडकी बंद करून घेतली
तिच्याच नशिबाचे भोग माझ्या वर्गात ती दिसली
तिला पाहून वर्गातली सर्व पोरं तिच्यावर लाईन मारू लागली
तशी ती मला दिसेल अशीच समोरच्या बाकावर बसायची
मला वर्गात येता चार शिव्या नक्की द्यायची
मला आजही आठवतोय बारावीला  शेवटचा गणितच पेपर होता
पुन्हा तिच्या नशिबाचे भोक  तिच्या पुढच्या बाकावर माझाच नंबर होता
कधी नाही ते त्या दिवशी ती माझ्याशी बोलली
  इंटिग्रेशन डेरिव्हेटिव्ह चे प्रश्न विचारू लागली
आज पाच सहा वर्षांनी रेशन दुकानावर ती दिसली
जिच्यावर वर्ग लाईन मारत होता ती आज मला लाईन देऊ लागली
ती जवळ आली आणि म्हणाली तुला कुठेतरी पाहिलय
मी ही म्हणालो ते इंटिग्रेशन डेरिव्हेटिव्ह  उत्तर दाखवायचं राहिलय#NB39
😜😝

:-निखिल भडेकर