नागपंचमी-शुभेच्छा संदेश-2

Started by Atul Kaviraje, August 21, 2023, 04:46:09 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

                                       "नागपंचमी"
                                      ------------

मित्र/मैत्रिणींनो,

     आज दिनांक-२१.०८.२०२३-सोमवार आहे. आज "नागपंचमी" आहे. श्रावण महिन्यात नागपंचमीला विशेष महत्त्व आहे. नागपंचमीच्या दिवशी नागदेवतेची पूजा केली जाते. यासोबतच काल सर्प दोषाने पीडित लोकही पूजा करून दोष दूर करतात. महादेवांच्या प्रतीकांपैकी एक महत्त्वाचे प्रतीक नाग आहे. तसेच श्रीविष्णूचे प्रतीक म्हणूनही नागाकडे पाहिले जाते. श्रावण महिना शिवाची उपासना करण्यासाठी सर्वोत्तम मानला गेल्यामुळे नागपंचमी आणि नागपूजेला विशेष महत्त्व प्राप्त होते. मराठी कवितेच्या माझ्या सर्व बंधू-भगिनी, कवी-कवियित्रीना नागपंचमी सणाच्या अनेक हार्दिक शुभेच्छा. वाचूया नागपंचंमीवर शुभेच्छा संदेश. 

=========================================
हिशोब मांडायचा सारा

तर आकडे पडतील कमी...

तरीही सुख मोजताना पापण्या भिजतातच ना...?

🌺नाग पंचमीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा!🌺


काही नाती अशीच असतात

त्याला नाव नसत पण

तरीही खुप काही देऊन जातात..

🌺नाग पंचमीच्या हार्दिक शुभेच्छा!🌺


मी लोकांचा अपमान करत नाही

मी फक्त त्यांचे रूप समोर आणतो.

🌺नाग पंचमीच्या हार्दिक शुभेच्छा!🌺


मि असाच आहे,

पटल तर घ्या

नाय तर द्या सोडून....

🌺नाग पंचमीच्या हार्दिक शुभेच्छा!🌺


आईसारखा चांगला

टीकाकार कोणी नाही आणि

तिच्यासारखा खंभीर

पाठीराखा कोणी नाही

🌺नाग पंचमीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा!🌺


विचार न करता शिकणे

हे निरुपयोगी असते तर

न शिकता विचार करणे

हे धोकादायक असते.

🌺नाग पंचमीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा!🌺


विश्वास म्हणजे मनुष्याला

जीवंत ठेवणारी शक्ती होय...

🌺नाग पंचमीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा!🌺


उगाचच खूप उत्तरे द्याला लागतात,

कधी कधी वेड्यासारखे वागल्यावर...

पण खूप वेड्यासारखे वागायला होत मला,

पहिला पाऊस पडल्यावर...

🌺नाग पंचमीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा!🌺


संयम ठेवा,,, हे ही दिवस जातील...

आज जे तुम्हाला टाळायचा प्रयत्न करतात,,,

ते उद्या तुमची वाट पाहत राहतील...

🌺नाग पंचमीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा!🌺


मला लोक विचारतात नेहमी ऑनलाईन असतोस

तु झोपतोस की नाही

मी हसुन उत्तर देतो

ज्यांची स्वप्ने तुटतात ना त्यांना झोप कुठे येते

🌺नाग पंचमीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा!🌺
=========================================

--अनिकेत
----------

                       (साभार आणि सौजन्य-संदर्भ-मराठी चारोळी.इन)
                      -------------------------------------------

-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-21.08.2023-सोमवार.
=========================================