नागपंचमी-लेख-7

Started by Atul Kaviraje, August 21, 2023, 04:29:27 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje


                                        "नागपंचमी"
                                       ------------

मित्र/मैत्रिणींनो,

     आज दिनांक-२१.०८.२०२३-सोमवार आहे. आज "नागपंचमी" आहे. श्रावण महिन्यात नागपंचमीला विशेष महत्त्व आहे. नागपंचमीच्या दिवशी नागदेवतेची पूजा केली जाते. यासोबतच काल सर्प दोषाने पीडित लोकही पूजा करून दोष दूर करतात. महादेवांच्या प्रतीकांपैकी एक महत्त्वाचे प्रतीक नाग आहे. तसेच श्रीविष्णूचे प्रतीक म्हणूनही नागाकडे पाहिले जाते. श्रावण महिना शिवाची उपासना करण्यासाठी सर्वोत्तम मानला गेल्यामुळे नागपंचमी आणि नागपूजेला विशेष महत्त्व प्राप्त होते. मराठी कवितेच्या माझ्या सर्व बंधू-भगिनी, कवी-कवियित्रीना नागपंचमी सणाच्या अनेक हार्दिक शुभेच्छा. वाचूया नागपंचंमीवर महत्त्वाचा लेख. 

             प्रसिद्ध आठ नागांची नावे –

अनंत
वासुकी
पद्म
महापद्म
तक्षक
कारकोटक
शंख
कालिया

            श्रावण महिन्यात साजरी केली जाणारी नागपंचमी -(NAGPANCHAMI 2023):-

     श्रावण महिन्यामध्ये पावसाळ्याचे पाणी बऱ्यापैकी कमी होऊन ते जमिनीत जिरते. तसेच ते सापांच्या बिळातही जाते. त्यामुळे श्रावण महिन्यामध्ये साप बऱ्याच अंशी स्वतःच्या सुरक्षित निवाऱ्यासाठी बाहेर पडत असतात. त्यांच्याविषयीच्या प्रेमासाठी तसेच त्यांचे रक्षण करण्यासाठी, आपल्या मनातील भीतीची भावना कमी होण्यासाठी या दिवशी नागपूजा तसेच उपवास वगैरेची परंपरा श्रावण महिन्यामध्ये सुरू झालेली आहे.

           नागपंचमीचे महत्व – (IMPORTANCE OF NAGPANCHAMI):-

     संपूर्ण भारत देशात हा सण मोठ्या उत्साहात भक्तीभावाने साजरा केला जातो. या दिवशी नागाची पूजा केली जाते. आणि त्याचा आशीर्वाद घेतला जातो. असे म्हटले जाते की, या दिवशी नागाची पूजा रुद्र, अभिषेक केल्यामुळे जीवनातील संकटे संपून जातात. त्याचप्रमाणे आपल्या कुंडलीमध्ये राहू, केतू यांच्या बाबतीत काही दोष असतील तर ते सुद्धा निघून जातात. आपल्या या भारतीय संस्कृतीमध्ये नागाला फार महत्त्वाचे स्थान आहे. कारण भगवान शंकराच्या गळ्यात नाग आहे. त्याचबरोबर भगवान विष्णू हे देखील नागासोबत बसलेले, त्याचप्रमाणे झोपलेले दिसून येतात.

     या दिवशी सापासाठी केलेले कोणतेही पूजाही साप किंवा नाग देवतेपर्यंत पोहोचतील असे म्हटले जाते म्हणूनच काही जण या दिवशी जिवंत सापाची पूजा करतात काहीजण सापाच्या मुर्त्यांची पूजा करतात या दिवशी नागाची पूजा केल्यामुळे आणि उपवास केल्यामुळे सर्पद औषध धोका कमी होऊन नागाला दुधाने स्नान घातल्यामुळे पुण्य प्राप्त होते असे देखील म्हटले जाते.

            नागपंचमी आणि जत्रा -(NAGPANCHAMI YATRA 2023)--

     नागपंचमी सण :- या सणाच्या दिवशी दरवर्षी विविध ठिकाणी मोठ्या जत्रा देखील भरवल्या जातात. या दिवशी अनेक गावांमध्ये विविध खेळांचे तसेच कुस्त्यांचे देखील आयोजन केले जाते. काही ठिकाणी या दिवशी गाय, बैल यासारख्या प्राण्यांना नदी तलावावर नेऊन त्यांना स्नान घातले जाते. कारण असे करणे अत्यंत शुभ आहे असे मानले जाते. काशी, वाराणसी सारख्या ठिकाणी मोठ्या जत्रा भरवल्या जातात.

     संपूर्ण भारतातील असे एकमेव मंदिर आहे, जे वर्षातून एकदा नागपंचमीच्या दिवशी उघडले जाते. ते म्हणजे उज्जैन शहरातील महाकालेश्वर मधील नागचंद्रेश्वराचे मंदिर. या दिवशी रात्री बारा वाजता हे मंदिर उघडले जाते आणि दुसऱ्या दिवशी रात्री बारा वाजता वर्षभरासाठी पुन्हा बंद केले जाते. त्यामुळे या मंदिरातील देवतेचे दर्शन घेण्यासाठी संपूर्ण भारतभरातून अनेक भाविक या ठिकाणी दर्शनासाठी येत असतात. या ठिकाणी मोठ्या जत्रेचे आयोजन केले जाते.

       वारूळ पूजन – (NAGPANCHAMI FESTIVAL INFORMATION IN MARATHI)--

     सामान्यतः वारूळामध्ये साप असतात. त्यामुळे या सणाला वारुळाचे पूजन ही प्रथा अस्तित्वात आल्याचे सांगितले जाते. काही लोक याला अंधश्रद्धा आहे असे देखील म्हणतात. या दिवशी रानातल्या वारुळांपुढे दुधाची वाटी ठेवून दुपारपर्यंत त्याच्यावरील गाण्यांचा कार्यक्रम चालतो.

               उपवासाचे महत्त्व –

     एका पौराणिक आख्यायिकेनुसार, सत्येश्वरी नावाच्या देवतेच्या भावाचा सत्येश्वराचा नागपंचमीच्या आदल्या दिवशी मृत्यू झाला होता. त्यामुळे आपल्या भावाच्या मृत्यूच्या दुःखामध्ये तिने संपूर्ण दिवस अन्नग्रहण केले नव्हते. म्हणून या दिवशी उपास करण्याला महत्त्व प्राप्त झाले आहे.

--by Team Marathi Zatka
----------------------------

                      (साभार आणि सौजन्य-संदर्भ-मराठी झटका.कॉम)
                     --------------------------------------------

-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-21.08.2023-सोमवार.
=========================================