नागपंचमी-शुभेच्छा-6

Started by Atul Kaviraje, August 21, 2023, 04:54:26 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

                                      "नागपंचमी"
                                     ------------

मित्र/मैत्रिणींनो,

     आज दिनांक-२१.०८.२०२३-सोमवार आहे. आज "नागपंचमी" आहे. श्रावण महिन्यात नागपंचमीला विशेष महत्त्व आहे. नागपंचमीच्या दिवशी नागदेवतेची पूजा केली जाते. यासोबतच काल सर्प दोषाने पीडित लोकही पूजा करून दोष दूर करतात. महादेवांच्या प्रतीकांपैकी एक महत्त्वाचे प्रतीक नाग आहे. तसेच श्रीविष्णूचे प्रतीक म्हणूनही नागाकडे पाहिले जाते. श्रावण महिना शिवाची उपासना करण्यासाठी सर्वोत्तम मानला गेल्यामुळे नागपंचमी आणि नागपूजेला विशेष महत्त्व प्राप्त होते. मराठी कवितेच्या माझ्या सर्व बंधू-भगिनी, कवी-कवियित्रीना नागपंचमी सणाच्या अनेक हार्दिक शुभेच्छा. वाचूया नागपचंमी शुभेच्छा. 

     आम्ही तुमच्यासोबत नागपंचमीच्या काही खास शुभेच्छा शेअर केल्या आहेत. या शुभेच्छा तुम्ही तुमचे प्रियजन नातेवाईकांसोबत नक्कीच करू शेअर करू शकता आणि नागपंचमीच्या सणाचा खऱ्या अर्थाने आनंद घेऊ शकता.

     Nag Panchami Funny Quotes In Marathi | नाग पंचमी मजेदार कोट्स
नागपंचमीसाठी मजेदार कोट्स – Nag Panchami Funny Quotes In Marathi पाठवा तुमच्या मित्रमंडळी आणि नातेवाईकांना....

त्या सर्व नागिणींना, नागपंचमीच्या शुभेच्छा ज्यांनी आयुष्यभर दुसऱ्यांच्या आयुष्यात विष कालवलं आहे.

मनुष्यप्राणी इतका मुर्ख नागपंचमीला खोट्या नागाला पूजतो, पण घरातील त्या नागिणीची पूजा करत नाही जी त्याच्यावर दररोज फणा काढते.

प्रत्येक गोष्टीत विष पेरणाऱ्या माणूसरूपी नागांनापण नागपंचमीच्या शुभेच्छा!

फ्रेंडशिप दिनाच्या शुभेच्छा देऊन झाल्या असतील तर नागनागिणीसारख्या मित्रमैत्रिणींना नागपंचमीच्या शुभेच्छा देऊ या!!!

आज नागपंचमी आहे घरातील सर्व विवाहित पुरूषांनी पत्नीला दूध आणि जिलेभीचा नैवेद्य द्यावा.

बायकोच्या नुसत्या डोळ्यांच्या इशाऱ्यावर डुलणाऱ्या सर्व नागोबांना नागपंचमीच्या शुभेच्छा

माझ्यावर डूख धरून बसलेल्या सर्व मानवरूपी नागांना नागपंचमीच्या शुभेच्छा!!!

प्रत्येकाच्या आयुष्यात एक नागिणरूपी बहीण असते, जी घरी आल्यावर आईवडिलांसमोर तुमच्याबद्दल विष ओकते.

दुसऱ्यांच्या आयुष्यात विषप्रयोग करून स्वतः सुरक्षित जागी जाऊन बसलेल्या माणूसरूपी नागांना नागपंचमीच्या शुभेच्छा...

सकाळपासून फक्त दूधच पित बसणार की आज ऑफिसचं काम पण करणार... नागपंचमीच्या शुभेच्छा!!!

                      (साभार आणि सौजन्य-संदर्भ-मराठी.popxo.कॉम)
                     ---------------------------------------------

-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-21.08.2023-सोमवार.
=========================================