२१-ऑगस्ट-दिनविशेष-A

Started by Atul Kaviraje, August 21, 2023, 04:16:44 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

मित्र/मैत्रिणींनो,

     आज दिनांक-२१.०८.२०२३-सोमवार.जाणून घेऊया,आजच्या दिवसाचे "दिन-विशेष"

                                "२१-ऑगस्ट-दिनविशेष"
                               ----------------------

-: दिनविशेष :-
२१ ऑगस्ट
=========================================
अ) महत्त्वाच्या घटना:
   ----------------
१९९३
मंगळाच्या शोधमोहिमेसाठी पाठवण्यात आलेल्या 'मार्स ऑब्झर्व्हर' या यानाचा पृथ्वीशी (NASA) संपर्क तुटला.
१९९१
लाटव्हियाने स्वत:ला (सोविएत युनियनपासुन) स्वतंत्र घोषित केले.
१९११
पॅरिसच्या लुव्र या संग्रहालयातुन लिओनार्डो-द-व्हिन्सी याचे 'मोनालिसा' हे जगप्रसिद्ध चित्र चोरीला गेले.
१८८८
विल्यम बरोज याने बेरजा मारणार्‍या यंत्राचे पेटंट घेतले.
=========================================
ब) जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:
  -----------------------------
१९८६
उसेन बोल्ट – जमैकाचा धावपटू
१९६१
व्ही. बी. चन्द्रशेखर – भारताचा फिरकी गोलंदाज
१९२४
श्रीपाद अच्युत दाभोळकर – 'प्रयोग परिवार' या संकल्पनेचे प्रवर्तक, गणितज्ञ आणि जमनालाल बजाज पुरस्काराने गौरवण्यात आलेले कृषीशास्त्रज्ञ
(मृत्यू: ३०एप्रिल २००१)
१९३४
सुधाकरराव नाईक – महाराष्ट्राचे १३ वे मुख्यमंत्री (कार्यकाल: २५ जून १९९१ ते २२ फेब्रुवारी १९९३), हिमाचल प्रदेशचे राज्यपाल
(मृत्यू: १० मे २००१)
१९१०
नारायण श्रीधर बेन्द्रे – आदिम कलेपासून चिनी चित्रकलेपर्यंत अनेक शैलीविशेष आत्मसात केलेले चित्रकार
(मृत्यू: १८ फेब्रुवारी १९९२)
१९०९
नागोराव घन:श्याम तथा 'ना. घ.' देशपांडे – कवी
(मृत्यू: १० मे २०००)
१८७१
गोपाळ कृष्ण देवधर – भारत सेवक समाजाचे (Servants of India Society) एक संस्थापक सदस्य, 'सेवासदन' या संस्थेचे शिल्पकार, सहकारी चळवळीचे आद्य समर्थक
(मृत्यू: १७ नोव्हेंबर १९३५)
१७८९
ऑगस्टिन कॉशी – फ्रेन्च गणितज्ञ
(मृत्यू: २३ मे १८५७)
१७६५
>विल्यम (चौथा) – इंग्लंडचा राजा
(मृत्यू: २० जून १८३७)
=========================================

-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-21.08.2023-सोमवार.
=========================================