पावसाची प्रेम कविता-पावसानेही माझी बाजू घेतलीय, तुला माझी भेट घ्यावीच लागलीय

Started by Atul Kaviraje, August 20, 2023, 09:48:28 AM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

मित्र/मैत्रिणींनो,

     आज मी तुम्हाला, पावसाची एक सुंदर प्रेम कविता-गीत ऐकवितो. "बारिश हो रही है... आखिर तुम्हे आना है..."- या हिंदी गाण्यावर ते आधारित आहे. आशा आहे ते तुम्हाला आवडेल. भरभरून लाईक करा, व मला प्रोत्साहित करा. आपणा सर्वांस ऑगस्ट महिन्याची ही तुरळक पाऊस असलेली थंड हवेशीर, रविवार-सकाळ आनंदाची जावो, ही सदिच्छा.

--मूळ हिंदी गाणे-( बारिश हो रही है... आखिर तुम्हे आना है.. )           
--------------------------------------------------------

             "पावसानेही माझी बाजू घेतलीय, तुला माझी भेट घ्यावीच लागलीय"
            ---------------------------------------------------------

पावसानेही माझी बाजू घेतलीय
तुला माझी भेट घ्यावीच लागलीय
हा पाऊस कधीचI विचारतोय मला,
तुझी प्रिया अजून कशी नाही आलीय ?

पावसानेही माझी बाजू घेतलीय
तुला माझी भेट घ्यावीच लागलीय
त्याला माहितीय माझं खूप प्रेम आहे तुझ्यावर,
माझी नजर तुझ्या वाटेकडे लागलीय

तसI बराच उशीर झालाय आपल्या भेटीला
तरसत होतो मी बराचकाळ आपल्या मिलनाला
प्रेमात विचका येण्यापेक्षा देर केव्हाही भली,
माझ्या मिठीत येऊन ती तू दुरुस्तही केली

ये प्रिये, तूच आहेस माझ्या प्रेमाची हमराज़
ये सखये, तूच आहेस माझ्या प्रीतीची सरताज
बघ, तो पाऊसही आपल्याला बोलावतोय,
जलधारांचे तुषार उडवून तो आपल्याला गोंजारतोय

त्या जीवनापासून फार दूर आलोय ग मी
कंटाळलोय करून त्याच त्या आयुष्याची गुलामी
आता बस तू आणि मी, आणि हा पाऊस,
भिजत राहू आपण असेच, युक्ती आहे ना नामी

पावसानेही माझी बाजू घेतलीय
तुला माझी भेट घ्यावीच लागलीय
तुझ्या मार्गावर मी केव्हाच प्रेमाची फुले वाहिलीय,
प्रेमात आता अजून कोणती कसर बाकी राहिलीय ?

पावसानेही माझी बाजू घेतलीय
तुला माझी भेट घ्यावीच लागलीय
पावसालाही आहे तुझी प्रतीक्षा माझ्यासारखीच,
तू दिसतI उत्कंठा त्याचीही पूर्ण  झालीय

तुला यावंच लागेल प्रिये, माझ्या प्रेमासाठी
केलेले वादI निभावावा लागेल, माझ्या प्रीतीसाठी
माहीतIहे, पावसाचे निमित्त आहे, तुझ्या उशिरा येण्यापाठी,
लाडके, नयन तरसताहेत तुला एकवार पाहण्यासाठी

ये सखये, ये धावत ये, तूच आहेस माझी जानेमन
कधीचI आवाज देतोय, आता तरी ओळख माझे मन
केव्हाचा उभा आहे मी या पावसात तुझी वाट पहIत,
तुझा मी मित्र, तुझा मी प्रियकर, तुझीच आहे मी जान 

माहीतIहे, तुला मनवावं लागत, तुला मी ओळखतो
जशी माझ्या मनात तू , तसI मीही तुझ्या मनात राहतो
आता आणिक नकोय बहाणा, प्रेमाची परीक्षा घेऊ नकोस,
सोड तुझा रुसवा, अशी फुरंगटून, रुसून बसू नकोस

पावसानेही माझी बाजू घेतलीय
तुला माझी भेट घ्यावीच लागलीय
कशीही असलीस तरी तू मला आवडतेस,
कशीही वागलीस तरी तू मला भावतेस

पावसानेही माझी बाजू घेतलीय
तुला माझी भेट घ्यावीच लागलीय
बघ, पावसानेही आता जोर धरलाय,
चिंब भिजवीत मला त्याने आनंद व्यक्त केलाय

माझी जिवलग आहेस तू, माझी दिलरुबा आहेस तू
मोहब्बतमध्ये दर्द काय असतो ते ओळखतेस तू
प्रेमात सर्व क्षम्य असतं हेही आहेस जाणून तू,
मग अजुनी का आहे मनी तुझ्या हा किंतु ?

सारं सारं विसरून माझ्या हाकेला ओ दे
या पावसात तुला हसताना, नाचताना मला पाहू दे
या पावसाचा गंभीर नाद असाच सर्वदूर घुमू दे,
माझ्यावरल्या, गाढ प्रगाढ प्रीतीचे प्रमाण तू दे

हा प्रेम-रोग दोन्हीकडे कसा लागून राहिलाय
आपल्या दोघांच्याही मनIस उदास करून गेलाय
आता विलंब नको, उशीर नको, या पावसाचे गाणे ऐक,
माझ्या प्रीतीला स्मरून ये, माझी प्रीत आहे नेक

पावसानेही माझी बाजू घेतलीय
तुला माझी भेट घ्यावीच लागलीय
जीवापाड प्रेम केलय मी तुझ्यावर, प्रियतमI,
माझ्या या आतुर मनाला तुझ्या भेटीची ओढ लागलीय

पावसानेही माझी बाजू घेतलीय
तुला माझी भेट घ्यावीच लागलीय
तुझी माझी भेट या पावसातच झाली होती,
पावसाने पडतI पडतI याची ग्वाहीच दिलीय

पहा तुला कवेत घेण्यास मन आतुर आहे
तुझे केवळ दर्शन होण्यास नयन उत्सुक आहेत
तू माझी होतीस, तू माझी आहेस, तू माझीच असशील,
हृदयात डोकावून पहा, फक्त तुझीच प्रतिमा पाहशील

उशिरा का होईनI, शेवटी तू आलीस, या भर पावसात
माझी प्रीत ओळखून, माझे प्रेम पारखून, निरखून पाहत
बघ तो पाऊसही खुश होतोय, आनंदाने खूप बरसतोय,
चल चिंब भिजूया आपण दोघे, तो मनमुराद भिजवतोय 

आज सारं सारं माझ्या मनासारखं घडून येतंय
पावसाचे हे शीत जल मला मनापासून साथ देतंय
तुझे आणि माझे प्रेम असंच पावसात फुलू दे,
पावसाच्या प्रत्येक थेंबागणिक ते असेच झुलू दे, उमलू दे

पावसानेही माझी बाजू घेतलीय
तुला माझी भेट घ्यावीच लागलीय
आता नाही ना सोडून जाणार मला कधी,
तुझ्या डोळ्यांत मी माझी प्रीत पाहिलीय

पावसानेही माझी बाजू घेतलीय
तुला माझी भेट घ्यावीच लागलीय
या पावसाचे थोर उपकार, तोच आपल्या प्रेमास कारण,
आणि आताही त्यानेच आपली दृष्ट काढलीय

-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-20.08.2023-रविवार.
=========================================