नागपंचमी-कविता-1

Started by Atul Kaviraje, August 21, 2023, 04:40:14 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

                                       "नागपंचमी"
                                      ------------

मित्र/मैत्रिणींनो,

     आज दिनांक-२१.०८.२०२३-सोमवार आहे. आज "नागपंचमी" आहे. श्रावण महिन्यात नागपंचमीला विशेष महत्त्व आहे. नागपंचमीच्या दिवशी नागदेवतेची पूजा केली जाते. यासोबतच काल सर्प दोषाने पीडित लोकही पूजा करून दोष दूर करतात. महादेवांच्या प्रतीकांपैकी एक महत्त्वाचे प्रतीक नाग आहे. तसेच श्रीविष्णूचे प्रतीक म्हणूनही नागाकडे पाहिले जाते. श्रावण महिना शिवाची उपासना करण्यासाठी सर्वोत्तम मानला गेल्यामुळे नागपंचमी आणि नागपूजेला विशेष महत्त्व प्राप्त होते. मराठी कवितेच्या माझ्या सर्व बंधू-भगिनी, कवी-कवियित्रीना नागपंचमी सणाच्या अनेक हार्दिक शुभेच्छा. वाचूया नागपंचंमीवर काही कविता. 

                                      "नागपंचमी"
                                     ------------

श्रावण मासात

नागपंचमीचा आला सण

अधिरले मन

माहेरासाठी.....


सण नागपंचमीचा

सया निघाल्या वारुळाला

पूजाया नागोबाला

मनोभावे..........


पंचमी नागाची

दूध ,लाहया ,कानोटे

नेवैद्य भेटे

नागोबास......


जागोजागी बांधले

झाडाला उंच झोपाळे

घेती हिंदोळे

नागपंचमीला.......


नागपंचमीच्या सणा

चला बनूया सर्पमित्र

काढुया चित्र

नागाचे.........


दिसती आसपास

छोट्या,मोठ्या कैक

जाती अनेक

सर्पाच्या......


असा नाग

करी नाश उंदराचा

मित्र शेतकऱ्यांचा

खास.........

--शीला अंभुरे
------------

                        (साभार आणि सौजन्य-संदर्भ-स्टोरी मिरर.कॉम)
                       -----------------------------------------

-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-21.08.2023-सोमवार.
=========================================