कविता-पावसाच्या जलधारांत तुझी चूनरी भिजली, माझ्या प्रेमात तू नखशिखांत नाहली

Started by Atul Kaviraje, August 18, 2023, 11:48:31 AM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

मित्र/मैत्रिणींनो,

     आज मी तुम्हाला, पावसात नाचणाऱ्या प्रियेची एक कविता-गीत ऐकवितो. "छुप गए सारे नजारें ओए क्या बात हो गयी, तूने काजल लगाया दिन में रात हो गयी"- या हिंदी गाण्यावर ते आधारित आहे. आशा आहे ते तुम्हाला आवडेल. भरभरून लाईक करा, व मला प्रोत्साहित करा. आपणा सर्वांस ऑगस्ट महिन्याची ही पाऊस थांबून चक्क ऊन पडलेली शुक्रवार-सकाळ आनंदाची जावो, ही सदिच्छा.

--मूळ हिंदी गाणे-( छुप गए सारे नजारें ओए क्या बात हो गयी, तूने काजल लगाया दिन में रात हो गयी )           
--------------------------------------------------------------------------

     "पावसाच्या जलधारांत तुझी चूनरी भिजली, माझ्या प्रेमात तू नखशिखांत नाहली" 
    -------------------------------------------------------------------

पावसाच्या जलधारांत तुझी चूनरी भिजली
माझ्या प्रेमात तू नखशिखांत नाहली 
जीव आहे माझा तुजवरी, मनापासून प्रेम करतोय,
तो पाऊसही पहा पडून याची ग्वाही देतोय

पावसाच्या जलधारांत तुझी चूनरी भिजली
माझ्या प्रेमात तू नखशिखांत नाहली
तुझी मस्करी करण्याची आम्हा दोघांनाही लहर अIली,
तुला चिंब भिजवत आम्ही दोघांनाही ही मजा लुटली

पावसाच्या धुक्यात सारी सृष्टी झिरझिरीत पडद्यात लपलीय
अवघ्या धरेने पाऊस-जल पिऊन हिरवळीची शाल पांघरलीय
एकटक हा नजIर पाहता, नजर माझी खिळून राहिलीय,
निसर्गाच्या सौंदर्याचा हा दैवी अIविष्कार पाहून मतीच गुंग झालीय

आणि अशात तुझे चिंब सौंदर्य आणिक नजर खिळवून ठेवतेय
तुझ्या डोळ्यांतले काळे काजळ त्या कृष्ण-जलदांची बरोबरी करतेय
किंचित थबकून तो पाऊसही मंद वृष्टीत तुला भिजवतोय,
तो खट्याळ वाराही सवे तुझ्या देहाशी अंगलट करतोय

अश्यातच तुझी आणि माझी नजरI नजर होतेय
मनातल्या गोड उर्मिला प्रेमाची कोवळी पालवी फुटतेय
हे अंकुरलेले प्रेम निशब्द डोळ्यातून बोलतय, डोलतय,
मनाला मनाची प्रेम-भाषा शब्दाविनाच कळून येतेय

पावसाच्या जलधारांत तुझी चूनरी भिजली
माझ्या प्रेमात तू नखशिखांत नाहली 
माझ्या प्रेमाने आज पुढची पायरी ओलांडलीय,
तुझ्या अधरावर माझ्या अधराने प्रेमाची छाप सोडलीय

पावसाच्या जलधारांत तुझी चूनरी भिजली
माझ्या प्रेमात तू नखशिखांत नाहली 
अशीच घट्ट कवेत राहा तू माझ्या प्रिये,
तुझी धडकन आणि माझी धडकन एक झालीय

नजर तुलाच शोधतेय सारखी, तुझ्याविण मला चैन नाही पडत
जमान्याची नको करू पर्वा, त्याविना आपले काही नाही अडत
आपले प्रेम खर आहे, तुझे आणि माझे मनापासून आहे,
आता आणि नकोय बहाणा, तुला भेटण्यास मी बेचैन आहे

माझ्या एका हाकेला तू धावत ये प्रिये, उशीर नको सखये
बघ, हा पाऊस अडलाय, पडायचा थांबलाय कधीचI
आम्हा दोघांनाही नाहीय चैन तुझ्यावाचून, नाही लक्ष कशातही,
तुझ्या दर्शनाची पहा लागलीय आस, आता विलंब नकोय उगीच

तुला भिजवायला पाऊस उत्सुक आहे, उत्साही आहे
तुझ्यासवे मुक्त खेळण्यास वाराही जोशात भरारी घेत आहे
तुझे नसणे, तुझे हरवणे मला निराश, भ्रमनिरास करीत आहे,
हा तुझा देवदास, तुझ्यासाठी कधीचI उदास बसला आहे

पावसाच्या जलधारांत तुझी चूनरी भिजली
माझ्या प्रेमात तू नखशिखांत नाहली 
नितांत प्रेम आहे माझे तुझ्यावर, तूच माझे जीवन,
अशांत आहे माझे मन तुझ्याविना, तूच बहरलेले अंगण

पावसाच्या जलधारांत तुझी चूनरी भिजली
माझ्या प्रेमात तू नखशिखांत नाहली 
तुला मी नेहमीच पाहत आलोय, स्वप्नात राणी,
आज प्रत्यक्षात गाऊ आपण दोघे पावसाची गाणी

बघ ती कोकीळI आंब्यावर बसून गाऊ लागलीय
नव ऋतूच्या स्वागतI तीही डहाळीवर झोके घेऊ लागलीय
झाड फुलांनी बहरुन आलेय, फांद्या फांद्या झुकू लागल्यात,
इशारा समजून घे प्रिये, प्रेमाच्या फुलवIती फुलू लागल्यात

वर आभाळी काळ्या बदरांनी गर्दी केलीय, थेट क्षितिजापर्यंत
काळी घटI उमडून आलीय, पूर्वेकडून ते पश्चिमेपर्यंत
आता काही क्षणांतच ढग बरसू लागतील, धरेस भिजवू लागतील,
तुझ्या माझ्या मनात हलकेच प्रेमाच्या ज्योती जागवतील 

पावसाच्या मनात आहे काय, तो घनघोर वर्षू लागलाय
त्याने योजिले आहे काय, मुसळधार असा तो पडू लागलाय
हा ऋतूच आहे प्रेमाचा, प्रेमी जीवांना तो एक करतोय,
भिजवता भिजवता मने जुळण्याचे काम नेक करतोय

पावसाच्या जलधारांत तुझी चूनरी भिजली
माझ्या प्रेमात तू नखशिखांत नाहली 
आता पावसाकडे माझे फक्त एकच मागणे, प्रिये,
तू असाच पडत रहा, तूच आमची प्रीत फुलवत रहा

पावसाच्या जलधारांत तुझी चूनरी भिजली
माझ्या प्रेमात तू नखशिखांत नाहली 
आठवली ती पावसातली तुझी माझी भेट पहिली,
तुझ्या डोळ्यांत माझ्यासाठी प्रीतीची गंगा होती वाहिली

-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-18.08.2023-शुक्रवार.
=========================================