नागपंचमी-लेख-2

Started by Atul Kaviraje, August 21, 2023, 04:22:46 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje


                                     "नागपंचमी"
                                    ------------

मित्र/मैत्रिणींनो,

     आज दिनांक-२१.०८.२०२३-सोमवार आहे. आज "नागपंचमी" आहे. श्रावण महिन्यात नागपंचमीला विशेष महत्त्व आहे. नागपंचमीच्या दिवशी नागदेवतेची पूजा केली जाते. यासोबतच काल सर्प दोषाने पीडित लोकही पूजा करून दोष दूर करतात. महादेवांच्या प्रतीकांपैकी एक महत्त्वाचे प्रतीक नाग आहे. तसेच श्रीविष्णूचे प्रतीक म्हणूनही नागाकडे पाहिले जाते. श्रावण महिना शिवाची उपासना करण्यासाठी सर्वोत्तम मानला गेल्यामुळे नागपंचमी आणि नागपूजेला विशेष महत्त्व प्राप्त होते. मराठी कवितेच्या माझ्या सर्व बंधू-भगिनी, कवी-कवियित्रीना नागपंचमी सणाच्या अनेक हार्दिक शुभेच्छा. वाचूया नागपंचंमीवर महत्त्वाचा लेख. 

             नागपंचमी 2023--

     Naag Panchami 2023 festival information - मित्रांनो हिंदू धर्मातील प्रत्येक परंपरा, प्रत्येक सण व उत्सव हा मानवाला काही ना काही शिकवण  देत असतो. मानव आणि समाज हा संस्कारित व्हावा व त्यांचे अनुकरण व्हावे मूल्यांची रुजवण व्हावी यासाठी हिंदू धर्मामध्ये हे सण आपले आगळे वेगळे महत्त्व राखून असतात .

     श्रावण महिन्यातील शुक्ल पक्षातील पाचवा दिवस म्हणजेच पंचमीचा दिवस,याच दिवसाला नागपंचमी असे म्हणतात.

     नागपंचमीचा दिवस दर वर्षी अगदी भक्तिभावाने साजरा करतो. या दिवशी नागांची विशेष रूपाने पूजा केली जाते व त्यांचा आशीर्वाद घेतला जातो . आणि असे केल्याने नागदेवतेचा आशीर्वाद आपणास मिळतो. व सर्पदंशाचा भय  मनात राहात नाही.

             नागपंचमीची पूजा कशी करावी ?--

     सगळ्यात आधी पूजेचे ताट तयार करावे. त्यामध्ये हळद, कुंकू, अक्षदा, गंध, फुले  घ्यावीत. आणि नागदेवतेला लाह्या व दुधाचा नैवेद्य द्यायचा असतो.

     घराजवळ वारूळ असेल तर तिथे जाऊन वारुळाची पूजा करावी. किंवा घरीच कागदावर नागदेवता, नागिन आणि त्यांची पिल्ले यांचे चित्र काढून त्यांची पूजा करावी. खरंतर ही पुजा पूर्वीच्या काळी   निसर्गासाठी  व निसर्गाला कोणतीही हानी न पोहोचवता केली जात असे.

     सर्वप्रथम वारुळाला हळद-कुंकू, फुले वाहून नमस्कार करावा.  त्यानंतर थोडेसे दूध आणि लाह्यांचा नैवेद्य वारुळा जवळ ठेवून त्याला तीन वेळा पाणी फिरवावे, व नैवेद्यम् समर्पयामि असे म्हणावे. अशा प्रकारे साधी सरळ आणि सोपी पूजा  नागपंचमीची  केली जाते.

               नागपंचमी कथा--

     या सणाची सुरुवात खूप प्राचीन काळापासून  झाली आहे .असे सांगतात की राजा परीक्षित नावाचा एक राजा होता. एकदा हा राजा  परीक्षित जंगलामध्ये शिकार करण्यास गेला होता .आणि त्या ठिकाणी त्याला खूप तहान लागली.

