नागपंचमी-शुभेच्छा-1

Started by Atul Kaviraje, August 21, 2023, 04:47:40 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

                                       "नागपंचमी"
                                      ------------

मित्र/मैत्रिणींनो,

     आज दिनांक-२१.०८.२०२३-सोमवार आहे. आज "नागपंचमी" आहे. श्रावण महिन्यात नागपंचमीला विशेष महत्त्व आहे. नागपंचमीच्या दिवशी नागदेवतेची पूजा केली जाते. यासोबतच काल सर्प दोषाने पीडित लोकही पूजा करून दोष दूर करतात. महादेवांच्या प्रतीकांपैकी एक महत्त्वाचे प्रतीक नाग आहे. तसेच श्रीविष्णूचे प्रतीक म्हणूनही नागाकडे पाहिले जाते. श्रावण महिना शिवाची उपासना करण्यासाठी सर्वोत्तम मानला गेल्यामुळे नागपंचमी आणि नागपूजेला विशेष महत्त्व प्राप्त होते. मराठी कवितेच्या माझ्या सर्व बंधू-भगिनी, कवी-कवियित्रीना नागपंचमी सणाच्या अनेक हार्दिक शुभेच्छा. वाचूया नागपचंमी शुभेच्छा. 

     श्रावणातील पंचमीला नागपंचमी माहिती आहे. या दिवशी नागाची पूजा करून त्याची कृतज्ञता व्यक्त केली जाते. भारतीय सणसमारंभ हे निसर्गाची कृतज्ञता व्यक्त करण्याचा संदेश देत असतात. असं म्हणतात नागपंचमीच्या दिवशी भगवान श्रीकृष्ण कालिया नागाचा पराभव करून यमुना नदीच्याय पात्रातून सुखरूप आले होते. त्या दिवसापासून श्रावण शुद्ध पंचमीला नागपूजा केली जाते. या दिवशी भारतात नाग अथवा सापाला दूध, फळं, गोडाचे पदार्थ, फुले अर्पण केली जातात. नागपूजा करण्यासाठी नाागाची मातीची प्रतिमा घरात स्थापन केली जाते. सुवासिनी या दिवशी नागाला भावाप्रमाणे मानून त्या दिवशी त्याच्यासाठी उपवास करतात. भगवान शंकराच्या गळात नागाला स्थान असल्यामुळे शंकराच्या मंदिराबाहेर नागपंचमीसाठी भाविक गर्दी करतात. नागपंचमीच्या दिवशी नातेवाईक आणि मित्रमंडळींना पाठवा नागपंचमी शुभेच्छा (Nag Panchami Wishes In Marathi), नागपंचमी कोट्स (Nag Panchami Quotes In Marathi), नागपंचमी एसएमएस (Nag Panchami Marathi SMS), नागपंचमी स्टेटस (Nag Panchami Status In Marathi) आणि नागपंचमी मेसेजेस (Nag Panchami Messages In Marathi).

     श्रावणातील पहिला सण म्हणजे नागपंचमी... या सणाला सर्व जवळच्या लोकांना पाठवा नागपंचमीच्या शुभेच्छा (Nag Panchami Wishes).

1. मान ठेवूया नाग राजाचा, पूजा करून शिवशंकर भोले नाथाचा... नागपंचमीच्या शुभेच्छा

2. रक्षण करूया नागराजाचे, जतन करूया निसर्गदेवतेचे नागपंचमीच्या शुभेच्छा

3. वारूळाला जाऊया, नागोबाला पुजूया... नागपंचमीच्या शुभेच्छा

4. हे नाग देवता, सप्र देवता सर्वांनां सुख, समृद्धी आणि आरोग्य दे... नागपंचमीच्या शुभेच्छा

5. वसंत ऋतूच्या आगमनी, कोकिळ गाई गोड गाणी
नागपंचमीच्या शुभदिनी, सुख-समृद्धी मिळो सर्वांना जीवनी

6. श्रावण महिन्याचा पहिला सण म्हणजे नागपंचमी, कालिया नागाचा पराभव करून, यमुना नदीच्या पात्रातून, भगवान श्रीकृष्ण सुखरूप परत आले तो  दिवस म्हणजे नागपंचमी.... नागपंचमीच्या शुभेच्छा

7. नागपंचमी निमित्त आपणास व आपल्या परिवारास मनपूर्वक शुभेच्छा

8. बळीराजाचा हा कैवारी, नागराजाची मुर्ती पुजूया घरोघरी... नागपंचमीच्या शुभेच्छा

9. नागपंचमीच्या दिवशी तुमच्यावर ईश्वराची सदा कृपा असावी आणि तुमचे आयुष्य मंगलदायी असावे... नागपंचमीच्या शुभेच्छा

10. हर हर महादेव... नागपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा

11. नागपंचमीच्या सर्वांना आरोग्यदायी शुभेच्छा...

                    (साभार आणि सौजन्य-संदर्भ-मराठी.popxo.कॉम)
                   ---------------------------------------------

-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-21.08.2023-सोमवार.
=========================================