नागपंचमी-शुभेच्छा-7

Started by Atul Kaviraje, August 21, 2023, 04:55:56 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

                                       "नागपंचमी"
                                      ------------

मित्र/मैत्रिणींनो,

     आज दिनांक-२१.०८.२०२३-सोमवार आहे. आज "नागपंचमी" आहे. श्रावण महिन्यात नागपंचमीला विशेष महत्त्व आहे. नागपंचमीच्या दिवशी नागदेवतेची पूजा केली जाते. यासोबतच काल सर्प दोषाने पीडित लोकही पूजा करून दोष दूर करतात. महादेवांच्या प्रतीकांपैकी एक महत्त्वाचे प्रतीक नाग आहे. तसेच श्रीविष्णूचे प्रतीक म्हणूनही नागाकडे पाहिले जाते. श्रावण महिना शिवाची उपासना करण्यासाठी सर्वोत्तम मानला गेल्यामुळे नागपंचमी आणि नागपूजेला विशेष महत्त्व प्राप्त होते. मराठी कवितेच्या माझ्या सर्व बंधू-भगिनी, कवी-कवियित्रीना नागपंचमी सणाच्या अनेक हार्दिक शुभेच्छा. वाचूया नागपचंमी शुभेच्छा. 

                  नाग पंचमीच्या शुभेच्छा--

मान ठेवूया नाग राजाचा,
पूजा करून शिवशंकर भोले नाथाचा...
नागपंचमीच्या शुभेच्छा

रक्षण करूया नागराजाचे,
जतन करूया निसर्गदेवतेचे
नागपंचमीच्या शुभेच्छा

वारूळाला जाऊया,
नागोबाला पुजूया...
नागपंचमीच्या शुभेच्छा

हे नाग देवता, सप्र देवता सर्वांनां सुख, समृद्धी आणि आरोग्य दे...
नागपंचमीच्या शुभेच्छा

नागपंचमी निमित्त आपणास व आपल्या परिवारास मनपूर्वक शुभेच्छा

बळीराजाचा हा कैवारी,
नागराजाची मुर्ती पुजूया घरोघरी...
नागपंचमीच्या शुभेच्छा

नागपंचमीच्या दिवशी तुमच्यावर ईश्वराची सदा कृपा असावी
आणि तुमचे आयुष्य मंगलदायी असावे...
नागपंचमीच्या शुभेच्छा

हर हर महादेव... नागपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा

नागपंचमीच्या सर्वांना आरोग्यदायी शुभेच्छा...

देवांचा देव महादेवाला जो प्रिय, भगवान विष्णूचे जो आहे सिंहासन, ज्याने पृथ्वीला उंच केले अशा नागदेवाला
माझा त्रिवार नमस्कार...
नागपंचमीच्या शुभेच्छा

                    (साभार आणि सौजन्य-संदर्भ-मराठी.वेब दुनिया.कॉम)
                   -----------------------------------------------

-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-21.08.2023-सोमवार.
=========================================