दिन-विशेष-लेख-जागतिक डास दिन

Started by Atul Kaviraje, August 20, 2023, 04:34:41 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

                                     "दिन-विशेष-लेख"
                                    "जागतिक डास दिन"
                                   -------------------

मित्र/मैत्रिणींनो,

     आज दिनांक-20.08.2023-रविवार आहे.  २० ऑगस्ट-हा दिवस "जागतिक डास दिन" म्हणूनही ओळखला जातो. वाचूया, तर या दिवसाचे महत्त्व, आजच्या या "दिन-विशेष-लेख" या शीर्षकI-अंतर्गत.

     डॉ. रोनल्ड रॉस यांनी संक्रमित झालेली मादा डास चावल्यामुळे हिवताप होतो, याचा शोध लावला. हे निमित्त साधून त्यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ २० ऑगस्टला जागतिक डास दिवस साजरा करण्यात येतो. डासांपासून मलेरिया होतो, ही माहिती पुढे आल्यानंतर डासांपासून बचावाचे घरघुती उपाय सुरू झाले.

            जागतिक डास दिन का साजरा केला जातो?  वाचा कारण--

     एक मच्छर आदमी को .... बना देता है...हा क्रांतिवीर सिनेमातील नाना पाटेकर यांचा संवाद अतिशय प्रसिद्ध आहे. हाच डास अथवा मच्छर अनेक रोगांचा वाहक ठरलेला आहे. आजच्या घटकेला, माणसाच्या आरोग्याचा खरा शत्रू 'डास'च (mosquito day) आहे. झिका, मलेरिया, डेंगी, हत्तीपायासारख्या आजारांचा वाहक असलेल्या डासांचे समूळ उच्चाटन शक्य नाही. मात्र, डासांपासून निर्माण होणाऱ्या रोगांचा सामना करण्यासाठी कोट्यवधी रुपयांची औषधे आणि आरोग्यविषयक उपकरणांची बाजारपेठ निर्माण झाली आहे.

     डॉ. रोनल्ड रॉस यांनी संक्रमित झालेली मादा डास चावल्यामुळे हिवताप होतो, याचा शोध लावला. हे निमित्त साधून त्यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ २० ऑगस्टला जागतिक डास दिवस साजरा करण्यात येतो. डासांपासून मलेरिया होतो, ही माहिती पुढे आल्यानंतर डासांपासून बचावाचे घरघुती उपाय सुरू झाले. शास्त्रीय संशोधनातून डास पळविण्यासाठी अगरबत्ती, मच्छरदाणी, डास प्रतिबंधक औषधांमध्ये कॉइल, लिक्विड, मलम यांचा मोठ्या प्रमाणात वापर सुरू झाला. कोट्यावधीची बाजारपेठ निर्माण होण्यास डास निमित्त ठरले. डासांमुळे डेंगी, हिवताप, चिकनगुन्या, झिका, हत्तीपाय यासारख्या आजाराला सामोरे जावे लागते. डासांच्या हजारो प्रजाती असल्या तरी अ‍ॅनॉफेलीस, क्युलेक्स आणि ईडिस या प्रजाती रोगांचा प्रसार करतात. दरवर्षी एकूण लोकसंख्येच्या २० टक्के लोकांना हिवताप, डेंगीसह इतर किटकजन्य आजाराचा धोका आहे. पूर्वी केवळ नागपूर विभागात दरवर्षी २५ लाख व्यक्तींच्या रक्ताची तपासणी होत असे. कुंडी, फ्रिज, एसीमागील ट्रे, पिंप व छतावरील पाणी, नारळ कवट्या आणि भंगार साहित्यात डासांची उत्पत्ती होते.

            डासांच्या जाती आणि होणारे रोग--

एडिस इजिप्ती - झिका, येलो फिवर, डेंगी. दिवसा चावतात.

अ‍ॅनॉफेलिस - हिवताप होतो. रात्री चावतात

क्युलेक्स-हत्तीपाय, अंडाशय वाढणे. चिखलात चावतात.

            डासांपासून बचाव--

खिडक्यांना जाळ्या बसवा

डास प्रतिरोधक मलम लावा

डासांना पळविणारे धूप इत्यादींचा वापर करा.

फिकट रंगाचे, लांब बाह्यांचे कपडे घाला.

झोपताना मच्छरदाणीचा वापर करावा

--By-केवल जीवनतारे
--------------------

                      (साभार आणि सौजन्य-संदर्भ-इ सकाळ.कॉम)
                     ----------------------------------------

-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-20.08.2023-रविवार.
=========================================