नागपंचमी-शुभेच्छा-2

Started by Atul Kaviraje, August 21, 2023, 04:48:58 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje


                                       "नागपंचमी"
                                      ------------

मित्र/मैत्रिणींनो,

     आज दिनांक-२१.०८.२०२३-सोमवार आहे. आज "नागपंचमी" आहे. श्रावण महिन्यात नागपंचमीला विशेष महत्त्व आहे. नागपंचमीच्या दिवशी नागदेवतेची पूजा केली जाते. यासोबतच काल सर्प दोषाने पीडित लोकही पूजा करून दोष दूर करतात. महादेवांच्या प्रतीकांपैकी एक महत्त्वाचे प्रतीक नाग आहे. तसेच श्रीविष्णूचे प्रतीक म्हणूनही नागाकडे पाहिले जाते. श्रावण महिना शिवाची उपासना करण्यासाठी सर्वोत्तम मानला गेल्यामुळे नागपंचमी आणि नागपूजेला विशेष महत्त्व प्राप्त होते. मराठी कवितेच्या माझ्या सर्व बंधू-भगिनी, कवी-कवियित्रीना नागपंचमी सणाच्या अनेक हार्दिक शुभेच्छा. वाचूया नागपचंमी शुभेच्छा. 

            Nag Panchami Quotes In Marathi | नागपंचमी कोट्स--

     श्रावण महिना म्हणजे सणांचा राजा... या महिन्यात नागपंचमीपासून सणांना सुरूवात होते. शेतकऱ्याचा मित्र नागाची पूजा करत त्याची कृतज्ञता व्यक्त केली जाते. यासाठी खास हॅपी नागपंचमी कोट्स आणि शुभेच्छा (Nag Panchami Quotes).

1. सण नागपंचमी सया निघाल्या  वारूळाला पूजाया नागोबाला मनोभावे... नागपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा

2. रुसला पर्जन्यराजा, मदत ना मिळे कोणाची,
परी तूच खरा मित्र, पाठ राखीतो बळीराजाची... हॅपी नागपंचमी

3. देवांचा देव महादेवाला जो प्रिय, भगवान विष्णूचे जो आहे सिंहासन, ज्याने पृथ्वीला उंच केले अशा नागदेवाला
माझा त्रिवार नमस्कार... नागपंचमीच्या शुभेच्छा

4. महादेवाला नाग आहे प्रिय, मनोभावे पूजा केल्यास सर्व समस्या होतील दूर... नागपंचमीच्या शुभेच्छा

5. नागदेवताची मनोभावे पूजा करा तुमच्या घरात सुख, समृद्धी आणि आरोग्याची बरसात होईल.... नागपंचमीच्या शुभेच्छा

6. भगवान शंकराच्या गळ्यात सापाचा हार आहे... नागपंचमी शिवभक्तांसाठी खास उत्सव आहे. नागपंचमीच्या शुभेच्छा

7. मुखाने ओम नम: शिवाय म्हणा आणि नागदेवताची पूजा करा... हॅपी नागपंचमी

8. नागदेवतेच्या शुभार्शिवादाने तुमच्या घरात सुख, समृद्धीची बरसात कायम होत राहो... नागपंचमीच्या शुभेच्छा

9. नागपंममीचा सण आला, पर्जन्यराजाला  आनंद झाला
न्हाहून निघाली वसुधंरा, घेतला हाती हिरवा शेला... नागपंचमीच्या शुभेच्छा

10. भगवान शंकराची कृपा झाली, सखेसवे मी नागपूजनाला निघाली... नागपंचमीच्या शुभेच्छा

                     (साभार आणि सौजन्य-संदर्भ-मराठी.popxo.कॉम)
                    ---------------------------------------------

-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-21.08.2023-सोमवार.
=========================================