नागपंचमी-लेख-9-A

Started by Atul Kaviraje, August 21, 2023, 04:33:38 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

                                       "नागपंचमी"
                                       -----------

मित्र/मैत्रिणींनो,

     आज दिनांक-२१.०८.२०२३-सोमवार आहे. आज "नागपंचमी" आहे. श्रावण महिन्यात नागपंचमीला विशेष महत्त्व आहे. नागपंचमीच्या दिवशी नागदेवतेची पूजा केली जाते. यासोबतच काल सर्प दोषाने पीडित लोकही पूजा करून दोष दूर करतात. महादेवांच्या प्रतीकांपैकी एक महत्त्वाचे प्रतीक नाग आहे. तसेच श्रीविष्णूचे प्रतीक म्हणूनही नागाकडे पाहिले जाते. श्रावण महिना शिवाची उपासना करण्यासाठी सर्वोत्तम मानला गेल्यामुळे नागपंचमी आणि नागपूजेला विशेष महत्त्व प्राप्त होते. मराठी कवितेच्या माझ्या सर्व बंधू-भगिनी, कवी-कवियित्रीना नागपंचमी सणाच्या अनेक हार्दिक शुभेच्छा. वाचूया नागपंचंमीवर महत्त्वाचा लेख. 

              नागांविषयी असलेले गैरसमज –

     नागपंचमी सण :- सणाच्या दिवशी अनेक गारुडी जिवंत नागाला दूध पाजतात. परंतु सर्प किंवा नाग कधीही दूध पीत नाही. कारण दूध पिणे हे त्याचे अन्न नसून साप किंवा नाग हा मांसाहारी प्राणी असून तो बेडूक,उंदीर, किडे असे जिवंत प्राणी पकडून खात असतो. परंतु या दिवशी काही गारुडी सापांना जबरदस्तीने दूध पाजण्याचा प्रयत्न करतात. यासाठी ते अनेक दिवस त्यांना उपाशी ठेवतात. जेणेकरून भुकेच्या पोटी ते दूध प्राशन करतात. यामुळे त्यांना दुधाची विषबाधा होते. आणि हजारो नाग मृत्युमुखी पडतात. त्यामुळे सापांविषयीचा हा गैरसमज लोकांचा दूर करणे अत्यावश्यक आहे.

     नैसर्गिक संतुलन राखण्यासाठी या सापांचे किंवा नागांचे संरक्षण करणे आवश्यक आहे. त्याचप्रमाणे आपल्या आजूबाजूच्या परिसरामध्ये साप किंवा नाग आपल्याला दिसून आल्यास सर्वप्रथम आपण सर्पमित्राला फोन करून त्याच्या करवी त्याला जंगलात नेऊन सोडणे महत्त्वाचे आहे. प्राणीमात्रांविषयीची आपले प्रेमाची भावना वाढीस यावी यासाठी हा नागपंचमीचा उत्सव साजरा केला जातो.

           नागपंचमीची पूजा का करावी?--

ज्या व्यक्तीच्या पत्रिकेमध्ये कालसर्प दोष आहे त्याच्यावरील कालसर्प दोषाचा प्रभाव निघून जातो असा समज आहे.
या दिवशी कृष्णाने कालिया नागाचे मर्दन यमुनेच्या डोहामध्ये करून गावातील लोकांना या कालियापासून सुरक्षित केले होते म्हणून हा दिवस साजरा केला जातो.
आपल्या मनातील इच्छा पूर्ण करण्यासाठी नागपंचमीची पूजा करतात.
आपल्या कुटुंबाचे आरोग्य चांगले राहावे आणि घरामध्ये शांतता नांदावी यासाठी घरातील स्त्रिया नागपंचमीची पूजा करतात.
आपल्या भावाच्या उत्तम तब्येतीसाठी, आरोग्यासाठी तसेच त्याच्या सुखशांतीसाठी बहिणी नागपंचमीची पूजा करतात.
असे म्हटले जाते की, नाग हा धनाची रक्षा करतो. त्यामुळे घरातील संपत्तीचे धनाचे रक्षण व्हावे यासाठी नागपंचमीची पूजा केली जाते.
ज्या व्यक्तींच्या स्वप्नामध्ये सारखे साप दिसत असेल त्यांनी ही पूजा केली तर त्यांची नागाबाबतची भीती नाहीशी होते असे म्हटले जाते. म्हणून ही पूजा केली जाते.
ही पूजा केल्यामुळे सर्पदोष होत नाही असे देखील सांगितले जाते.

--by Team Marathi Zatka
----------------------------

                       (साभार आणि सौजन्य-संदर्भ-मराठी झटका.कॉम)
                      --------------------------------------------

-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-21.08.2023-सोमवार.
=========================================