श्रावण

Started by mkapale, August 18, 2023, 11:05:04 AM

Previous topic - Next topic

mkapale

श्रावण

एक एक कण मातीचा
हिरव्या रंगाने नटलेला
थेंबांचे मोती लेऊन जणू
निसर्ग शृंगारानी सजलेला

झरे वाहती , तुषार नाचती
चहूकडे उल्हास दरवळला
अनेक छटा रंगांच्या उधळत
हर्ष पिसारा ऋतूने फुलवला

नव्या पालव्या, पक्षी गाती
घरटयांतूनि सौंसार थाटती
शिवार भरले,  तरुण झाले
बळीराजाची पाठ थोपती

दुथडी वाहत नद्या म्हणती
ओसंडून तो आनंद वाहूदे
वाजवी श्रावण बिगुल सणांचे
उत्साहात सारे साजरे होउदे