     तो पाण्याच्या शोधात असताना त्याला एका ठिकाणी एक झोपडी म्हणजे आश्रम त्याला दिसले.त्या ठिकाणी तो गेला व तो आश्रम एका ऋषीमुनींचा होता. ते ऋषी तपश्चर्या करण्यास बसलेले होते. त्या ऋषी जवळ गेल्यावर राजा परीक्षितने ऋषीला पिण्यास पाणी मागितले.

     परंतु तपश्चर्या करण्यास बसलेल्या ऋषींनी राजाकडे अजिबात लक्ष दिले नाही हे बघून राजाला खूप राग आला व रागाच्या भरात. परीक्षित  राजाने त्यांच्या गळ्यात मेलेला साप टाकला. तिथे जवळच ऋषींचा मुलगा होता त्यांनी हे सगळे दृश्य बघितले व त्याला राजा परीक्षित चा खूप राग आला.

     तो क्रोधित झाला आणि या क्रोधात त्यांनी राजा परीक्षित याला शाप दिला की हे राजन तुला सातव्या दिवशी तक्षक नावाच्या नागा कडून सर्पदंश होईल आणि त्यातच तुझा मृत्यू  देखील होईल.

     हे सगळे ऐकल्यानंतर राजा खूप व्याकुळ झाला.  व तो घरी आला व त्याने घरी आल्यावर आपल्या  कुटुंबीयांना घडलेला सगळा प्रसंग सांगितला.

     त्या राजा परिक्षित चा एक मुलगा होता जन्मेजय नावाचा. ह्या जन्मेजय नावाच्या मुलाने आपल्या वडिलांना वाचवण्यासाठी नागदाह नावाचा यज्ञ सुरू केला . हा नागदाह नावाचा यज्ञ खूप परिणामकारक होता.

     या यज्ञाची सुरुवात झाल्यानंतर आजूबाजूची सर्व साप येऊ लागले व स्वतःला त्या यज्ञात झोकून देऊ लागले. व  त्या सर्व सापांची राख होऊ लागली. त्यामुळे संपूर्ण नाग समाज खूप घाबरली आणि सगळे घाबरलेले नाग अस्तिक ऋषींना शरण गेले.

     त्यानंतर अस्तिक  ऋषी जन्मीजयाकडे आले आणि त्याला सर्व परिस्थिती समजावून सांगितली .त्यांनी समजावले की राजा परीक्षिताने कशी मोठी चूक केली .आणि त्या चुकीची शिक्षा म्हणूनच त्यांना हा शाप  देण्यात आला आहे. आणि तुझ्या वडिलांच्या चुकीसाठी तू संपूर्ण नागांचा, सापांचा नाश करणे खूप चुकीचे आहे.त्यांचे वंश नष्ट करणे हे अत्यंत चुकीचे आहे .

     अस्तिक ऋषी यांचे म्हणणे जन्मेजयाला पटले. आणि त्याने क्षमा मागितली. व उलट नागांची पूजा करणे सुरू केले. त्याने सर्व सापांची , नागांची पूजा करण्यास सुरुवात केल्याने त्या दिवसापासून नागपंचमी हा सण साजरा केला जातो.

     व तो दिवस होता श्रावण महिन्यातील शुक्ल पक्षातील पाचवा दिवस म्हणजे पंचमीचा दिवस म्हणून या दिवसाला नागपंचमी असे म्हणतात.

     या कथेतून आपल्याला बोध मिळतो की आपल्याकडून झालेली चूक मान्य करावी व आपल्या चुकीची शिक्षा इतरांना देऊ नये आणि ती शिक्षा इतरांना देणे अत्यंत चुकीचे असते.

--पूनम एम.
-----------

                    (साभार आणि सौजन्य-संदर्भ-मराठी फेस्टिवल.कॉम)
                   ----------------------------------------------

-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-21.08.2023-सोमवार.
=========================================