नागपंचमी-लेख-4

Started by Atul Kaviraje, August 21, 2023, 04:25:23 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

                                       "नागपंचमी"
                                      ------------

मित्र/मैत्रिणींनो,

     आज दिनांक-२१.०८.२०२३-सोमवार आहे. आज "नागपंचमी" आहे. श्रावण महिन्यात नागपंचमीला विशेष महत्त्व आहे. नागपंचमीच्या दिवशी नागदेवतेची पूजा केली जाते. यासोबतच काल सर्प दोषाने पीडित लोकही पूजा करून दोष दूर करतात. महादेवांच्या प्रतीकांपैकी एक महत्त्वाचे प्रतीक नाग आहे. तसेच श्रीविष्णूचे प्रतीक म्हणूनही नागाकडे पाहिले जाते. श्रावण महिना शिवाची उपासना करण्यासाठी सर्वोत्तम मानला गेल्यामुळे नागपंचमी आणि नागपूजेला विशेष महत्त्व प्राप्त होते. मराठी कवितेच्या माझ्या सर्व बंधू-भगिनी, कवी-कवियित्रीना नागपंचमी सणाच्या अनेक हार्दिक शुभेच्छा. वाचूया नागपंचंमीवर महत्त्वाचा लेख. 

        यावर्षी नागपंचमीला 'खास' मोठा योग; जाणून घ्या, 'तारीख आणि पूजा शुभ मुहूर्त आणि उपाय'--

     Nag Panchami 2023 : ज्योतिषशास्त्रात नागपंचमी महत्व आहे. नागपंचमी निमित्ताने नागदेवतेच्या पूजेचा महान सणात यावर्षी एक अतिशय शुभ योग घडत आहे. या योगामुळे नाग देवता आणि भगवान शिव यांची पूजा केल्याने कुंडलीतील दोष दूर होतात आणि सुख-समृद्धी प्राप्त होते.

     जून महिना संपत आला आहे. पावसाचा पत्ता नाही. मात्र, आता श्रावण महिना येत आहे. शिवभक्त श्रावण  महिन्याची आतुरतेने वाट पाहतात. नागपंचमी हा सण श्रावण महिन्यात साजरा केला जातो, या दिवशी नाग देवतेची पूजा केली जाते. श्रावण महिन्यातील शुक्ल पक्षाच्या पाचव्या तिथीला नागपंचमी साजरी केली जाते. भगवान शिव आपल्या गळ्यात नाग देवता धारण करतात. यावर्षी नागपंचमीला एक अतिशय शुभ योग घडत आहे, त्यामुळे नागदेवता आणि भगवान शिव यांची पूजा केल्यास विशेष लाभ होईल. यासोबतच जर कुंडलीत काल सर्प दोष असेल तर त्यापासून मुक्ती मिळण्याची चांगली संधी आहे.

             नागपंचमीची तारीख जाणून घ्या--

     हिंदू कॅलेंडरनुसार, श्रावण महिन्याच्या शुक्ल पक्षातील पंचमी तिथी 21 ऑगस्टच्या मध्यरात्री 12:21 पासून सुरु होईल आणि 22 ऑगस्टच्या मध्यरात्री 2:00 वाजता संपेल. उदयतिथीनुसार नागपंचमी 21 ऑगस्ट, सोमवारी साजरी केली जाईल. सोमवार हा भगवान शंकराला समर्पित असल्याने आणि नाग हे शंकराचा भक्त असल्याने सोमवारी येणारी नागपंचमी अत्यंत शुभ मानली जात आहे.

                     (साभार आणि सौजन्य-संदर्भ-झी न्युज.इंडिया.कॉम)
                    ---------------------------------------------

-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-21.08.2023-सोमवार.
=========================================