नागपंचमी-शुभेच्छा-5

Started by Atul Kaviraje, August 21, 2023, 04:53:08 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

                                        "नागपंचमी"
                                       ------------

मित्र/मैत्रिणींनो,

     आज दिनांक-२१.०८.२०२३-सोमवार आहे. आज "नागपंचमी" आहे. श्रावण महिन्यात नागपंचमीला विशेष महत्त्व आहे. नागपंचमीच्या दिवशी नागदेवतेची पूजा केली जाते. यासोबतच काल सर्प दोषाने पीडित लोकही पूजा करून दोष दूर करतात. महादेवांच्या प्रतीकांपैकी एक महत्त्वाचे प्रतीक नाग आहे. तसेच श्रीविष्णूचे प्रतीक म्हणूनही नागाकडे पाहिले जाते. श्रावण महिना शिवाची उपासना करण्यासाठी सर्वोत्तम मानला गेल्यामुळे नागपंचमी आणि नागपूजेला विशेष महत्त्व प्राप्त होते. मराठी कवितेच्या माझ्या सर्व बंधू-भगिनी, कवी-कवियित्रीना नागपंचमी सणाच्या अनेक हार्दिक शुभेच्छा. वाचूया नागपचंमी शुभेच्छा. 

      आजकाल सोशल मीडियावर स्टेटस ठेवण्याची पद्धत आहे. त्यामुळे नागपंचमीच्या सणानिमित्त व्हॉटसअप, फेसबूकवर स्टेटस (Nag Panchami Status) ठेवण्यासाठी हे शुभेच्छा संदेश तुम्ही नक्कीच वापरू शकता.

1. मातीच्या नागाची पूजा करा
जिवंत नागाचा नको अट्टाहास
तुमच्या अंधश्रद्धेमुळे होतो
नागाचा अन्नवयीत छळ आणि र्हास
नागपंचमीच्या शुभेच्छा

2. नागपंचमीचा दिवस तुमच्यासाठी मंगलमय असावा हिच परमेश्वरचरणी प्रार्थना... या नागपंचमी साजरी करू या ईश्वररूपी नागाचे रक्षण आणि निसर्गाचे जतन करूया... नागपंचमीच्या शुभेच्छा

3. निसर्गाच्या बांधीलकीतून निर्माण झाला नागपंचमीचा सण,
शेतकरी आपल्या मित्राचे उतरवतो त्या निमित्ताने ऋण... नागपंचमीच्या शुभेच्छा

4. दुसऱ्याच्या आयुष्यात उत्तमपणे विष प्रयोग करून स्वतः सुरक्षित जागी जाऊन बसणाऱ्या विषारी लोकांना पण नागपंचमीच्या शुभेच्छा

5. समुद्र मंथनाने कळली जगास ज्यांची महती
अशा नागदेवांना सारे जग वंदती...नागपंचमीच्या शुभेच्छा

6. नागपंचमीच्या अमृततुल्य शुभेच्छा
पुंगीने नागाची आज मुलाखत घ्यावी,
जनतेच्या वाट्याची खावी दूध मलाई,
फणा अंहकाराचा डसता बाधा होई,
पुंगीच्या अंगागाची होई लाही लाही
नागपंमीच्या शुभेच्छा

7. डूख धरून बसणाऱ्या सर्व मानवरूपी नागांना नागपंचमीच्या शुभेच्छा

8. आपल्या  मध्येच राहीन आपल्याला फणा दाखवून फुस करणाऱ्या नागांना नागपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा

9. नाग दूध पिता यापेक्षा मोठी गजाल कधी होऊची नाय... नागपंचमीच्या शुभेच्छा

10. लग्नामध्ये रस्त्यावर लोळ, रस्त्याची साफसफाई करत नागीण जान्स करणाऱ्या सर्व विषारी, बिनविषारी मित्रांना नागपंचमीच्या शुभेच्छा

                     (साभार आणि सौजन्य-संदर्भ-मराठी.popxo.कॉम)
                    ---------------------------------------------

-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-21.08.2023-सोमवार.
=========================================