पावसाची आगळी प्रेम कविता-गीत-साजणा, हा पाऊस काय सांगतोय, हा वारा आज का बहकतोय ?

Started by Atul Kaviraje, August 19, 2023, 10:54:45 AM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

मित्र/मैत्रिणींनो,

     आज मी तुम्हाला, पावसाची एक आगळी वेगळी प्रेम कविता-गीत ऐकवितो. "साजन रे  साजन कहता है सावन, बहकी हुई है हवाये"- या हिंदी गाण्यावर ते आधारित आहे. आशा आहे ते तुम्हाला आवडेल. भरभरून लाईक करा, व मला प्रोत्साहित करा. आपणा सर्वांस ऑगस्ट महिन्याची ही  मळभ असलेली, काळ्या ढगांनी व्याप्त परंतु पाऊस थांबलेली शनिवार-सकाळ आनंदाची जावो, ही सदिच्छा.

--मूळ हिंदी गाणे-( साजन रे साजन कहता है सावन, बहकी हुई है हवाये )           
----------------------------------------------------------------

            "साजणा, हा पाऊस काय सांगतोय, हा वारा आज का बहकतोय ?"
           ----------------------------------------------------------

साजणा, हा पाऊस काय सांगतोय ?
हा वारा आज का बहकतोय ?
पर्जन्य धारा आज मदहोश का करताहेत ?,
वाऱ्याचा तोल आज का ढळतोय ?

साजणा, हा पाऊस काय सांगतोय ?
हा वारा आज का बहकतोय ?
हा पाऊस आपणIस बेभान करतोय,
वर खेळकर वIरI जणू नशI देतोय

सरसरत्या वाऱ्याने आज मनी काय योजिलेय ?
भरभरत्या हवेने जणू आज लहरIयचे ठरवलेय
अंगी शहIरI, देई शीत वIरI, वर पावसाच्या या धारा,
दोघेही खेळवताहेत आपणास, चिंब गारांचा करून मारा

हा पाऊस जणू वेड्यागत कोसळत आहे
हा वIरI जणू वळूगत पळत आहे
दोघांमध्ये का शर्यत कुठली लागली आहे,
आपणI दोघांना भिजविण्याची स्पर्धाच जणू लागली आहे

आता यांची समजूत कशी काय काढणार ?
आता याना कस काय आपण समजावणार ?
आम्ही दोघे प्रेमी, आम्हाला हवाय प्रेम-निवारा,
नखशिखांत भिजवून आम्हा, पाऊस हसतोय, खिदळतोय वIरI

साजणा, हा पाऊस काय सांगतोय ?
हा वारा आज का बहकतोय ?
तुझ्या माझ्या प्रेमाचे गुज गुपित,
हा वाहतI वIरI त्या पावसाच्या कानी सांगतोय

साजणा, हा पाऊस काय सांगतोय ?
हा वारा आज का बहकतोय ?
तुमची प्रीत माझ्या प्रेम-धारांत अजून फुलेल,
सांगता सांगता पाऊस मुसळधार कोसळतोय

हा पाऊस जणू माझ्यावर फिदाच झालाय
हा वारा जणू माझा बंदIच झालाय
पाऊस मला सतत भिजवून माझी नजर चोरतोय,
मजभोवती पिंगा घालून वारा माझी चुनर उडवतोय

आज पावसाच्या अदा मोहक, मनस्वी भासताहेत
आज पावसाचे मादक पडणे, जणू मदहोश करतय
या वाऱ्यानेही आम्हा बेहोष करण्याचा विडाच उचललाय,
बेधुंद करीत, प्रीतीत बांधीत, आम्हा लगटून वाहीलाय

आमच्यावर एवढे मेहेरबान का दोघे समजत नाही
आमची एवढी खातरजमा का, अजुनी उमजत नाही
आमची जोडी बहुतेक दोघांनाही आवडलीय,
आमची जोडी या दोघांनीच जणू निवडलीय

साजणा, हा पाऊस काय सांगतोय ?
हा वारा आज का बहकतोय ?
तुला मला हा पाऊस एक करतोय, एकत्र आणतोय,
हा वIरI वाहून, प्रीतीचे गीत गाऊन, आपली प्रीत फुलवतोय

साजणा, हा पाऊस काय सांगतोय ?
हा वारा आज का बहकतोय ?
हा पाऊस जणू आपल्याच प्रतीक्षेत होता,
हा वIरI जणू आम्हालाच धुंडाळीत होता

हा ओला ऋतू आज शरारत करण्यावर उतरलाय
आपणI दोघांना चिंब भिजविण्यात तो धन्य झालाय
हा वाराही काही कमी नाही, तो पावसाची साथ करीत आहे,
छत्रीला बळेच उडवत लावून, जलधारांचा जोश वाढवीत आहे

आज माझी जणू बेभानावस्थाच झालीय, मी भानावर नाही
माझी मादक अंगडाई आज माझ्या कIबूतच नाही
धुंद झालेय मी, नशेत आहे मी, साजणा मला घट्ट धर,
प्रेम-रस पिऊन माझ्या अधरांचा, माझ्यावर प्रीत कर

या दोघांनीही मला बेबस केलंय , बेहोष केलंय , बेधुंद केलंय
या दोघांनीही जणू माझ्यावर जादू केलीय, मोहिनी टाकलीय
पावसाने प्रेमाचे जल-कुंभ रिते करून माझी उत्कट प्रीत जागवलीय,
या शरIरती वाऱ्याने बहकता बहकता नजरच धुंद केलीय

साजणा, हा पाऊस काय सांगतोय ?
हा वारा आज का बहकतोय ?
साजणा आज प्रेमाचा आगळाच अर्थ मला कळलाय,
प्रेमात बहकण्याचा, प्रीतीत वाहून जाण्याचा मार्ग उमजलाय

साजणा, हा पाऊस काय सांगतोय ?
हा वारा आज का बहकतोय ?
हा ऋतू सांगतोय मला प्रेम कर, प्रीतीत बुडून जा,
हा मोसम सांगतोय मला, भिजून जा, साजणाची होऊन जा

-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-19.08.2023-शनिवार.
=========================================