वयात आलेल्या तरुणीची कविता-सोळावे सरून सतरावे लागले, हृदयाचे धडकणे वाढत चालले

Started by Atul Kaviraje, August 21, 2023, 09:24:52 AM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

मित्र/मैत्रिणींनो,

     आज मी तुम्हाला, वयात आलेल्या तरुणीची एक कविता-गीत ऐकवितो. "I Am Sixteen Going On Seventeen, दिल क्यू ना धक धक करे ?"- या हिंदी गाण्यावर ते आधारित आहे. आशा आहे ते तुम्हाला आवडेल. भरभरून लाईक करा, व मला प्रोत्साहित करा. आपणा सर्वांस ऑगस्ट महिन्याची ही क्षितिजावर कृष्ण ढगांची झाकोळ दाटलेली आणि चक्क ऊन पडलेली, सोमवार-सकाळ आनंदाची जावो, ही सदिच्छा.

--मूळ हिंदी गाणे-( I Am Sixteen Going On Seventeen, दिल क्यू ना धक धक करे ? )           
-----------------------------------------------------------------------

              "सोळावे सरून सतरावे लागले, हृदयाचे धडकणे वाढत चालले"
             ------------------------------------------------------

सोळावे सरून सतरावे लागले
हृदयाचे धडकणे वाढत चालले
हे जग सारे सुंदर भासू लागले,
नजरेला सारे आकर्षक दिसू लागले

सोळावे सरून सतरावे लागले
हृदयाचे धडकणे वाढत चालले
हा दोष होता का वाढत्या वयाचा ?,
या वयाने सारेच बंधन तोडले

प्रत्येकालाच ही जाणीव होते का ?
जीवनात काही उणीव जाणवू लागते का ?
हे वयच असं असतं का ?,
चुकीच सारं बरोबर दिसतं का ?

नकळत, या दिलाची मी गुलाम होत गेले
काटे बोचले, तरी प्रत्येक फुल गुलाब होत गेले
हृदयाची प्रत्येक धडकन मला काही नवीन सांगत होती,
ती आता कोणाचेच ऐकण्याच्या तयारीत नव्हती

माझी धडकन मला काही सांगते आहे
तू आता वयाची विशिष्ट सीमा पार करते आहे
तुझ्या काबूत नाही राहिलं हे तुझं मन,
या वयातच तर हे सारं घडून येत आहे

सोळावे सरून सतरावे लागले
हृदयाचे धडकणे वाढत चालले
मनातल्या गोड उर्मी विचारु लागल्या,
कोणाला ग तुझे मन भुलले ?

सोळावे सरून सतरावे लागले
हृदयाचे धडकणे वाढत चालले
आज कुणीतरी हवय एक साथीला,
एकलेपणाचे दुःख कसे जाचत राहिले

आज मी तरुण आहे, युवती आहे
तारुण्याच्या उंबरठ्यावर उभी आहे
पण कुठेतरी काही कमी जाणवत आहे,
कुणाविना तरी ही जवानी अधुरी आहे

आज कुणासाठी तरी हे दिल धडकत आहे
फडफडणारा डोळा काही सूचित करीत आहे
तू नाहीस एकटी, कुणीतरी येणार आहे,
तुझ्या मनाचा तो राजा होणार आहे

त्या राजकुमाराची स्वप्नं डोळ्यांत तरळताहेत
डोळ्यांच्या ज्योती त्याच्या वाटेकडे उजळताहेत
धडकन म्हणतेय, आयुष्याचा जोडीदार लवकरच भेटेल तुला,
मन म्हणतय, जीवनाचा साथीदार कायम साथ देईल तुला

सोळावे सरून सतरावे लागले
हृदयाचे धडकणे वाढत चालले
मिटल्या डोळ्यांसमोर प्रियकराची प्रतिमा,
अन अस्पष्ट चित्र साकारू लागले

सोळावे सरून सतरावे लागले
हृदयाचे धडकणे वाढत चालले
माझे बहकणे, मध्येच हसणे, मध्येच रुसणे,
माझे वागणेच निरर्थक वाटू लागले

असं वाटतंय माझं तन बदन जळतंय
या पावसाच्या शीत जलधारातही ते तप्त होतंय
हा समI जणू बहकतोय, धुंद प्रतीत होतोय,
या वयात मला हा कसला अनुभव येतोय ?

कुणी आग लावलीय माझ्या पूर्ण देहास ?
जणू सारा देह पिघळून, वितळूनच जातोय
माझं मन आज का बार एवढं मचलतंय ?,
छातीतील धडधड का बर एवढी वाढलीय ?

ही कोठली आगामी चाहूल देतेय मन
ही कुठून येतेय उदासी मनIस, मन होतंय बेभान
या मनाची समजूत कोण बर काढेल ?,
माझा मनमीत कधी बर मला भेटेल ?

सोळावे सरून सतरावे लागले
हृदयाचे धडकणे वाढत चालले
आता प्रतीक्षा आहे मला एका जिवलगाची,
ज्याला मी नकळत माझे मन वाहिले

सोळावे सरून सतरावे लागले
हृदयाचे धडकणे वाढत चालले
माझ्या मनाची मी आता समजूत काढतेय,
जिवलगाचे घर थोडे दूर राहिले

कुणीतरी येईल, ही दूरी कायमची दूर करील
कुणीतरी येईल, मला घट्ट जवळ धरील
कुणीतरी येईल, या मनाला तृप्त करील,
कुणीतरी येईल, माझ्या मनाची समजूत काढील

माझ्या एकाकी जीवनी तू ढग होऊन ये
माझ्या विराण जीवनी तू पाऊस होऊन ये
आपल्या शीत जलधारांनी माझे मन शांत कर,
आपल्या अमृत जलाने माझी तृष्णा तृप्त कर

हा ऋतू आता मला नाही सोसवत
मनाचे तळमळणे मलाच नाही पाहवत
मी या किनारी तुझी वाट पाहत आहे,
तुला भेटल्याशिवाय आता मला नाही राहवत

सोळावे सरून सतरावे लागले
हृदयाचे धडकणे वाढत चालले
कुणाचेतरी प्रेम हवय मला, प्रेमात भागीदार हवा,
या माझ्या एकलेपणात मला आता आधार हवा

सोळावे सरून सतरावे लागले
हृदयाचे धडकणे वाढत चालले
तो दिवस दूर नाही, तू माझं मन ओळखशील,
माझा होऊन, तू मला आपलंस करशील

-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-21.08.2023-सोमवार.
=========================================